(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik HSC Results : आम्ही पोरी हुशार! नाशिक विभागात मुलींचीच बाजी, विभागात धुळे जिल्हा नंबर वन
Nashik HSC Results : नाशिक (Nashik) विभागात मुलीनींच बाजी मारली असून विभागात धुळे जिल्ह्याने (Dhule) आघाडी घेतली आहे. तर नाशिक जिल्ह्याची (hsc Result) चौथ्या क्रमांकावर घसरण झाली आहे.
Nashik HSC Results : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल बुधवारी (दि.०८) जाहीर केला असून यावर्षीही विभागात बारावीच्या मुलींनीच बाजी मारली आहे. तर नाशिक विभागात धुळे जिल्ह्याने यंदा आघाडी घेतली आहे.
गेल्या काही दिवसांपासून उत्सुकता लागलेल्या बारावीचा निकाल आज जाहीर झाला असून आता विद्यार्थ्यांना हा निकाल ऑनलाईन बघता येणार आहे. दरम्यान नाशिक विभागातून यावर्षी ९४.१४ मुलांसह ९६.१७ मुलीं उत्तीर्ण झाल्या असून उत्तीर्ण मुलांपेक्षा मुलींचे प्रमाणे ०२ टक्क्यांनी अधिक आहे. नाशिक विभागात यंदा धुळे जिल्ह्याने आघाडी घेतली असून जिल्ह्यातील उतीर्ण विद्या्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. धुळे जिल्ह्यातील ९६.३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर नंदुरबार ९५.६३ टक्के उत्तीर्ण विद्यार्थ्यांसह दुसऱ्या स्थानी असून जळगाव ९५.४६ उत्तीर्णांसह तिसऱ्या व तर नाशिक जिल्ह्याची टक्केवारी यंदा घसरून चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे.
यात नाशिक विभागातून परीक्षेला प्रविष्ट ०१ लाख ६४ हजार २९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी तब्बल ०१ लाख ५४ हजार ७६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ८५ हजार ३७४ मुले (९४.१४ टक्के) व ६७ हजार २५५ (९६.१७) मुलींचा समावेश असून, नेहमीप्रमाणे यावर्षीही उत्तीर्णतेच्या प्रमाणात मुलींनीच बाजी मारली आहे. तर एकूण विभागाचा निकाल ९५. ०३ टक्के लागला आहे. यामुळे राज्यात नाशिक विभाग सहाव्या स्थानावर गेला आहे.
नाशिक विभागाचा असा राहिला निकाल
नाशिक विभागाची बारावीच्या निकालाची मागील आकडेवारी लक्षात घेता यंदा टक्का घसरल्याचे दिसून येते. कारण मागील वर्षी जवळपास ९९ टक्के विभागाचा निकाल होता. मार्च २०१९ मध्ये परीक्षेला प्रविष्ट झालेले विद्यार्थी ०१ लाख ५९ हजार ८९७ होते. यापैकी ०१ लाख ३५ हजार ५५० विद्यार्थी पास होऊन विभागाची आकडेवारी ८४. ७७ टक्के इतकी होती. त्यांनतर मार्च २०२० मध्ये परीक्षेला प्रविष्ट झालेले विद्यार्थी ०१ लाख ५६ हजार ७८९ होते. यापैकी ०१ लाख ३९ हजार ३४६ विद्यार्थी पास होऊन विभागाची आकडेवारी ८८. ८७ टक्के इतकी होती. म्हणजे चार टक्क्याची वाढ झाली होती. त्यानंतर मार्च २०२१ मध्ये परीक्षेला प्रविष्ट झालेले विद्यार्थी ०१ लाख ५१ हजार ७५४ होते. यापैकी ०१ लाख ५१ हजार १७३ विद्यार्थी होऊन विभागाची आकडेवारी जवळपास ९९.६१ टक्के इतकी होती. त्यानंतर यंदाच्या निकालात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. यंदा मार्च २०२२ मध्ये परीक्षेला प्रविष्ट झालेले विद्यार्थी ०१ लाख ६४ हजार २९ होते. यापैकी ०१ लाख ५४हजार ७६४ विद्यार्थी पास होऊन विभागाची आकडेवारी ९४. ०३ टक्के इतकी आहे.
निकाल पहा एबीपी माझावर
महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर (Maharashtra HSC Results 2022 Declared) झाला आहे. बोर्डाकडून निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. राज्याचा निकाल 94.22 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल हा दुपारी एक वाजल्यानंतर पाहता येणार आहे. निकाल कधी लागणार याबाबत जवळपास 15 लाख विद्यार्थ्यांना आणि पालकांना उत्सुकता होती, ही उत्सुकता संपली. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटसह एबीपी माझाच्या mh12.abpmajha.com वेबसाईटवरही विद्यार्थी हा निकाल पाहू शकतात. राज्याचा बारावीचा निकाल 94.22 टक्के लागला आहे, जो गेल्यावर्षीच्या तुलनेत 5.31 टक्क्यांनी कमी झाला आहे. मागील वर्षी हा निकाल 99.53 टक्के लागला होता. 24 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे.
Maharashtra HSC Result : बारावीचा निकाल चेक करायचाय ना? अगदी सहज आणि सोपी पद्धत जाणून घ्या...
Maharashtra Board 12th HSC Result 2022 : बारावीच्या निकालाबाबत सर्वकाही; वाचा फक्त एका क्लिकवर