Jalgaon Pachora Sabha : वाहनांवर मंत्री गुलाबराव पाटील यांची बाहुबली फ्रेम, तर कार्यकर्ते मुखवटे घालून सभास्थळी
Jalgaon Pachora Sabha : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी अनेक कार्यकर्ते मुखवटे घालून सभेला दाखल झाले आहेत.
Jalgaon Pachora Sabha : गेल्या दोन दिवसांपासून जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील पाचोरा (Pachora) येथील सभेवरून राजकारण चांगलंच तापलं आहे. मंत्री गुलाबराव पाटील आणि संजय राऊत (sanjay raut) या दोन नेत्यांमध्ये खडाजंगी पाहायला मिळत आहे. एकमेकांना आव्हान देत डिवचले जात आहे. अशातच आज पाचोरा येथील सभेसाठी जळगाव जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते मुखवटे घालून सभेला दाखल झाले आहेत. तर अनेक वाहनांवर मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) हे बाहुबलीच्या रूपात दिसत असल्याचे चित्र आहे.
आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे शिवसेना ठाकरे गटाची (Udhhav Thackrey) सभा होत आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत हे दोन दिवसांपासून तळ ठोकून आहेत. मात्र दुसरीकडे राजकीय नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही सुरु आहेत. यात मंत्री गुलाबराव पाटील यांनी सभेत घुसणार असल्याचे सांगितले. तर संजय राऊत यांनी घुसून दाखवाच असा इशारा दिला. यावर गुलाबराव पाटील यांनी विधान मागे घेत असल्याचे सांगितले. मात्र आता शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते पेटून उठले असून अनेकजण सभास्थळी दाखल होत आहे. मात्र सर्वांच्या चेहऱ्यावर गुलाबराव पाटील यांचे मुखवटे दिसून येत आहेत. तसेच अनेक वाहनांना बाहुबली फ्रेम उभी केली असून या मुखवट्यात मंत्री गुलाबराव पाटील असल्याचे दिसत आहे.
गेल्या दोन दिवसापासून मंत्री गुलाबराव पाटील आणि संजय राऊत यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडत असल्याचं पाहायला मिळत असून एकमेकांना आव्हान दिले जात आहे. संजय राऊत यांनी चौकटीत बोलावे नाहीतर आपण सभेत घुसू, असा इशारा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला होता. त्यांच्या या इशाऱ्यानंतर संजय राऊत यांनीही सभेत येऊन दाखवा अस आव्हान दिले होते. त्यांच्या या आवाहनानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांचे शेकडो कार्यकर्ते हे उद्धव ठाकरे यांच्या पाचोरा येथील सभेसाठी रवाना होत आहेत. संजय राऊत यांनी जळगावमध्ये येऊन गुलाबी गँग असा उल्लेख केला होता. हा महिलांचा अपमान असल्याचं सांगत शिंदे गटाच्या शेकडो महिला कार्यकर्त्या या पाचोरा येथे उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी रवाना झाल्या आहेत.
शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखल
आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात उद्धव ठाकरे यांची भव्य सभा होत आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर अनेक शिवसैनिकांनी पाचोरा गाठले आहे. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी देखील संजय राऊत यांचे आव्हान स्वीकारत पाचोरा शहरात दाखल होत आहेत. अशातच काही शिवसैनिकांना शिरसोली गावाजवळ पोलिसांनी रोखले आहे. यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे.