Nashik News : व्वा रे बहाद्दर! मिठाईत झुरळ टाकलं, अन् मालकाकडे मागितली खंडणी!
Nashik News : नाशिकमध्ये (Nashik) खंडणीसाठी एका बहाद्दराने चक्क मिठाईत (Sweet) झुरळ टाकून संबंधित स्वीट मालकाकडे पैशांची मागणी केल्याचे समोर आले आहे.
Nashik News : फसवणूक (Fraud), खंडणी आदींसाठी गुन्हेगार काय काय फंडे वापरतील सांगता येत नाही! असाच एक प्रकार नाशिकमधून (Nashik) समोर आला आहे. खंडणीसाठी एका बहाद्दराने चक्क मिठाईत (Sweet) झुरळ टाकून संबंधित स्वीट मालकांकडे पैशांची मागणी केल्याचे समोर आले आहे.
नाशिक शहरातील दोन मिठाई व्यावसायिकांना धमकावून त्यांच्याकडून एका युवकाने खंडणी वसुलीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्वीट मार्टमध्ये मिठाई खरेदीच्या बहाण्याने जायचे. मिठाई जवळ टाकून त्याचा मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देत दोन मिठाई विक्रेत्यांकडून खंडणी वसूल करणाऱ्या खंडणीखोराविरोधात गंगापूर व सरकार वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान नाशिक शहरात खंडणीच्या अनेक घटना समोर येतात. मात्र या बहाद्दराने वापरलेली शक्कल सर्वांनाच चकित केले आहे. शहरातील दोन स्वीट मालकांना फसविल्यानंतर हा खंडणीखोर असाच एका स्वीटमार्टमध्ये गेला. या ठिकाणी या खंडणीखोराने ही शक्कल वापरली, मात्र यावेळी त्याची ही शक्कल त्याच्यावरच उलटली आहे. खंडणीसाठी संशयितांने वापरलेली शक्कलीचे मिठाई विक्रेत्यानेच भांडाफोड केल्याने हा प्रकार समोर आला आहे. अजय राठोड उर्फ अजय राजे ठाकूर असे संशयित खंडणीखोराचे नाव आहे.
अशी घडली घटना
रतन चौधरी यांच्या फिर्यादीनुसार गंगापूर रोडवरील विद्याविकास सर्कल येथील सागर स्वीट या मिठाई विक्री दुकानात अजय राठोड हा बासुंदी खरेदीसाठी आला, यावेळी त्याने मालकाची नजर चुकवून बासुंदीमध्ये झुरळ असल्याचे सांगून त्यांने त्याचा व्हिडिओ तयार केला. त्यानंतर तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची आणि अन्न व औषध प्रशासनाकडे माहिती देण्याची धमकी देत एक लाख रुपयांची खंडणी मागितली. दुसऱ्या घटनेत मनीष मेघराज चौधरी यांच्या फिर्यादीनुसार संशयित अजय ठाकूर हा मयूर स्वीटमध्ये रबडी खरेदीसाठी आला. त्याने रबडीमध्ये झुरळ असल्याचे सांगून त्याचा व्हिडिओ केला आणि पूर्वीप्रमाणे धमकावत स्वीट मार्टचे मॅनेजर पुखराज चौधरी यांच्याकडे खंडणीची मागणी केली.
असा झाला भांडाफोड
दरम्यान सावरकर नगरच्यामधून स्वीट मध्ये खंडणीखोराने केलेला प्रकार दुकानाच्या सीसीटीव्हीत कैद झाला होता. चौधरी यांनी या घटनेनंतर दुकानाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात संशयित स्वीटमध्ये झुरळ टाकत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे चौधरी यांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.