Nashik News : नाशिकककर सावधान! मोटरसायकल चोरांची टोळी सक्रिय, पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या
Nashik News : नाशिक (Nashik) शहरात मोटरसायकल चोरीच्या (Motorcycle Theft) वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी नाशिक पोलीस (Nashik Police) आयुक्त यांच्या माध्यमातून विशेष पथक तयार करण्यात आले आहे.
Nashik Crime : नाशिक (Nashik) शहरात मोटरसायकल चोरीच्या (Motarcycle Theft) वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी नाशिक पोलीस (Nashik Police) आयुक्त यांच्या माध्यमातून चोरी प्रतिबंध साठी विशेष पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने व नाशिकरोड (Nashikroad) गुन्हे शोध पाथकाच्या संयुक्त मोहिमेद्वारे लाखो रुपये किंमतीच्या मोटरसायकल जप्त करून चार संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शहरात वाहन चोरीच्या घटना उघडकीस येत आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस आयुक्तांनी या संदर्भात एक शोध पथक तयार केले आहे. या शोध पथकाने एका मोटरसायकल चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईत चार संशयितांना अटकही करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिकरोड पोलिस ठाण्यात महेश अशोक साठे यांनी मोटरसायकल चोरीची फिर्याद दाखल केली होती. संबंधित गुन्ह्यांचा शोध सुरू असताना गुन्हे शोध पथक आणि मोटरसायकल चोरी प्रतिबंध पथकास माहिती मिळाली. यानुसार गुन्हे शोध पथकाने पुणे येथून निलेश चव्हाण या संशयितास ताब्यात घेतले. त्यास ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडून इतर साथीदारांचा पत्ता मिळाला. त्यानुसार योगेश दाभाडे, जगदीश पाटील यांना ताब्यात घेऊन त्यांनी नाशिक, आडगाव, मालेगाव, पिंपरी चिंचवड, उल्हासनगर, खेड परिसरातुन मोटर सायकली चोरल्याचे समोर आले.
दरम्यान संशयिताकडून 05 लाख 50 हजार रुपयांच्या एकूण 15 मोटरसायकल्स हस्तगत केल्या आहेत. त्यामध्ये नाशिकडरोड तसेच शहरातील विविध पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यातील मोटारसायकली आहेत. यातील योगेश दाभाडे हा मुख्य संशयित असून मोटरसायकल चोरीचे 18 तर निलेश चव्हाण याच्यावर 06 गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शहरातील दोघांना अटक
दरम्यान नाशिक रोड पोलीस ठाण्याचे पथक गस्तीवर असताना सिन्नर फाटा परिसरात दोन इसम संशयास्पद फिरत असताना आढळून आले. त्यांची विचारपूस केली असता अमोल विणकरे व एक अल्पवयीन मुलाकडून दोन मोटरसायकल्स ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत. उपनगर पोलीस ठाण्यात एक गुन्हा तर पंचवटी पोलीस ठाण्यातील एक गुन्हा असे मोटरसायकल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.
मोटरसायकल चोरी प्रतिबंध पथक
नाशिक शहरात मोटरसायकल चोरीच्या वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी विशेष मोहीम हाती घेतले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी मोटरसायकल चोरी प्रतिबंध पथकही उभे केले आहे. यामध्ये पोलीस उप आयुक्त विजय खरात यांनी परिमंडळ 2 मधील सर्व पोलीस ठाणे मधून 10 पोलीस अंमलदार व 1 अधिकारी यांची निवड करून पथक स्थापन करण्यात आले आहे.