एक्स्प्लोर

Maharashtra Assembly Elections 2024 : महायुतीत निफाड मतदारसंघात रस्सीखेच; भाजप नेत्यांनी मांडलं थेट अजित पवारांच्या दरबारी ठाण, नेमकं काय घडतंय?

Niphad Assembly Constituency : नाशिकच्या निफाड विधानसभा मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात जोरदार रस्सीखेच सुरु असल्याचे दिसून येत आहेत. भाजप पदाधिकाऱ्यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे.

नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल वाजले आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली असून नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारांची पहिली यादी (NCP Candidate List) जाहीर केली. या यादीत निफाडच विद्यमान आमदार दिलीप बनकर (Dilip Bankar) यांच्या नावाचा समावेश नाही. त्यातच आता भाजप नेते यतीन कदम (Yatin Kadam) यांनी निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आहे. यतीन कदम शेकडो कार्यकर्त्यांसह अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेण्यासाठी देवगिरी बंगल्यावर रवाना झाले झाले असून त्यांचे समर्थक अजित पवारांच्या बंगल्याबाहेर ठाण मांडून बसले आहेत.

निफाड विधानसभा मतदारसंघाची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे आहे. दिलीप बनकर हे निफाड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत दिलीप बनकर यांचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे निफाडची जागा भाजपला सुटावी किंवा सक्षम उमेदवार असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आपल्याला उमेदवारी मिळावी, या मागणीसाठी यतीन कदम आपल्या समर्थकांसह मुंबईच्या दिशेने रवाना झालेत.

क्विक सर्व्हेतून ठरणार उमेदवारी

यतीन कदम अजित पवारांच्या भेट घेणार आहेत. या जागेचा तिढा सोडवण्यासाठी अजित पवार यांनी क्विक सर्व्हेचा प्रयोग केला आहे. यतीन कदम आणि दिलीप बनकर यांच्यात क्विक सर्व्हे केला जाणार आहे. क्विक सर्व्हेत जो पुढे असेल त्याला उमेदवारी मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. आता या क्विक सर्व्हेत काय समोर येणार? निफाडमधून नक्की कुणाला उमेदवारी मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  

नांदगावमध्ये महायुतीत घमासान 

दरम्यान, नांदगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीत घमासान पाहायला मिळत आहे. कारण महायुतीत ही जागा शिवसेना शिंदे गटाची आहे. विद्यमान आमदार सुहास कांदे यांना पुन्हा एकदा शिंदे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे माजी खासदार समीर भुजबळ हे निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. समीर भुजबळ हे 28 ऑक्टोबरला आपला उमेदवारी अर्ज सादर करणार आहे. समीर भुजबळ नांदगाव विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत. महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाने आपला उमेदवार जाहीर केल्यानंतर समीर भुजबळ यांनी देखील निवडणुकीला सामोरे जाण्याच्या दृष्टीने अपक्ष लढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

आणखी वाचा 

मोठी बातमी : लोकसभेला सर्व्हेच्या नावे जागा सोडल्या, पण आता नाही, एकनाथ शिंदेंची ठाम भूमिका, महायुतीत 30 जागांवरुन रस्सीखेच

