किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांना ट्रॉम्बे पोलिसांचं समन्स
आयएनएस विक्रांतला वाचवण्यासाठीच्या मोहिमेत किरीट सोमय्यांनी 58 कोटी रुपये गोळा केले, राजभवनात जमाही केले नाहीत असा संजय राऊत यांचा आरोप आहे.
मुंबई : किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांना ट्रॉम्बे पोलिसांनी समन्स बजावले आहे. संजय राऊतांनी केलेल्या आरोपाप्रकरणी सोमय्या पिता-पुत्रांना समन्स देण्यात आले आह. उद्या सकाळी 11 वाजता सोमय्या पिता-पुत्रांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
आयएनएस विक्रांतला वाचवण्यासाठीच्या मोहिमेत किरीट सोमय्यांनी 58 कोटी रुपये गोळा केले, राजभवनात जमाही केले नाहीत असा संजय राऊत यांचा आरोप आहे. तर किरीट सोमय्या म्हणतात, आधी 58 कोटी रुपये गोळा केल्याचा पुरावा द्या, मी तर फक्त प्रतिकात्मक आंदोलन केलं. 35 मिनिटांत इतकी रक्कम कशी काय जमा होऊ शकते हा त्यांचा सवाल आहे
पण संजय राऊत यांनी सोमय्या यांच्या जुन्या ट्वीटचा आधार घेत 58 कोटींचा आरोप आता 140 कोटी रुपयांवरही नेऊन ठेवला आहे. त्यामुळे आता या सगळ्या आरोपांचं नेमकं काय होणार, किरीट सोमय्या यांच्याविरोधात एफआयआर तर दाखल झाली असून उद्या पोलिस स्थानकात उपस्थित राहण्याचे आदेश ट्रॉम्बे पोलिसांनी दिले आहेत. पण ही एफआयआर ऐकीव माहितीच्या आधारावर असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे या सगळ्या आरोपांतून आता पुढचं नाट्य कुठल्या दिशेने जाणार, पुढची लढाई कोर्टात लढली जाणार का, सोमय्यांना अटक होणार का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजून बाकी आहेत.
पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर हास्यास्पद
मुंबई पोलिसांनी दाखल केलेला माझ्याविरोधातील एफआयआर हा हास्यास्पद असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले. एका नागरिकाने वृत्तपत्रातील बातमीच्या आधारे ही तक्रार नोंदवली. त्यामध्ये कोणताही पुरावा नसल्याचे सांगितले. पोलिसांनी माझ्यावरील गुन्हा सिद्ध करावा असे आव्हान त्यांनी दिले.
संबंधित बातम्या :
सोमय्या म्हणतात, INS Vikrant साठी प्रतिकात्मक निधी जमवला, नेटकऱ्यांकडून 140 कोटींची जुनी पोस्ट व्हायरल