एक्स्प्लोर

Nashik Crime : जावयाने सासूच्या पोटात कात्री खुपसून केला खून, नाशिकच्या त्र्यंबकमधील घटना 

Nashik Crime : नाशिकच्या (Nashik) त्र्यंबक तालुक्यातील (Trimbakeshwer) धक्कदायक बातमी उघडकीस आली आहे. एका जावयाने आपल्या सासूचा कात्रीने खून (Murder) केला आहे.

Nashik Crime : पत्नी नांदायला येत नाही, या कारणाची कुरापत काढुन जावयाने सासुच्या पोटात कात्री खुपसुन ठार केल्याची धक्कदायक घटना त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) तालुक्यातील झारवाड येथ घडली आहे. तर भांडण सोडवणाऱ्या पत्नी आणि मुलीवरही विळ्याने वार केल्याने त्या दोघीही गंभीर जखमी झाल्या आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जांभुळवाडी येथील कळमुस्ते येथील किसन महादु पारधी याचे लग्न झारवड येथील कमळाबाई सोमा भुंताबरे यांच्या मुलीशी झालेले होते. संशयित किसन महादु पारधी याला दारुचे व्यसन असल्याने त्याची पत्नी इंदुबाई किसन पारधी सासरी नांदावयास जात नव्हती. रविवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास किसन पारधी हा झारवड येथे पत्नीच्या घरी आला. यावेळी घरात असणाऱ्या पत्नी इंदुबाईस सासरी नांदावयास का येत नाही,  अशी कुरापत काढुन पत्नी इंदुबाई पारधी यांना विळ्याने गळ्यावर मारहाण करू लागला.                

दरम्यान सासु कमळाबाई सोमा भूतांबरे (वय ५५) व संशयिताची मुलगी माधुरी किसन पारधी  (वय १२) या भांडण सोडवण्यासाठी गेल्या असता किसन पारधी याने माधुरी पारधी हिच्या हातावर विळ्याने वार करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याने ती गंभीर जखमी झाली. तसेच सासु कमळाबाई भुतांबरे यांच्या पोटात व पाठीत कात्री खुपसल्याने त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. या घटनेत सासु जागीच ठार झाली आहे तर पत्नी इंदुबाई पारधी हिच्या गळ्यावर विळ्याने गंभीर वार केल्याने तिचीही प्रकृति चिंताजनक आहे. पत्नी व मुलीला उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात (Nashik Civil Hospital) दाखल केले आहे. दरम्यान या प्रकरणी किसन पारधीच्या विरोधात घोटी पोलिसांत (Ghoti Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
                  
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक माधुरी कांगणे, पोलीस उपविभागीय अधिकारी कविता फडतरे, सहायक पोलीस दिलीप खेडकर आदींनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला. यावेळी पोलीसांनी आरोपी किसन पारधी याला अटक केली असुन किसन पारधी जखमी असल्याने त्याला जिल्हा रूग्णालयात दाखल केले आहे. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manikrao Kokate : भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Ladki Bahin Yojana : 2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या 'त्या' लाडक्या बहिणींकडून 1500 रुपये वसूल होणार? कोणत्या बहिणींना पैसे परत करावे लागणार?
2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या 'त्या' लाडक्या बहिणींकडून 1500 रुपये वसूल होणार? कोणत्या बहिणींना पैसे परत द्यावे लागणार?
Jalgaon Crime : लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
Uday Samant: उदय सामंतांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे कधी फुटले? 'या' कारणामुळे भाजपसाठी ठरतील हुकमी एक्का; सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण
उदय सामंतांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे कधी फुटले? 'या' कारणामुळे भाजपसाठी ठरतील हुकमी एक्का; सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 20 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्सSaif Ali Khan Attack Case: सैफचा चिमुकला जेहला ओलीस ठेवण्याचा आरोपीचा होता कट, पण...ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 20 January 2025

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manikrao Kokate : भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Ladki Bahin Yojana : 2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या 'त्या' लाडक्या बहिणींकडून 1500 रुपये वसूल होणार? कोणत्या बहिणींना पैसे परत करावे लागणार?
2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या 'त्या' लाडक्या बहिणींकडून 1500 रुपये वसूल होणार? कोणत्या बहिणींना पैसे परत द्यावे लागणार?
Jalgaon Crime : लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
Uday Samant: उदय सामंतांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे कधी फुटले? 'या' कारणामुळे भाजपसाठी ठरतील हुकमी एक्का; सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण
उदय सामंतांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे कधी फुटले? 'या' कारणामुळे भाजपसाठी ठरतील हुकमी एक्का; सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण
प्रेमात आकंठ बुडाली, हक्काचं माणूस समजून 10 लाख दिले अन् घात झाला; पुण्यातील डॉक्टर तरुणीने औषध पिऊन सगळंच संपवलं
प्रेमात आकंठ बुडाली, हक्काचं माणूस समजून 10 लाख दिले अन् घात झाला; पुण्यातील डॉक्टर तरुणीने औषध पिऊन सगळंच संपवलं
Jalgaon Crime : लव्ह मॅरेजचा सूड 5 वर्षांनी उगवला , सासरच्या मंडळींनी जावयाला कोयता आणि चॉपरने वार करून संपवलं, जळगाव हादरलं
लव्ह मॅरेजचा सूड 5 वर्षांनी उगवला , सासरच्या मंडळींनी जावयाला कोयता आणि चॉपरने वार करून संपवलं, जळगाव हादरलं
नव्या 'उदय'चं भाकित, विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा, संजय राऊत म्हणाले शिंदे वेळीच सावध झाले अन् झाकली मूठ....
विजय वडेट्टीवारांचं नव्या 'उदय'चं भाकित, संजय राऊतांनी उदय सामंतांचं नाव घेत आमदारांचा आकडा सांगितला
Sanjay Raut : उदय सामंतांसोबत 20 आमदार, एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर राऊतांचा खळबळजनक दावा, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?
उदय सामंतांसोबत 20 आमदार, एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर राऊतांचा खळबळजनक दावा, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?
Embed widget