Nashik Ganeshotsav : यंदा गणपती बाप्पा भाव खाणार मात्र नाशिकमध्ये ना नफा, ना तोटा तत्वावर गणेश मूर्ती विक्री केंद्र!
Nashik Ganeshotsav : नाशिक (Nashik) राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (NCP) वतीने ना नफा ना तोटा तत्वावर गणेश मूर्ती केंद्र (Ganesh Idol Center) सुरू करण्यात आले आहे.
Nashik Ganeshotsav : गणेशोत्सव (Ganeshotsav) अवघ्या काही दिवसांवर ठेवला असून सार्वजनिक गणेश मंडळाचे घरोघरी तयारीची लगबग सुरू झाली आहे. अशातच नाशिकच्या (Nashik) राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (NCP) वतीने ना नफा ना तोटा तत्वावर गणेश मूर्ती केंद्र (Ganesh Idol Center) सुरू करण्यात आले असून या माध्यमातून नाशिककरांना गणेश मूर्ती खरेदी करता येणार आहे.
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांचं घरोघरी तयारीची लगबग सुरू झाली आहे. गणेश मूर्तींसह सजावटी आणि पूजेच्या साहित्याने शहरातील बाजारपेठा देखील सजू लागले आहेत. मात्र प्लास्टर ऑफ पॅरिस (Plaster Of Paris) रंगाच्या दरात झालेली वाढ आणि त्यावरील जीएसटी दर वाढून 18 टक्क्यांनी वाढ झाल्याने यंदा गणपती बाप्पा भाव खाणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने नाशिक शहरात गणेश मूर्ती केंद्र ना नफा ना तोटा या तत्त्वावर सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे नाशिककरांनी या ठिकाणाहून गणेश मूर्तीची खरेदी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
गणेशोत्सवापासून दरवर्षी बाजारात चैतन्य पसरते. त्यातच यंदा दोन वर्षांनी आउटचा मोठ्या प्रमाणावर साजरा होणार असल्याने सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. मनमोहन घेणाऱ्या आकर्षक गणेश मूर्ती बाजारात दाखल झाले आहेत मात्र जवळपास 30 टक्क्यांनी मूर्तींचे दर वाढले आहेत त्यातच शाडू माती देखील महागले आहे गतवर्षी तीनशे रुपयांना मिळणारी शाडू मातीची पिशवी यंदा पाचशे रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले आहे या पार्श्वभूमीवर ना नफा ना तोटा या तत्त्वावर गणेश मूर्ती केंद्र सुरू करण्यात आले आहे.
वाढत्या महागाईच्या झळा सर्वत्र बसत असताना सणासुदीच्या काळात नागरिकांची आर्थिक बचत व्हावी याकरिता युवक राष्ट्रवादी अध्यक्ष अंबादास खैरे यांच्या संकल्पनेतून मदत फाउंडेशन आयोजित “ना नफा, ना तोटा” गणेश मूर्ती विक्री केंद्र सुरु करण्यात आले आहे. गणेश मूर्ती विक्री केंद्राचा शुभारंभ मा. प्राचार्य हरीश आडके सर व परिसरातील जेष्टनागरिक यांच्या हस्ते संपन्न झाला.
संपर्क साधण्याचे आवाहन
पुढील आठवड्यात गणेशोत्सवास सुरवात होत असून वाढत्या महागाईमुळे नागरिकांना सण साजरे करणे जिकरीचे बनले आहे. महागाईमुळे नागरिक सण साजरा करावा की नाही. असताना नागरिकांनी आपले पारंपारिक सण साजरे करावे व यात आर्थिक अडथळा उद्भवू नये याकरिता नागरिकांच्या आर्थिक हिताकरिता युवक राष्ट्रवादीचे अंबादास खैरे यांच्या संकल्पनेतून मदत फाउंडेशन आयोजित “ना नफा, ना तोटा” गणेश मूर्ती विक्री केंद्र सुरु करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांची आर्थिक बचत होऊन महागाईची झळ सणावर बसणार नाही, असे मत अंबादास खैरे यांनी व्यक्त केले आहे.