Nashik Dam Storage : एका दिवसाच्या पावसात नाशिक जिल्ह्यातील धरणे तुडुंब, 19 धरणे 50 टक्क्यांच्यावर!
Nashik Dam Storage : नाशिकच्या (Nashik) पश्चिम पट्ट्यासह गंगापूर पाणलोट (Gangapur Dam) क्षेत्रात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धरणसाठ्यात (Nashik District Dam) झपाट्याने वाढ झाली आहे.
![Nashik Dam Storage : एका दिवसाच्या पावसात नाशिक जिल्ह्यातील धरणे तुडुंब, 19 धरणे 50 टक्क्यांच्यावर! Maharashtra News Increase in dam stocks in Nashik district, 19 dams at 50 per cent Nashik Dam Storage : एका दिवसाच्या पावसात नाशिक जिल्ह्यातील धरणे तुडुंब, 19 धरणे 50 टक्क्यांच्यावर!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/12/bea8f9cf4effc398d55cf77f91fe2c4f1657601037_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nashik Dam Storage : नाशिकच्या (Nashik) पश्चिम पट्ट्यासह गंगापूर (Gangapur Dam) पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धरणसाठ्यात (Nashik District Dam) झपाट्याने वाढ झाली आहे. एकाच दिवसाच्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणे तुडुंब भरली आहेत.
नाशिक शहरासह इगतपुरी व त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) पट्ट्यात पावसाचा जोर कायम आहे. यामुळे धरण साठ्यात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे नांदुरमाध्यमेश्वर, पालखेड डॅमसह इतर काही धरणातून विसर्ग करण्यात येत आहे. शिवाय जिल्ह्यातील महत्वाची धरणे तुडुंब भरली आहेत, एकाच दिवसात झालेल्या पावसामुळे अनेक धरणे पन्नास टक्क्यांच्या वर गेली आहेत. आजच्या जिल्हा प्रशासनाने दिलेल्या धरण साठ्यानुसार दारणा, भावली, गंगापूर, पालखेड, कडवा, करंजवण, ओझरखेड, वाघाड, पुणेगाव आदी धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. कालच्या धरण साठ्याच्या आजच्या धरण साठ्यात कमालीची वाढ झाली आहे.
कालच्या आणि आजच्या धरणासाठ्यातील बदल
गंगापूर धरण काल (दि.11) रोजी 55.22 टक्के आज 66.64, दारणा धरण काल (दि.11) रोजी 76.21 टक्के आज 70.39, भावली धरण काल (दि.11) रोजी 64.92 टक्के आज 73.85, पालखेड धरण काल (दि.11) रोजी 48.55 टक्के आज 48.55, करंजवण धरण काल (दि.11) रोजी 44.22 टक्के आज 80.47, ओझरखेड धरण काल (दि.11) रोजी 38.50 टक्के आज 96.53, वाघाड धरण काल (दि.11) रोजी 54.47 टक्के आज 95.22, पुणेगाव धरण काल (दि.11) रोजी 59.29 टक्के आज 69.82, चणकापुर धरण काल (दि.11) रोजी 44.87 टक्के आज 67.08, हरणबारी धरण काल (दि.11) रोजी 66.47 टक्के आज 101.72, केळझर धरण काल (दि.11) रोजी 19.76 टक्के आज 73.95 अशा पद्धतीने धरण साठ्यात वाढ झाली आहे.
धरणांतून विसर्ग
जिल्ह्यातील संततधार पावसामुळे इगतपुरी व दिंडोरी तालुक्यातील धरणांमधील पाणी पातळी झपाट्याने वाढत असल्याने पुढे पुराचा कोणताही धोका नको यासाठी महत्वाच्या धरणातून विसर्गही करण्यात दारणा धरणातून 15572 क्यूसेस, पालखेड धरणातून 17530 क्यूसेक, गंगापूर धरणातून 10035 क्यूसेक, नांदूरमध्यमेश्वर धरणांतून 69562 क्यूसेक, चणकापुर धरणांतून 23665 पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)