एक्स्प्लोर

Nashik Crime : 'मोबाईल डीलर्स 'एक का डबल' करत होते', औरंगाबादच्या व्यवसायिकांना आठ कोटींचा गंडा 

Nashik Crime : औरंगाबादच्या (Aurangabad) आठ व्यावसायिकांना नाशिकच्या (Nashik) मेन रोडवरील एका मोबाईल डीलर्स (Mobile Dealers) कडून सुमारे चार कोटी रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Nashik Crime : अधिकाधिक नफ्याचे आमिष दाखवून औरंगाबादच्या (Aurangabad) आठ व्यावसायिकांना मेन रोडवरील एका मोबाईल डीलर्स (Mobile Dealers) कडून सुमारे चार कोटी रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी व्यावसायिक आदित्य राधेश्याम मालीवाल यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात (Bhadrkali Police Station) संशयित डीलर्स विरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. यानुसार पोलिसांनी संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

नाशिक (Nashik) शहरातील मेनरोड परिसरातील वावरे लेन एका खाजगी कंपनीच्या संचालकविरुद्ध मालीवाल यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की, औरंगाबादच्या व्यावसायिकांना ई- मेलद्वारे जादा नफ्याचे आमिष दाखविले. व लाखो रुपये उकळले. संशयितांने या बदल्यात कुठल्याही प्रकारच्या मोबाईलचा पुरवठा केला नाही. संबंधित मोबाईल कंपनीच्या मुख्य डिलर्स कडे चौकशी केली असता ही बाब उघड झाली. मोबाइल च्या मालाचा पुरवठा करण्यासाठी संशयित व्यावसायिक अनिल वासुदेव खेमानी, नीलम अनिल खेमानी, सीता वासुदेव खेमानी, वासुदेव राधाकीसन खेमानी आणि कंपनीचे व्यवस्थापक श्रीनाथ अहिरवाडकर यांनी आगाऊ रक्कम व्यवसायिकांकडून घेतली. 

दरम्यान ऑगस्ट महिन्यात मोबाईल माल पुरवला नाही. तसेच उडवाउडवीची उत्तरे देत टाळाटाळ केली. यानंतर व्यवसायिकांनी मोबाईल कंपनीकडे याबाबत चौकशी केली असता, त्यांनी ही कंपनी आता आमची अधिकृत विभागीय वितरक नसल्याचे सांगून हात झटकले. फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच त्यांच्याविरुद्ध भद्रकाली पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशी झाली फसवणूक 
संशयित खेमानी यांनी मालीवाल यांना अधिक नफ्याचे आमिष दाखवून सुपरमनी कंपनीत पैसे गुंतविण्यात सांगितले. त्यासाठी त्यांना 35 लाखांची मर्यादा ठरवून दिली. 1 जुलै 2022 रोजी खेमानी यांनी मालीवाल यांची संमती न घेता 12 लाख 64 हजार 754 व 10 लाख 51 हजार 181 आणि 10 लाख 84 हजार 065 रुपये कंपनीच्या बँक खात्यातुन अन्य खात्यात वर्ग करून घेतले. संशयित खेमानी यांना मालीवाल यांनी रक्कम खात्यातुन का वर्ग केली, असे विचारले असता त्यांनी नवीन स्कीम येणार आहे, त्यासाठी 80 ते 90 लाखांची गुंतवणूक करा, यापेक्षाही जास्त नफा होईल, असे सांगितले. मालीवाल जास्त नफ्याच्या अमिषापोटी स्वतः त्यांच्या खात्यात 70 लाख 08 हजार रुपयांचा भरणा केला. मालीवाल यांनी औरंगाबाद डीलर्सकडे चौकशी केली. तेव्हा त्यांची ही फसवणूक झाल्याचे कळले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde PC : राहुल गांधींच्या टीकेला तावडेंकडून प्रत्युत्तर; राजीव गांधी ते अदानी काय म्हणाले?Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 1 PM :18 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 02 PM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Speech Shivdi : उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? शिवडीत राज ठाकरेंचा हल्लाबोल

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
Rohit Pawar : शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद,  रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद, रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
Embed widget