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : बारामतीची लढाई ठरली, युगेंद्र पवार अजित पवारांना भिडणार
मोठी बातमी : बारामतीची लढाई ठरली, युगेंद्र पवार अजित पवारांना भिडणार
Maharashtra Assembly Elections 2024 : नाथाभाऊंचा गड भेदण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे मैदानात, तब्बल 40 वर्षानंतर मुक्ताईनगरची जागा शिवसेनेकडे, चंद्रकांत पाटलांचं रोहिणी खडसेंना आव्हान
नाथाभाऊंचा गड भेदण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे मैदानात, तब्बल 40 वर्षानंतर मुक्ताईनगरची जागा शिवसेनेकडे, चंद्रकांत पाटलांचं रोहिणी खडसेंना आव्हान
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : ठाकरेंच्या मागणीनंतर शरद पवारांनी जयंतरावांचा चेहरा आणला, आता काँग्रेसने सुद्धा मोहरा हेरला! नाव समोर येताच नाना पटोले काय म्हणाले?
ठाकरेंच्या मागणीनंतर शरद पवारांनी जयंतरावांचा चेहरा आणला, आता काँग्रेसने सुद्धा मोहरा हेरला! ते नाव समोर येताच नाना पटोले काय म्हणाले?
मोठी बातमी : आमचा एक मेंबर इच्छुक म्हणून जाणार आणि गेम करणार, मनोज जरांगेंना जीवे मारण्याची धमकी
मोठी बातमी : आमचा एक मेंबर इच्छुक म्हणून जाणार आणि गेम करणार, मनोज जरांगेंना जीवे मारण्याची धमकी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray Worli Vidhan Sabha : वरळीत कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, आदित्य ठाकरे अर्ज भरणारDhananjay Munde - Pankja Munde Arti : अर्ज भरण्यापूर्वी पंकजा मुंडेंकडून धनंजय मुंडेंचं औक्षणKiran Samant Ratnagiri Bike : वेळेत अर्ज भरण्याची लगबग,किरण सामंत बाईकवरुन निघालेRadhakrishna Vikhe Patil File Nomination : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : बारामतीची लढाई ठरली, युगेंद्र पवार अजित पवारांना भिडणार
मोठी बातमी : बारामतीची लढाई ठरली, युगेंद्र पवार अजित पवारांना भिडणार
Maharashtra Assembly Elections 2024 : नाथाभाऊंचा गड भेदण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे मैदानात, तब्बल 40 वर्षानंतर मुक्ताईनगरची जागा शिवसेनेकडे, चंद्रकांत पाटलांचं रोहिणी खडसेंना आव्हान
नाथाभाऊंचा गड भेदण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे मैदानात, तब्बल 40 वर्षानंतर मुक्ताईनगरची जागा शिवसेनेकडे, चंद्रकांत पाटलांचं रोहिणी खडसेंना आव्हान
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : ठाकरेंच्या मागणीनंतर शरद पवारांनी जयंतरावांचा चेहरा आणला, आता काँग्रेसने सुद्धा मोहरा हेरला! नाव समोर येताच नाना पटोले काय म्हणाले?
ठाकरेंच्या मागणीनंतर शरद पवारांनी जयंतरावांचा चेहरा आणला, आता काँग्रेसने सुद्धा मोहरा हेरला! ते नाव समोर येताच नाना पटोले काय म्हणाले?
मोठी बातमी : आमचा एक मेंबर इच्छुक म्हणून जाणार आणि गेम करणार, मनोज जरांगेंना जीवे मारण्याची धमकी
मोठी बातमी : आमचा एक मेंबर इच्छुक म्हणून जाणार आणि गेम करणार, मनोज जरांगेंना जीवे मारण्याची धमकी
Nana Patole: उमेदवारी अर्जावरून नाना पटोलेंच्या चंद्रकांत पाटलांना कानपिचक्या, मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून थेटच म्हणाले..
उमेदवारी अर्जावरून नाना पटोलेंच्या चंद्रकांत पाटलांना कानपिचक्या, मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून थेटच म्हणाले..
Dilip Walse Patil: 'घरातील वडीलधारी मंडळी किती मोठी झाली तरी...'; दिलीप वळसे पाटील अन् अजितदादांच्या वक्तव्यात विरोधाभास; नेमकं काय म्हणाले?
'घरातील वडीलधारी मंडळी किती मोठी झाली तरी...'; दिलीप वळसे पाटील अन् अजितदादांच्या वक्तव्यात विरोधाभास; नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Assembly Elections 2024 : 'शरद पवार गट, ठाकरेंच्या शिवसेनेने काँग्रेसला उल्लू बनवलंय'; मविआच्या 85-85-85 फॉर्म्युल्यावरून संजय निरुपम यांनी डिवचलं
'शरद पवार गट, ठाकरेंच्या शिवसेनेने काँग्रेसला उल्लू बनवलंय'; मविआच्या 85-85-85 फॉर्म्युल्यावरून संजय निरुपम यांनी डिवचलं
Avinash Jadhav Thane Vidhan Sabha : केळकर-विचारेंचं आव्हान भेदणार? MNS नेते अविनाश जाधव EXCLUSIVE
Avinash Jadhav Thane Vidhan Sabha : केळकर-विचारेंचं आव्हान भेदणार? MNS नेते अविनाश जाधव EXCLUSIVE
Embed widget