Nashik Ganeshotsav : नाशिकमध्ये 144 मेट्रिक टन निर्माल्य, दोन लाखाहून अधिक मूर्तींचे संकलन
Nashik Ganeshotsav : नाशिकच्या (Nashik) गणेश विसर्जनात (Ganesh Visarjan) सुमारे 143.905 मेट्रिक टन निर्माल्यासह 1 लाख 97 हजार 488 गणेश मूर्तींचेही संकलन झाले आहे.
![Nashik Ganeshotsav : नाशिकमध्ये 144 मेट्रिक टन निर्माल्य, दोन लाखाहून अधिक मूर्तींचे संकलन maharashtra News Nashik Ganeshotsav of two lakh Ganesha idols in Nashik by mahapalika Nashik Ganeshotsav : नाशिकमध्ये 144 मेट्रिक टन निर्माल्य, दोन लाखाहून अधिक मूर्तींचे संकलन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/10/829ad6f3f15ee40ec5e3bb80a0fd3792166280995087189_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nashik Ganeshotsav : नाशिक (Nashik) महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Nashik Commissioner) यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण पुरक गणेशोत्सव (Ganeshotsav) साजरा करण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून नदीपात्राचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने प्रयत्न होते. त्याला प्रतिसाद मिळाला आहे. गणेश विसर्जनात सुमारे 143.905 मेट्रिक टन निर्माल्य संकलित करण्यात आले आहे. 1 लाख 97 हजार 488 गणेश मूर्तींचेही संकलन झाले आहे.
नाशिक शहरात काल मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. रात्री बारापर्यंत मिरवणुका सुरु होत्या. त्यांनतर गणपतीचे विसर्जन करण्यात आले. त्यानंतर आज दुपार पर्यंत निर्माल्य संकलन, मूर्ती संकलन करण्यात आले. मूर्तींचे नदीपात्रात विसर्जन न करता मनपाच्या विसर्जन स्थळांवर मूर्ती आणि निर्माल्य संकलित झाले आहे. मनपाच्या सहा विभागात एकूण 71 नैसर्गिक आणि कृत्रिम विसर्जन ठिकाणांवर मूर्ती आणि निर्माल्य संकलित झाले आहे. बांधकाम विभागाने कृत्रिम तलाव उभारले होते. घनकचरा व्यवस्थापन विभागाने स्वच्छतेबाबत नियोजन करून निर्माल्य संकलित केले आहे. 'मिशन विघ्नहर्ता 2022 फिरता तलाव' या उपक्रमालाही चांगला प्रतिसाद मिळाला.
सामजिक संस्थांची मदत
निर्माल्य जमा करण्यासाठी शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांनी मदत केली आहे. के. के. वाघ कॉलेजचे ट्रस्टी अजिंक्य वाघ, प्रा. स्वानंद डोंगरे आणि 300 विद्यार्थी, वृक्षवल्ली फाउंडेशन, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संस्कार सोनवणे व त्यांचे 20 स्वयंसेवक , बिटको कॉलेजचे विजय सुकटे व त्यांचे 100 स्वयंसेवक , दिल्ली पब्लिक स्कूलच्या साक्षी बनसोडे व त्यांचे 16 विद्याथी , पोलिस मित्र आडगाव पोलीस स्टेशन यांचेकडील 50 स्वयंसेवक, लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाचे 50 स्वयंसेवक, नाशिक रोड गुरुद्वारा, रोटरी क्लब ऑफ गोदावरी, रोटरी क्लब ऑफ वेस्ट, रोटरी क्लब ऑफ नाशिक सिटी यांच्या प्रत्येकी 25 सदस्य आणि भोसला मिलिटरी स्कुलच्या 100 कॅडेटनी उपस्थित राहून मूर्ती संकलनात सहभाग नोंदवला आहे.
144 मेट्रिक टन निर्माल्य संकलन
यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर जवळपास 144 मेट्रिक टन निर्माल्य संकलन करण्यात आले. यामध्ये पूर्व विभाग 21290 किलो ग्रॅम, पश्चिम विभाग 13940 किलो ग्रॅम, नाशिक रोड - 20545 किलो ग्रॅम, पंचवटी विभाग - 36010 किलो ग्रॅम, सिडको विभाग - 22275 किलो ग्रॅम, सातपूर विभाग - 29845 किलो ग्रॅम असा एकूण 143.905 मेट्रिक टन निर्माल्य संकलित करण्यात आले. तर 1 लाख 97 हजार 488 मूर्ती संकलित करण्यात आल्या आहेत. पंचवटी 72866, सिडको 17828, नाशिक रोड 50597, नाशिक पश्चिम 10508, नाशिक पूर्व 20478, सातपूर 25211 अशा एकूण 1 लाख 97 हजार 488 मूर्ती संकलित केल्या आहेत. तर टॅंक ऑन व्हील फिरता तलावाच्या माध्यमातून नाशिक रोड 31, पंचवटी 72, सिडको 146 सातपूर 132 अशा एकूण 381 मूर्ती संकलित करण्यात आल्या.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)