(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sadabhau Khot Nashik : कांदा न खाल्ल्याने कोणी मेला आहे का? नाशिकमध्ये सदाभाऊ खोत बरसले!
Sadabhau Khot Nashik : कांदा (Onion) न खाल्ल्याने कोणी मेला आहे का? असं मी तरी ऐकलं नाही असं खोचक वक्तव्य सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी नाशिकमध्ये (Nashik) पत्रकार परिषदेत केले आहे.
Sadabhau Khot Nashik : निर्यात बंदी, नैसर्गिक संकट आणि इतर कारणामुळे नेहमी कांदा उत्पादक शेतकरी संकटात राहिला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्याप्रमाणे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राजाश्रय मिळाला नाही. त्यामुळे निफाड तालुक्यात होणाऱ्या आजच्या कांदा परिषदेच्या माध्यमातून एक धोरण ठरवून ते राज्य आणि केंद्र सरकारकडे देणार असल्याचे रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत (Sadabhau khot) यांनी सांगितले. तर कांदा न खाल्ल्याने कोणी मेला आहे का? आजपर्यंत तरी मी ऐकलं नाही, असा घाणघातही सदाभाऊ खोत यांनी यावेळी केला.
रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत हे कांदा परिषद प्रसंगी आज नाशिक (nashik) दौऱ्यावर आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे सरकार कडाडून टीका केली. यावेळी ते म्हणाले कि, कधी कांदा रडवतोय कर कधी कांदा हसवतोय. कारण कांदा उत्पादक शेतकऱ्यांपुढे कधी निर्यात बंदी तर कधी नैसर्गिक संकट उभे राहिल्याने तर कधी इतर कारणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशातच नाशिक जिल्हयासह राज्यात ऊस अधिक आहे. मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्याप्रमाणे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राजाश्रय मिळाला नाही. त्यामुळे आजच्या निफाड येथील कांदा परिषदेच्या माध्यमातून कांद्यासंदर्भात एक धोरण ठरवून ते राज्य आणि केंद्र सरकारकडे देणार असून या धोरणावर विचार नाही झाला तर मग आरपारची लढाई लढणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
ते पुढे म्हणाले कि, जीवनावश्यक वस्तूमध्ये कांदा (onion) टाकण्यात आला आहे. कांदा न खाल्ल्याने कोणी मेला आहे का आजपर्यंत मी तरी ऐकलं नाही. तुम्ही तरी सांगू शकता का. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूमधून कांदा वगळावा अशी आमची मागणी आहे. ही मागणी राज्य सरकारने केंद्राकडे मांडावी असे सदाभाऊ खाेत यांनी येथे नमूद केले. दरम्यान राज्य सरकार हे करणार नाही कारण हे सरकार फक्त लोणी खाण्यात व्यस्त आहे अशी टीका देखील खाेत यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.
मंत्रालयासमोर कटोरा घेऊन उभे आहे का?
राज्यसभेच्या निवडणुकीसंदर्भात ठाकरे सरकारवर आगपाखड केली. ते म्हणाले कि, दररोज सकाळी पारोशा तोंडी एखाद्याचे तोंड बघितलं की दिवस खराब जातो. काही माणसं काळ्या मांजरासारखे रोज रोज आडवे येतात. आता घोडेबाजार होणार म्हणून भाजपने पैसे वाया घालवू नये म्हणाले, पण आम्हाला प्रश्न पडतो की इतर दारिद्र्य रेषेखाली खाली आहे का? मंत्रालयासमोर कटोरा घेऊन उभे आहे का? पैसे मोजण्याचे मशीन तुमच्याकडेच सापडले आहे ना.. आमदारांचा अपमान करू नका, थोडा भान राखा असा सूचना वजा खोचक टोला त्यांनी यावेळी दिला.
आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा
ठाकरे सरकारमधील कुणीतरी म्हटले कि आता रामराज्य आणायचं आहे, म्हणजे आता रावणराज्य सुरू आहे, अस त्यांनी मान्य केले.. एक मंत्री तर अयोध्येला निघाले आहेत, वाटत अडीच वर्षे वनवासात होते ते. पोरगा परदेश वारीला आणि बाप मातोश्रीवर आहे. इकडे महाराष्ट्राच्या जनतेच कल्याण चाललंय. त्यामुळे वाऱ्या बंद करा आणि शेतकऱ्यांकडे लक्ष द्या, गावाकडची संस्कृती बघायला या, असे आवाहन करत असताना टीकाही केली.