एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal : 'बाळासाहेबांना अटक होणार म्हणून, केस मागे घेतली होती', भुजबळांनी सांगितला 'तो' किस्सा

Chhagan Bhujbal : बाळासाहेबांना (Balasaheb Thackeray) अटक होणार अशी चर्चा सुरु झाली असताना, मी केस मागे घेतो असे न्यायाधीशांना सांगितले. छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) त्या घटनेची आठवण करून दिली.

Chhagan Bhujbal : आज महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) आहे, उद्या काय होणार माहीत नाही पण मी एवढंच सांगेल की शिवसेना राहिली पाहिजे. आम्ही उद्धव ठाकरेंपासून दूर का गेलो याची अनेक कारणं बंडखोरांकडून दिली जातात. शिवाय भुजबळांनी बाळासाहेबांना (Balasaheb Thackeray) अटक केली होती आणि त्यांच्या शेजारी कस जाऊन बसायचं? असेही प्रश्न ते उपस्थित करत असल्याची टीका छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केली. 

छगन भुजबळ हे नाशिक (Nashik) दौऱ्यावर आहेत. यावेळी ते भुजबळ फार्मवर (Bhujbal Farm) आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांच्या सध्याच्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य करतांना शिवसेनेसोबतचे ऋणानुबंध आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच अनुभव त्यांनी यावेळी कथन केले. ते यावेळी म्हणाले कि, मी 99 मध्ये उपमुख्यमंत्री, गृहमंत्री झालो होतो माझ्याकडे ति फाईल आली होती. त्या फाईलवर सही केली होती. तेव्हा बाळासाहेबांना अटक होणार अशी चर्चा झाली होती. त्यांना अटकेत ठेवायचे नाही आणि मातोश्री हेच जेल समजून बाळासाहेबांना ठेवायचे असेही मी सुचवले होते, ते जाऊद्या 2008-09 दरम्यान अब्रुनुकसानीच्या केसचा निकाल लागणार होता. संजय राऊत, सुभाष देसाई तेव्हा माझ्याकडे आले होते आणि बाळासाहेबांची तब्येत बरी नाही सांगितले होते. जज साहेबांना मी सांगितले होते की मी ही केस मागे घेतो आहे. कोर्टातून बाहेर येताच उद्धव ठाकरेंनी मला बाळासाहेबांना भेटायला या निरोप दिला होता.काही दिवसांनी गेलो होतो, बाळासाहेबांसोबत सात ते आठ तास गप्पा मारल्या होत्या. शिवाय बाळासाहेब शेवटी शेवटी खूप आजारी होते. तेव्हा 3-4 जण भेटायला गेले होते. त्यात मी ही एक होतो, असा रंजक अनुभव भुजबळांनी यावेळी व्यक्त केला. 

दुसरी एक घटना सांगताना भुजबळ म्हणाले कि, एक साली बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना झाली होती. त्यानंतर आंदोलनात अनेकांचे जीव गेले होते. मी तेव्हा काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होतो. दुसऱ्या दिवशी सामनामध्ये छापून आले होते की, हाच तो ज्याने विटंबना केली होती. त्यावेळी या प्रकरणी मुंडेंवर कमिशनने मला क्लीनचिट केली होती. त्यानंतर मी सामनावर अब्रुनुकसानीचा दावा केला होता. पुढे शिवसेनेच्या अनेक आंदोलनात मी होतो. बेळगाव प्रकरणातही मी पुढे होतो, नेतृत्व मी केले होते. मंडल आयोग आणि ओबीसीच्या प्रश्नावरून माझे आणि बाळासाहेबांचे मतभेद झाले आणि आम्ही 18 आमदारांना घेऊन बाहेर पडलो अशी शिवसेनेतून बाहेर पडल्याची पार्श्वभूमी त्यांनी यावेळी सांगितली. 

शिवसेना संपावी, असं जगात कोणालाच वाटणार नाही. 
राज्यात सुरु असलेल्या सत्ता नात्यात शिवसेना भरडली गेली आहे. अनेकजण शिवसेनेतून बाहेर पडत आहेत. एकप्रकारे शिवसेनेत वादळ उठलं आहे, ते शांत झाल्यावर सर्व सुरळीत होईल. शिवाय शिवसेनेला उभं राहावं लागणार आहे. शिवसेना टिकलीच पाहिजे, लाखो शिवसैनिक आहेत, त्यांचे काय होणार? शिवसेना संपावी अस जगातील कोणालाच वाटणार नाही. तसेच एकमेकांवर कटू प्रहार करू नये, त्यातूनही लोकं दुःखी होतात, हे शिवसेनेच्या बाबतीत घडलेल्या घटनांवरून दिसून येत असल्याचे भुजबळांनी सांगितले. 

ओबीसी आरक्षणासंदर्भात म्हणाले... 
पत्रकार परिषदेत भुजबळांनी ओबीसी आरक्षणावर प्रकाशझोत टाकला. ते म्हणाले कि, बांठीया कमिशनने आपला अहवाल सोपवला आहे. फडणवीस यांनी केंद्र सरकारने अँटनी जनरल यांना उभे केले जाईल असे सांगितले पण मी त्यांना मध्य प्रदेशचे वकीलांना बरोबर घ्या असे सुचवले. शेवटच्या टप्प्यात ही जबाबदारी शिंदे आणि फडणवीस यांच्याकडे आली आहे आणि अशी अपेक्षा आहे की राज्यातील नव्हे तर देशातील ओबीसींनाही आरक्षण मिळावे, अशी अपेक्षा भुजबळांनी व्यक्त केली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Senate Election : सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंकडून ABVP चा सुफडासाफDharmaveer 2 Review : धर्मवीर - 2! फर्स्ट डे... फर्स्ट शो, फर्स्ट रिव्ह्यूZero Hour Full : फडणवीसांच्या ऑफिसची तोडफोड तेधर्मवीर 2 चा रिव्ह्यू;सविस्तर चर्चाZero Hour Maharashtra Politics : अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्यांचे कान कोण टोचणार?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Embed widget