Maharashtra Nashik Crime News : नाशिक आत्महत्याप्रकरणी 21 सावकारांविरोधात सातपूर पोलिसांत गुन्हा दाखल, दहा जणांना अटक
Maharashtra Nashik Crime news : नाशिकसह जिल्ह्याला खासगी सावकारीचा फास दिवसेंदिवस आवळत चालला असून मागील डोकं तीन महिन्यांत अनेक घटना समोर आल्या आहेत.
Maharashtra Nashik Crime news : नाशिक शहरातील सातपूर भागातील अशोकनगर भागातील राधाकृष्णनगर येथील एका फळ विक्रेत्याने त्याच्या दोन मुलांसह खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून सामूहिकरीत्या गळफास घेऊन आत्महत्या केल्याने सातपूर परिसर हादरला. याप्रकरणी तब्बल 21 सावकारांविरोधात सातपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून दहा जणांना अटक करण्यात आली आहे.
नाशिकसह जिल्ह्याला खासगी सावकारीचा फास दिवसेंदिवस आवळत चालला असून मागील डोकं तीन महिन्यांत अनेक घटना समोर आल्या आहेत. दरम्यान रविवारी सातपूर परिसरात बाप लेकांच्या आत्महत्येची खळबळजनक घटना उघडकीस आली. तपास करताना पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोटही आढळून आली. त्यानुसार खासगी सावकारांकडून वसुलीचा तगादा मागे लागल्याने सामूहिक आत्महत्या असल्याचे बापलेकांनी सुसाइड नोटमध्ये नमूद केल्याचे आढळून आले होते.
दरम्यान सातपूर पोलिसांनी सुरवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केल्यानंतर तपास सुरू केला होता. त्यानंतर रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरासह जिल्ह्यातील 21 सावकारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दहा जणांना अटक करण्यात आली असून इतरांचा शोध सुरू आहे. आत्महत्येस प्रवृत्त करणे तसेच महाराष्ट्र सावकारी अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Maharashtra Nashik Crime news : नेमकी काय घटना घडली?
देवळा तालुक्यातील उमराणे येथील असलेले फळ विक्रेते दीपक शिरोडे हे सध्या सातपुरच्या अशोकनगर भागात त्यांचा मोठा मुलगा प्रसाद शिरोडे आणि राकेश शिरोडे सोबत राहत होते. अशोकनगर भाजी मार्केट येथे त्यांचा फळविक्रीचा व्यवसाय होता. या तिघांनीही कर्जबाजारीपणाला कंटाळून फॅनच्या हुकला दोरीने गळफास घेतल्याची घटना घडली. दीपक शिरोडे यांच्या पत्नी व आई या ही दुपारी कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. त्या घरी आल्यावर तिघांनी गळफास घेतल्याचे आढळून आले. फळविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या शिरोडे कुटुंबातील वडील दिपक शिरोडे (वय 55), मोठा मुलगा प्रसाद शिरोडे (वय 25), लहान मुलगा राकेश शिरोडे (वय 23) यांनी रविवारी दुपारी तिन वेगवेगळ्या खोलीत फॅनच्या हुकला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आपले जीवन संपवले. दीपक यांची पत्नी आणि आई कामानिमित्त घराबाहेर गेल्या होत्या.