Nashik Crime : नाशिकमध्ये जावईबापूंचा प्रताप, सासुरवाडीतून सासूचे साडे दहा लाखांचे सोनं पळवलं!
Nashik Crime : नाशिकमध्ये (Nashik) जावयाने चक्क सासूचे साडे दहा लाख रुपयांचे दागिने (Theft) चोरल्याची घटना उघडकीस आली आहे.
![Nashik Crime : नाशिकमध्ये जावईबापूंचा प्रताप, सासुरवाडीतून सासूचे साडे दहा लाखांचे सोनं पळवलं! maharashtar news nashik news son in law arrested in nashik as he stolen 10 lakh rupee jewellery Nashik Crime : नाशिकमध्ये जावईबापूंचा प्रताप, सासुरवाडीतून सासूचे साडे दहा लाखांचे सोनं पळवलं!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/29/1afe17d69e8256351433a541d11283c1166444713501789_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nashik Crime : आपल्याकडे जावई म्हटलं कि सासरवाडीकडून लाड पुरविले जातात. पाहुण्यांमध्ये मन सन्मान दिला जातो. मात्र हाच जावई सासरवाडीच्या मुळावर उठल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. एका जावयाने चक्क सासूचे साडे दहा लाख रुपयांचे दागिने चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेची आज सकाळपासुन चर्चा आहे.
नाशिकमध्ये (Nashik) दिवसेंदिवस चोरीच्या (Theft) घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहेत. अनोळखी, सराईत लोकांकडून चोरी होण्याच्या घटना तर घडतच असतात, मात्र आता घरातल्या माणसांकडून देखील आपल्याच घरात चोरी होण्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. अशातच नाशिकमध्ये चोरीच्या घटनेने खळबळ उडाली आहे. दुसरा मुलगाच समजल्या जाणाऱ्या जावयाने (Son In low) सासुरवाडीतच धाडसी चोरी केली आहे. बेरोजगार असलेल्या जावयाने सासूच्या घराची किल्ली चोरत तब्बल साडेदहा लाख रुपयांची चोरी केली केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे संबंधित सासूला जावयाने चांगलाच फटका दिला आहे.
नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून गंगापूर पोलिसांनी (Gangapur Police) संबंधित चोर जावयाला अटक करण्यात आली आहे. सासूने दिलेल्या तक्रारीवरुन गंगापूररोड पोलीस ठाण्यात जावयावर चोरीचा गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. साडेदहा लाखांपैकी साडे नऊ लाखांचे दागिने त्याच्याकडून हस्तगत करण्यात गंगापूर रोड पोलीसांना यश आले आहे. आलोक दत्तात्रय सानप असे अटक केलेल्या जावयाचे नाव असून मखमलाबादरोड परिसरात राहण्यास आहे. तर सासू मीरा शशिकांत गंभिरे यांचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय असून काही दिवसांपूर्वी त्यांच्या ध्रुवनगर येथील घरातून साडेदहा लाखांचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार गंगापूर पोलीस ठाण्यात केली होती.
दरम्यान गंगापूर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून घेत तपासाला सुरुवात केली होती. त्यात तक्रारदार गंभीरे यांच्याच जावयाची देहबोली असलेले सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले होते. त्यांनी त्याला गंगापूर पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यावेळी त्याने रात्री सासूचे दागिने चोरल्याची कबुली पोलीसांना दिली आहे. जावई सानप याने चोरी केल्याच्यानंतर त्याच्याकडून 24 तासाच्या आतमध्ये साडेनऊ लाख रुपयांचे 249 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहे. संशयित आरोपी असलेला आलोक सानप याचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले असून तो सध्या बेरोजगार आहे.
अशी घडली घटना
संशयित आरोपी असलेला आलोक सानप याचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले असून तो सध्या बेरोजगार असून सासूरवाडीला त्याचे नेहमी जाणे येणे होते. काही दिवसांपूर्वी सासू मीरा शशिकांत गंभिरे यांनी ध्रुवनगर येथील बंद घराची किल्ली चोरून साडेदहा लाखांचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार गंगापूर पोलीस ठाण्यात केली होती. त्यातच गंगापूर पोलीसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून घेत तपासाला सुरुवात केली होती. त्यात तक्रारदार गंभीरे यांच्याच जावयाची देहबोली असलेले सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले होते. त्यांनी त्याला गंगापूर पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यावेळी त्याने रात्री सासूचे दागिने चोरल्याची कबुली पोलीसांना दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)