(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hanuman Temple Issue : हनुमान जन्मभूमी वाद चिघळण्याची शक्यता, आता 31 तारखेला शास्त्रार्थ सभा
Hanuman Temple Issue : नाशिक (Nashik) येथील हनुमान जन्मस्थळ (Hanuman Birthplace) वाद चिघळण्याची शक्यता असून आता 31 तारखेला शास्त्रार्थ सभेच आयोजन आले आहे.
Hanuman Temple Issue : नाशिक येथील हनुमान जन्मस्थळ वाद चिघळण्याची शक्यता असून आता 31 तारखेला शास्त्रार्थ सभेच आयोजन आले आहे. किष्किंदाचे दंडास्वामी श्री गोविंदानंद सरस्वतीजी महाराज यांना नाशिकचे साधू महंत आव्हान देणार असून नाशिकमध्ये सगळे साधू महंत आणि पंडित एकवटले आहेत. नाशिकच्या महर्षी पंचायतन पीठ मध्ये हनुमान जन्मस्थळा बाबत महाचर्चा होणार आहे.
राम जन्मभूमी, काशी मथुरा नंतर पुन्हा हनुमान जन्मस्थळाचा वाद उफाळला आहे. किष्किंदा येथिल मठाधिपती त्र्यंबकेश्वरमध्ये ठाण मांडून बसले आहेत. हनुमानचे जन्मस्थान अंजनेरी नाही तर किष्किंदा असल्याचा दावा ते करत आहेत. वाल्मिकी रामायणाचा दाखला देत किष्किंदा येथे भव्य हनुमान मंदिर उभारण्याची घोषणा त्यांनी केली आहे. मात्र या संदर्भात नाशिकच्या साधू महंतांमध्ये मात्र विरोधाभास असल्याचं दिसत आहे. महंत सुधीरदास हनुमान जन्मस्थान अंजनेरी असल्याचे दावे करत आहेत तर अनिकेत शास्त्री किष्किंदा असल्याचा मान्य करत आहेत.
दरम्यान हनुमानाच्या जन्मभूमीवरून महंत आणि साधू यांच्यातच मत मतांतरे असल्याचे दिसत आहे. हनुमानाचे जन्मस्थान अंजनेरी नसून कर्नाटकातील किष्किंधा असल्याचा दावा किश्किंधाचे मठाधिपती गोविंदानंद स्वामी सरस्वती यांनी केला आहे. अंजनेरी ही हनुमान जन्मभूमी असल्याचा दावा त्यांनी फेटाळला आहे. हनुमान जन्मभूमीवर शास्त्रार्थ आणि वादविवाद करण्यासाठी महंत गोविंद दास त्र्यंबकेश्वर येथे आलेले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे आंदोलन सुरु केले आहे. महंत गोविंद दास यांनी नाशिकच्या संत महंतांना अंजनेरी हनुमान जन्म भूमी असल्याचं सिद्ध करण्याचं आव्हान दिलं आहे.
या पार्श्वभूमीवर नाशिकचे अनिकेत शास्त्री महाराज यांनी याबाबत सविस्तर चर्चा करणार असून येत्या ३१ मी रोजी शास्त्रार्थ सभेच आयोजन आले आहे. किष्किंदाचे दंडास्वामी श्री गोविंदानंद सरस्वतीजी महाराज यांना नाशिकचे साधू महंत आव्हान देणार असून नाशिकमध्ये सगळे साधू महंत आणि पंडित एकवटले आहेत. नाशिकच्या महर्षी पंचायतन पीठ मध्ये हनुमान जन्मस्थळा बाबत महाचर्चा होणार आहे.
आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यातही वाद
काही दिवसांपूर्वी हनुमानाच्या जन्म स्थानावरून आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये देखील वाद निर्माण झाला होता. हनुमानाचा जन्म तिरुमलाच्या सात टेकड्यांमधील अंजनाद्री पर्वतात झाल्याचा दावा आंध्र प्रदेश मधील तिरुमला तिरुपती देवस्थानने केला होता. तर कर्नाटकच म्हणणं आहे की, हनुमानाचं जन्म हंपी जवळच्या किष्किंधा मधल्या अंजनाद्री इथे झाल्याचा दावा केला आहे.
नाशिकची आख्यायिका
हनुमानाचा जन्म नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या अंजनेरी डोंगरावर झाला, असं इथल्या लोकांचं मत आहे. अंजनेरी हे नाव हनुमानाची आई अंजनीमातेच्या नावावरून पडलं. इथे डोंगरावर अंजनी मातेचं आणि हनुमानाचं मंदिरही आहे. महाराष्ट्रातल्या लोकांची श्रद्धा आहे की, राम-सीता-लक्ष्मण नाशिकमधल्या पंचवटीत राहात होते. हनुमानाचा जन्म इथल्या अंजनेरी डोंगरावर झाला आहे, असा दावा नाशिकमधील लोकांचा आहे.