एक्स्प्लोर

Suhas kande : माझ्यासमोर समीर भुजबळ नव्हे तर गणेश धात्रकांचं आव्हान, सुहास कांदेंचा टोला; 'तो' आरोपही फेटाळला

Nandgaon Assembly Constituency : नांदगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्या विरोधात माजी खासदार समीर भुजबळ यांनी शड्डू ठोकलाय.

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात नांदगाव विधानसभा मतदारसंघाची (Nandgaon Assembly Constituency) जोरदार चर्चा सुरु आहे. कारण माजी खासदार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांनी अजित पवार गटाच्या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन नांदगावमधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांची लढत महायुतीतून शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्याशी होणार आहे. तर महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने गणेश धात्रक (Ganesh Dhatrak) यांना उमेदवारी दिली आहे. माझ्यासमोर समीर भुजबळ नाही तर शिवसेना ठाकरे गटाचे गणेश धात्रक यांचं आव्हान असल्याचे म्हणत सुहास कांदे यांनी समीर भुजबळांना टोला लगावला आहे. 

समीर भुजबळ यांच्या काल झालेल्या सभेत नांदगांव लोकशाही धडक मोर्चाचे पदाधिकारी शेखर पगार यांनी आमदार सुहास कांदे हे दहशत पसरवित दादागिरी करत असल्याचा आरोप केला. समीर भुजबळांच्या सभेतच शिवीगाळाची कॉल रेकॉर्डिंग उपस्थितांना ऐकवण्यात आली. तसेच  राष्ट्रवादी अजित पवार गटाचे समन्वयक विनोद शेलार यांच्यावर सुहास कांदे संतापल्याचे दिसून आले. आता यावर सुहास कांदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

सुहास कांदे यांनी आरोप फेटाळला 

व्हायरल व्हिडिओ आणि ऑडिओ फेक आहे. ऑडिओ प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करणार आहे. पोलीस तपास करतील. VI ॲपने आवाजाची कॉपी त्यांनी केली आहे, असे म्हणत सुहास कांदे यांनी आरोप फेटाळला आहे. तर विकासाच्या मुद्द्यावर मी निवडणुकीला सामोरे जाणार आहे. भविष्यात उर्वरित कामे आणि सिंचन हेच आमचे ध्येय आहे. तर भुजबळांचे आव्हान मानत नाही, असे म्हणत सुहास कांदे यांनी छगन भुजबळांवर बोलण्यास टाळले आहे. माझ्यासमोर समीर भुजबळ नाही तर शिवसेना ठाकरे गटाचे गणेश धात्रक यांचं आव्हान असल्याचे म्हणत सुहास कांदे यांनी समीर भुजबळांना टोला लगावला आहे. 

काय म्हणाले छगन भुजबळ? 

याबाबत छगन भुजबळ म्हणाले की, सुहास कांदे शिवीगाळ करत आहे असे त्या व्हिडिओमधून दिसून येत आहे. शेखर पगार यांनी भाषण केल्यावर सुहास कांदेंनी तिकडून शिवीगाळ सुरू केली. पगार हुशार होते त्यांनी माईक समोर मोबाईल धरला. सगळ्या नांदगावमध्ये स्पीकर लावले होते. घाणेरड्या शिव्या आणि दमबाजी दिसून आली. तसेच, विनोद शेलार आणि समीर भुजबळ यांना शिव्या देण्यात आल्या. म्हणूनच भयमुक्त नांदगाव ही टॅगलाईन समीरने घेतली आहे. या क्लिप ऐकल्या तर का घेतली आहे हे सर्वांना समजेल. सामान्य जनता बोलू शकणार नाही असे आहे.  पोलिसांनी आणि महसूल विभागाने कारवाई करायला पाहिजे. अधिकारी प्रेशर खाली काम करत आहे. निवडणूक आयोगाने लक्ष दिले पाहिजे. योग्य ती कारवाई केली पाहिजे. लोकांना भयमुक्त वातावरणात मतदान करू दिले पाहिजे, असे म्हणत त्यांनी सुहास कांदेंवर निशाणा साधला. 

आणखी वाचा 

Sameer Bhujbal : ...म्हणून मी नांदगाव मतदारसंघात आलोय, समीर भुजबळांनी सांगितलं सुहास कांदेंविरोधात अपक्ष लढण्याचं कारण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Union Budget 2025: आयकरपासून, पेन्शन, वंदे भारत, शेतकऱ्यांपर्यंत; आज केंद्रीय अर्थसंकल्पात होणार मोठ्या घोषणा
आयकरपासून, पेन्शन, वंदे भारत, शेतकऱ्यांपर्यंत; आज केंद्रीय अर्थसंकल्पात होणार मोठ्या घोषणा
Budget 2025 Income Tax Slab: मध्यमवर्गीयांना खुशखबर मिळणार, टॅक्स स्लॅबमध्ये महत्त्वपूर्ण बदलांची शक्यता, 10 लाखांपर्यंतच उत्पन्न करमुक्त?
मध्यमवर्गीयांना खुशखबर मिळणार, टॅक्स स्लॅबमध्ये महत्त्वपूर्ण बदलांची शक्यता, 10 लाखांपर्यंतच उत्पन्न करमुक्त?
फेब्रुवारीपासूनच उन्हाचा चटका वाढणार, IMD चा तापमानवाढीचा इशारा, थंडी कितपत राहणार? वाचा सविस्तर
फेब्रुवारीपासूनच उन्हाचा चटका वाढणार, IMD चा तापमानवाढीचा इशारा, थंडी कितपत राहणार? वाचा सविस्तर
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 01 February 2025Top 100 News : टॉप शंभर बातम्यांचा आढावा : 01 February 2025 : ABP MajhaZero Hour | Namdev Shastri On Dhananjay Munde | नामदेवशास्त्रींकडून मुंडेंची पाठराखण,विरोधकांचे सवालZero Hour Full |Namdev Shastri यांच्याकडून पाठराखण, Anjali Damania भगवानगडावर जाणार; पुढे काय घडणार?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Union Budget 2025: आयकरपासून, पेन्शन, वंदे भारत, शेतकऱ्यांपर्यंत; आज केंद्रीय अर्थसंकल्पात होणार मोठ्या घोषणा
आयकरपासून, पेन्शन, वंदे भारत, शेतकऱ्यांपर्यंत; आज केंद्रीय अर्थसंकल्पात होणार मोठ्या घोषणा
Budget 2025 Income Tax Slab: मध्यमवर्गीयांना खुशखबर मिळणार, टॅक्स स्लॅबमध्ये महत्त्वपूर्ण बदलांची शक्यता, 10 लाखांपर्यंतच उत्पन्न करमुक्त?
मध्यमवर्गीयांना खुशखबर मिळणार, टॅक्स स्लॅबमध्ये महत्त्वपूर्ण बदलांची शक्यता, 10 लाखांपर्यंतच उत्पन्न करमुक्त?
फेब्रुवारीपासूनच उन्हाचा चटका वाढणार, IMD चा तापमानवाढीचा इशारा, थंडी कितपत राहणार? वाचा सविस्तर
फेब्रुवारीपासूनच उन्हाचा चटका वाढणार, IMD चा तापमानवाढीचा इशारा, थंडी कितपत राहणार? वाचा सविस्तर
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
Embed widget