Godavari Express Ganesha : 26 वर्षांपासून बाप्पाचा मनमाड-कुर्ला प्रवास, यंदाही थाटात गोदावरी एक्सप्रेसमध्ये विराजमान
Godavari Express Ganesha : मनमाड-कुर्ला गोदावरी एक्सप्रेसमध्ये (Manmad Kurla Express) बाप्पा विराजमान झाले असुन गेल्या 25 वर्षांपासून मनमाड-मुंबई (Manmad) अप डाऊन करत आहे.
Godavari Express Ganesha : मनमाड-कुर्ला गोदावरी एक्सप्रेसमध्ये (Manmad Kurla Express) 'गोदावरीच्या राजा'ची थाटात स्थापना करण्यात आली असुन गेल्या 25 वर्षांपासून बाप्पा मनमाड-मुंबई (Manmad) अप डाऊन करत आहे. यंदा हे 26 वे वर्ष असुन मनमाड ते मुंबई पर्यंत प्रवास करणाऱ्या चाकरमान्याची अपार श्रद्धा या गणपतीवर आहे. सर्वधर्मीय मिळुन या गणरायाची स्थापना करतात. मोठया थाटात आज गणरायाची स्थापना करण्यात आली.
गेल्या 25 वर्षांची परंपरा असलेल्या गोदावरी एक्सप्रेसमध्ये (Godavari Express) गोदावरीचा राजा विराजमान झाला आहे. त्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण असून कोरोनाच्या काळात देखील बाप्पा मनमाड येथील एका बोग्गीत बाप्पाचे आगमन करण्यात येत असल्याने यंदाही हा उत्साह कायम आहे. शिवाय मोठ्या उत्साहात सर्वच प्रवाशी गणरायाच्या आगमनासाठी आतुर होते. आज गोदावरी एक्सप्रेसमध्ये सर्वांच्या हस्ते बाप्पाचे स्वागत करण्यात आले.
गोदावरी एक्सप्रेसमध्ये मनमाड येथून गणपती बाप्पा विराजमान झाले आहे. गेल्या 25 वर्षांपासून मनमाड येथून सुटणाऱ्या गोदावरी एक्सप्रेस मध्ये श्री गणेशाची स्थापना करण्यात आली आहे. मनमाडहुन नाशिक प्रवास करणारे चाकरमाने धावत्या एक्सप्रेस मध्ये हा गणेशोत्सव साजरा करतात. आज सकाळी आरती झाल्यानंतर सर्व चाकरमान्यांनी नाचण्याचा आंनद घेतला आहे. आणि गोदावरी एक्सप्रेस पुढच्या प्रवासाला निघाली. त्याच बरोबर गणपती बाप्पा दहा दिवसांचा प्रवास सुरु झाला.
धावत्या ट्रेनमध्ये होणारी गणेशाची स्थापना हा सर्वत्र चर्चेचा विषय असतो. या गणेशोत्सवात पाचधारकांची बोगी अत्यंत आकर्षक सजावट करून विविध सामाजिक संदेशाचे फलक गाडीत लावण्यात आले. कोरोनाच्या दोन वर्षाचा कालखंडात ट्रेन बंद जरी असली तरी रेल्वे वर्कशॉप मध्ये असलेल्या गाडीचे एका बोगीत बाप्पांची स्थापना होत होती. यंदा गाडी सुरू झाली झाल्यानंतर तसेच कोरोनाचे संकट कमी झाल्याने पुन्हा त्याच उत्साहात या ट्रेनमध्ये दहा दिवसांसाठी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत.
25 वर्षांची परंपरा
गणेशोत्सवात सर्वानाच गणरायाचे आगमनाचे वेध लागतात. त्यामुळे आज मोठ्या सर्व ठिकाणी मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने गणरायाची स्थापना करण्यात येत आहे. कोरोनाची दोन वर्ष सोडली तर याहीवर्षी मनमाड - कुर्ला गोदावरी एक्स्प्रेसमध्ये देखील गणरायाची स्थापना करण्यात आली. रोजच्या अपडाऊन करणाऱ्यासह शहरातील नागरकीनी यावेळी मोठ्या संख्येने मनमाड रेल्वे स्थानकावर गणेश स्थापनेसाठी गर्दी केली होती. गेल्या 25 वर्षांपासून मनमाड ते नाशिक आणि नाशिक ते मुंबई असा प्रवास करणारे सर्वधर्मीय चाकरमानी या गाडीत गणपतीची स्थापना मोठ्या उत्साहात करतात. यंदाही रात्री पासधारकांनी आर्कषक सजावट करत श्रीची स्थापना केली.