Dada Bhuse : मंत्रालयात झालेल्या प्रकाराचं मी समर्थन करत नाही पण…; मंत्रालयातील गुंडाच्या व्हिडीओवर दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया
Dada Bhuse : गुंड निलेश घायवळने काल (5 फेब्रुवारी रोजी) मंत्रालयात प्रवेश करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली यावर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Dada Bhuse : मंत्रालयातील गुंडागिरीचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यावर आता नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी कडक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. "मंत्रालयात झालेल्या प्रकाराचं मी समर्थन करत नाही पण, किरकोळ गोष्टीचा बाऊ करू नये असं ते म्हणले आहेत. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
गुंड निलेश घायवळने काल (5 फेब्रुवारी रोजी) मंत्रालयात प्रवेश करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. गुंड निलेश घायवळचं मंत्रालयातलं हे रील सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. या संदर्भात दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
त्र्यंबकेश्वरमध्ये आजपासून संत निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा सुरु
त्र्यंबकेश्वरमध्ये आजपासून संत निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा सुरु आहे. या संदर्भात बोलताना दादा भुसे म्हणाले, आपल्या त्र्यंबकेश्वरमध्ये आज संत निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा सुरु झालेली आहे. या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची सकाळपासून गर्दी पाहायला मिळतेय.
मंत्रालयातील गुंडाच्या रिलबाबत काय म्हणाले दादा भुसे?
मंत्रालयात हजारोंच्या संख्येने लोक येतात. मुख्यमंत्री महोदय हे सतत जनतेच्या गराड्यात येत असतात. यापूर्वी वर्षा बंगला, ठराविक लोकांनाच या ठिकाणी प्रवेश असायचा. मी कोणावर टिका करत नाही पण आज वर्षा बंगल्यावर साधा माणूसपण जातो. आणि त्यांच्या काय अडचणी, समस्या असतील ते त्या तिथे मांडतात. मंत्रालयातसुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी व्हायची. मंत्रालयात झालेल्या प्रकाराचं मी समर्थन करत नाही. परंतु, लगेच किरकोळ गोष्टीचा बाऊ करणं चुकीचं आहे अशा शब्दांत दादा भुसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, पुढे ते म्हणाले, गुंड प्रवृत्ती ही गुंड प्रवृत्ती असते. त्याचं कोणीच समर्थन करणार नाही. आणि त्यावर कठोर कारवाई करण्याचं धोरण आपल्या सरकारचं त्या ठिकाणी आहे.
मालेगावचा उल्लेख 'मिनी पाकिस्तान' केल्या प्रकरणी दादा भुसे यांची प्रतिक्रिया
आमदार नितेश राणे यांनी नाशिक जिल्ह्यातील मालेगावचा उल्लेख मिनी पाकिस्तान असा केला आहे. या प्रकरणी माजी आमदार आसिफ शेख यांनी आमदार नितेश राणे यांनी माफी मागावी अशी नोटीस पाठवली होती. या नोटीसीला आता आमदार नितेश राणे यांनी माफी देण्यास नकार दिला आहे. या प्रकरणी मालेगावकरांच्या भावना मी यापूर्वीच व्यक्त केल्या आहेत. प्रत्येक समाजात काही वाईट प्रवृत्ती असतात. त्या प्रवृत्तीच्या नावाने आपल्या सगळ्यांनाच जर मोजमाप करायला लागलो तर ती गोष्ट बरोबर नसते.
महत्त्वाच्या बातम्या :