एक्स्प्लोर

Jalgaon News : 'अडीच वर्ष बसले घरी, माहिती घेतात वरी वरी, पण आमचं शासन जातयं घरोघरी; एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

Jalgaon Eknath Shinde : जळगावमध्ये उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शायराना अंदाजात प्रत्युत्तर दिले आहे.

जळगाव : शासन आपल्या दारी (Shasan Apalya Dari) हा कार्यक्रम पाहून अनेक लोकांना पोटदुखी होत आहे. यावर उपाय म्हणून आम्ही लवकरच 'डॉक्टर आपल्या दारी' सुरू करणार आहोत. हा आमचा पब्लिसिटी करण्याचा प्रयत्न नाही. हे बसले अडीच वर्ष घरी, माहिती घेतात वरी वरी, पण आमच शासन जातयं घरोघरी, अशा शायराना अंदाजात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. 

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी पाचोरा (Pachora) शहरात शासन आपल्या दारी कार्यक्रमात उपस्थिती लावल्यानंतर जनतेला संबोधित केले. जळगावमध्ये (Jalgaon) उद्धव ठाकरे यांनी शासन आपल्या दारी कार्यक्रमावर टीका केली होती. या टीकेला एकनाथ शिंदे यांनी शायराना अंदाजात प्रत्युत्तर दिले आहे. शिंदे म्हणाले की, 'हे बसले अडीच वर्ष घरी, माहिती घेतात वरी वरी, पण आमच शासन जातयं घरोघरी. लाभार्थ्यांना नेतंय स्टेजवरी, सामान्यांसाठी अहोरात्री काम करी, म्हणून लाखोंची गर्दी होते, कार्यक्रमावरी, ' अशा अंदाजात उद्धव ठाकरेंना (Udhhav Thackeray) उत्तर दिले आहे. शिवाय लोक उगाच शासना आपल्या दारी कार्यक्रमात येत नाहीत. ते घरी बसले आम्ही लोकांच्या दारी जात आहोत, आम्ही काम करतोय, त्याच गर्दी हे उत्तर असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, अजित दादा (Ajit Pawar) देखील विकासाला पाठिंबा देण्यासाठी राज्य सरकारसोबत आले. देशाला पुढे न्यायचं असेल तर नरेंद्र मोदी यांच्याशिवाय देशाला पर्याय नाही. राज्याला नरेंद्र मोदी यांचा नेहमी पाठिंबा राहतो. हे सरकार 'शासन आपल्या दारी' या माध्यमातून गतिमान झाले. अडीच वर्षे मागचे सरकार थांबले होते. आपण अनेक प्रकल्प सुरू केले. आपण महिलांना 50 टक्के, आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची योजना दिली. पीक विमा योजनेत एक रुपया भरून बाकी सर्व पैसे सरकार भरणार. शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मला अभिमान आहे आणि अडचणी यांची देखील जाण आहे. हे सरकार सर्व सामान्य लोकांना न्याय देणारे आहे. काही ठिकाणी पाऊस कमी पडलाय, ही वस्तूस्थिती असल्याचे शिंदे म्हणाले. 

भेटीमुळे पोटदुखी होत आहे.... 

तसेच दिल्लीत परिषद (G20 Conference) सुरू आहे. जगभरातले 20 देशांचे प्रमुख तिथे आले. त्यांचे बॉडिंग मोदी यांच्यासोबत पाहिली का तुम्ही? आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. तिथल्या ठरावाला मान्यता मिळाली. खऱ्या अर्थाने देश महासत्ता होत आहे. मग का पोटदुखी होत आहे? सरकार गेल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. मी ब्रिटनचे पंतप्रधान यांना भेटलो, तर टीका सुरू झाली. मी काय बोललो, कसं बोललो, यावर चर्चा सुरू झाली. "आम्हाला सगळं माहिती आहे. आम्हाला बोलण्याची वेळ येऊ देऊ नका, नाहीतर पाटणकर काढा घेण्याची वेळ आपल्यावर येईल. मला टीका करायची नाही. मी कुणाला भेटलो तर यांना जळते. यांनी बोलतांनी तारतम्य ठेवावे", असा इशारा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना, त्यांनी तुमचा एकही शब्द खाली पडू दिला नाही. असा कानमंत्रही एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्ष दिला. 


इतर महत्वाची बातमी : 

 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Attacked Case:
"बॉलिवूडवालों डरना..."; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य
Imran Khan : माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
EPFO : पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघडSaif Ali Khan CCTV : तोंड बांधून दबक्या पावलांनी आला, सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV!Saif Ali Khan Health Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहितीSaif Ali Khan Health Update| सैफ अली खानला आज ICU मधून खासगी वॉर्डात शिफ्ट करणार

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Attacked Case:
"बॉलिवूडवालों डरना..."; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य
Imran Khan : माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
EPFO : पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
Pune Nashik Highway Accident : आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
Sanju Samson : संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
Saif Ali Khan Attacked: 'हा' तो नव्हेच...; ताब्यात घेतलेला आरोपी, सैफला चाकू भोसकणारा नाही; पोलिसांची अधिकृत माहिती, तपास सुरूच
'हा' तो नव्हे...; ताब्यात घेतलेला आरोपी, सैफला चाकू भोसकणारा नाही; पोलिसांची अधिकृत माहिती, तपास सुरू
Cidco : सिडकोला नवीन अध्यक्ष मिळणार, मंत्री संजय शिरसाट यांचा कार्यभार संपुष्टात,आमदारांचं लॉबिंग सुरु
संजय शिरसाट सिडकोचा यांचा कार्यभार संपुष्टात, कारण समोर;अध्यक्षपदासाठी आमदारांचं लॉबिंग सुरु
Embed widget