Nashik Fraud : विद्यार्थी, बेरोजगार, व्यापारी, उद्योजक सर्वंच भामट्यांच्या जाळ्यात, नाशिकमध्ये फसवणुकीच्या घटनांत वाढ
Nashik Fraud : नाशिकमध्ये (Nashik) निम्म्या किमतीत बीएमडब्ल्यू कार (BMW Car) देण्याच्या बहाण्याने उद्योजकाची दहा लाखांची फसवणूक (Fraud) करण्यात आली आहे.
Nashik Fraud : नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यात सातत्याने फसवणुकीच्या (Fraud) घटना समोर येत आहेत. वेळोवेळी पोलीस प्रशासनांकडून याबाबत काळजी घेण्याचे आवाहन करूनही नागरिक बळी पडत आहेत. सायबर क्राईमच्या (Cyber Crime) माध्यमातून भामटे सक्रिय झाले असून त्या अनेकांना गंडा घालत आहेत. असाच एक प्रकार नाशिकमध्ये घडला आहे.
नाशिक शहरातील गंगापूर पोलीस ठाण्याच्या (Gangapur Police Station) हद्दीत राहणाऱ्या दोघा उद्योजकांना एका बनावट कंपनी अधिकाऱ्याने चक्क दहा लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बीएमडब्ल्यू सारखी महागडी कार (BMW Car) निम्म्या किमतीत देण्याचे आमिष दाखवत संशयित अमित कुमार घोष नावाच्या भामट्याने फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संशयित अमित कुमार घोष याने दक्षिण पूर्व आशिया विक्री क्षेत्राचा सहाय्यक उपाध्यक्ष असल्याचे हि फसवणूक केली.
तर उद्योजक चेतन मारुती प्रभू यांना बीएमडब्ल्यूच्या दुसऱ्या सीरिजमधील आलिशानकार 55 टक्के खरेदी करून देण्याच्या आमिष दाखवले. प्रभू यांनी 29 एप्रिल रोजी पाच लाख रुपये संस्थेच्या खात्यात जमा केले. त्यानंतर प्रभू यांचे मित्र उद्योजक अरुण कुमार दाना यांनी तत्पूर्वी 11 एप्रिल रोजी चार लाख रुपये त्यांच्या खात्यात वर्ग केले होते. यानंतर संशोधकांच्या पत्नीला पन्नास हजार रोख आणि 50 हजार ऑनलाईन स्वरूपात या दोघा मित्रांनी दिली. दरम्यान दोघं उद्योजकांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार सांगितला. या प्रकरणी संबंधित संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सटाण्यात तरुणाची फसवणूक
सटाणा तालुक्यात नोकरीच्या आमिषाने युवकाची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. रेल्वेमध्ये नोकरी लावून देतो, असे सांगत सटाणा शहरात बेरोजगार तरुणास सुमारे नऊ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सटाणा पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान नोकरी आमिष दाखवून अनेकदा तरुणांची फसवणूक केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
येवल्यात तोतया कृषी अधिकारी
कृषी अधिकारी असल्याचे सांगत येवला तालुक्यातील कृषी निविष्ठा विक्री केंद्रचालकांकडे पैशांची मागणी करत त्रास देणाऱ्या तोतया अधिकाऱ्याला तालुका पोलिसांनी अटक केली आहे. येवला तालुक्यातील बाळापूर येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. येवला तालुक्यातील नगरसुल येथील योगेश्वर कृषी सेवा केंद्राचे संजय गाडे यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी ही कारवाई केली. गाडे यांना आठ ऑगस्टला बबन लक्ष्मण शिरसाठ यांनी मोबाईलवरून एका कृषी अधिकारीचे नाव घेऊन तेच बोलत असल्याचे भासवून त्यांचा परवाना स्टॉक नोंदबाबत विचारणा केली. या तोतया अधिकाऱ्याने 'तुमच्या कृषी सेवा केंद्राची तपासणी केली तर तुम्ही गोत्यात याल, तुमचा परवाना रद्द होईल, मालही जप्त होईल, असा दम दिला. तसे होऊ द्यायचे नसेल, तर तीन हजार रुपये पाठवा' अशी गाडे यांच्याकडे मागणी केली. कारवाई होऊ नये, म्हणून गाडे यांनी तीन हजार रुपये देण्याचे मान्य करत फोन पे वर पैसे पाठवले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे समजले.