एक्स्प्लोर

Nashik Chhagan Bhujbal : जगात भारी! येवला अस्सल पैठणी जगभरात पोहचलीच पाहिजे.... भुजबळांचे रेल्वे मंत्र्यांना पत्र 

Nashik Chhagan Bhujbal : पैठणी जगात पोहचण्यासाठी नगरसूल व येवला रेल्वे स्थानकाचा विकास होणे अपेक्षित आहे.

Nashik Chhagan Bhujbal : येवला (Yeola) रेल्वे स्थानकाचा भारतीय रेल्वेच्या 'अमृत भारत स्थानक' योजनेमध्ये समावेश करून या स्थानकांचा प्राधान्याने विकास करण्यात यावा, जेणेकरून जगप्रसिद्ध येवला 'पैठणी' वन नेशन, वन प्रोडक्ट धोरणांतर्गत नगरसुल स्थानकावर प्रोत्साहित करण्यात यावी, अशी मागणी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव व राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे. 

येवला रेल्वे स्थानक (Yeola Raillway) दौंड मनमाड रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील येवला गावात असलेल्या या स्थानकावर दौंड आणि मनमाड दरम्यान धावणाऱ्या जाणाऱ्या अनेक गाड्या थांबतात. सद्यस्थितीत अनेक व्यापारी वर्ग, नोकरदार वर्ग येवला, निफाड, लासलगाव परिसरात असल्याने येवला सह नगरसूल भागातील नागरिकांना ये जा करण्यासाठी व माल वाहतुकीसाठी महत्वपूर्ण असलेल्या नगरसूल व येवला रेल्वे स्थानकाचा विकास होणे अपेक्षित आहे. जेणेकरून स्थानिकांना रोजगार प्राप्त होईल. येवला, नगरसूलचे दळणवळण वाढण्यास मदत होईल, त्याचबरोबर येवला शहरसह तालुक्याचा विकास होण्यास मदत होईल. 

दरम्यान याच विषयाला अनुसरून येवला मतदार संघाचे माजी आमदार छगन भुजबळ यांनी येवला व नगरसूल रेल्वे स्थानकाचा विकास व्हावा यासाठी रेल्वे मंत्र्यांना पत्र दिले आहे. भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, भारतीय रेल्वे देशभरातील 247 स्टेशनची पुनर्विकासासाठी निवड करणार आहे.रेल्वे प्रशासन प्रत्येक रेल्वे विभागातून प्रत्येकी 2 स्टेशन्स निवडून त्यांचा विकास पहिल्या टप्प्यात करणार आहे. त्यासाठी दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागातून नगरसुलचा स्थानकाचा विकास प्राधान्याने करावा, असे त्यांनी म्हटले आहे. जेणेकरून जगप्रसिद्ध येवला 'पैठणी' One Station One Product धोरणांतर्गत नगरसुल स्थानकावर प्रोत्साहित करण्यात येईल.
 
त्यांनी पुढे म्हटले आहे की, भारतीय रेल्वे अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत एक हजार छोटया रेल्वे स्टेशन विकसित करण्यात येत आहे. या योजनेतून प्रत्येक विभागातून १५ स्थानके निवडण्यात येणार आहे. त्यासाठी मध्य रेल्वे सोलापूर विभागातून येवला स्टेशनचा प्राधान्याने समावेश करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. या स्थानकाचा विकास करतांना प्लॅटफॉर्म 2 चा विकास करण्यात यावा. याठिकाणी फुट ओवर ब्रिज विकसित करावे, मालाची साठवून करण्यासाठी गुड्स शेड उभारून गुड्स प्लॅटफॉर्म बांधावे. यातून येवला स्टेशन येथे मंजूर खत रेक पॉइंट कार्यान्वित होऊन खताची रेक वाहतूक चालू करण्यास मदत होणार आहे. तसेच सद्या येवल्याचे खताचे जे रेक आज मनमाड, नांदगाव येथे उतरतात ते थेट येवल्यात उतरवले जातील असे त्यांनी म्हटले आहे.

त्यांनी म्हटले आहे की, येवला व नगरसूल या स्थानकावर देशभरातून नागरिक हे शिर्डीसाठी येतात. तसेच या परिसरात शेतमालाची वाहतूक देखील मोठ्या प्रमाणात होत असल्याने या स्थानकांचा विकास प्राधान्याने करण्याची नितांत आवश्यकता आहे. रेल्वे प्रशासनाने सुरु केलेल्या अमृत योजनेमध्ये या स्थानकांचा समावेश करून त्यांचा विकास करण्यात यावा अशी मागणी छगन भुजबळ यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री यांच्याकडे केली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
Priyanka Gandhi In Kolhapur : बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dilip Walse Patil On Sharad Pawar : शरद पवारांचा मानसपुत्र असं मी नाही तर लोक म्हणातात-वळसेPriyanka Gandhi : बाळासाहेब ठाकरेंचा भर सभेत उल्लेख, प्रियंका गांधी यांचं मोदी, शाहांना आव्हानPriyanka Gandhi Shirdi Speech : प्रियांका गांधींची शिर्डीत भव्य सभा; मोदींवर निशाणा #abpमाझाTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2 PM : 16  नोव्हेंबर  2024 : ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
Priyanka Gandhi In Kolhapur : बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
Satej Patil : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
Bajrang Punia In Kolhapur : भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
×
Embed widget