(Source: Poll of Polls)
Nashik NMC Election : नाशिकच्या मनपा निवडणूक आरक्षणाची अंतिम अधिसूचनाही स्थगित, राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश
Nashik NMC election : नाशिक मनपा निवडणुक (Nashik NMC Election) आरक्षण सोडत (Reservation draw) अंतिम अधिसूचना स्थगित करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) दिले आहेत.
Nashik NMC election : नाशिक (Nashik) मनपा निवडणुक (Nashik NMC Election) तयारी सुरू असताना अचानक राज्य सरकारने त्रिसदस्यीय प्रभाग रचना रद्द केली. त्यामुळे काही दिवसांपूर्वी आरक्षण सोडत (Reservation Drow) जाहीर झाली होती. त्या पार्श्वभूमीवर आजची आरक्षणाची अंतिम अधिसूचना स्थगित करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.
नाशिक मनपा निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मनपा प्रशासनाकडून याबाबत तयारी सुरू करण्यात आली होती. त्यानुसार प्रभाग रचना, मतदार यादी, त्यावरील हरकतींचे आदींचे कामकाज सुरू होते. त्यानंतर ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.
मात्र नवे सरकार स्थापन झाल्यानंतर ओबीसी आरक्षणाबाबत महत्वाचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला. यामध्ये ओबीसींना 27 टक्के राजकीय आरक्षण देण्यात आले. त्यामुळे पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणासहित सोडत जाहीर करण्यात आली. त्यामुळे ओबीसी आरक्षनासहित निवडणुकांचा मार्गही मोकळा झाला.
दरम्यान महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्रिसदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत महत्वाचा निर्णय घेत त्रिसदस्यीय प्रभाग रचना रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जाहीर करण्यात आलेली आरक्षण सोडत आता स्थगित झाली आहे. त्याबाबतच्या आरक्षणाची अंतिम अधिसूचना देखील स्थगित करण्यात आली आहे.
मनपा निवडणुकांचा समावेश
नाशिकसह बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, वसई-विरार, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती आणि नागपूर यासह 14 महापालिकांच्या आरक्षणाची अंतिम सूचना प्रसिद्ध केली जाणार नाही. तसेच आज होणारी औरंगाबाद, नांदेड, वाघाळा, लातूर,परभणी, चंद्रपूर, भिवंडी, निजामपूर, मालेगाव, पनवेल आणि मीरा भाईंदर यांना महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकींसाठीची आरक्षण सोडत स्थगित करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या