एक्स्प्लोर

Nashik Crime : नाशिकमध्ये मंदिर परिसरात पोत्यात भरलेल्या मानवी कवट्या अन् हाडे सापडल्याने एकच खळबळ

Nashik Crime : पंचवटीमध्ये एरंडवाडी येथील मंदिराच्या परिसरामध्ये मानवी हाडे आणि कवट्या असलेली पोतं मिळाल्याची बातमी समजल्यानंतर पंचवटी पोलिस त्या ठिकाणी तातडीने पोहोचले.

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील (Nashik Crime) पंचवटी शहरामध्ये एका पोत्यामध्ये मानवी कवट्या आणि हाडे सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पंचवटीमधील एरंडवाडीमध्ये मंदिर परिसरात भरवस्तीत पोत्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात हाडे आणि कवट्या मिळाल्यानंतर चांगलीच चर्चा रंगली. पंचवटीमध्ये एरंडवाडी येथील मंदिराच्या परिसरामध्ये मानवी हाडे आणि कवट्या असलेली पोतं मिळाल्याची बातमी समजल्यानंतर पंचवटी पोलिस त्या ठिकाणी तातडीने पोहोचले. पोलिसांनी मानवी हाडे आणि कवट्या असलेलं पोतं ताब्यात घेतलं. दरम्यान, पंचवटी पोलिसांनी याचा सखोल तपास करत ही मानवी हाडे आणि कवट्या प्लास्टिकचे असल्याचे सांगितले. 

अघोरी प्रकार करण्यासाठी हा प्रकार?

दरम्यान, अघोरी प्रकार करण्यासाठी ही हाडे आणि कवट्या आणल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र, भरवस्तीमध्ये मानवी कवट्या सापडल्याने एकच खळबळ उडाली. तथापि, कवट्या खऱ्या नसल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, यामागे सूत्रधार कोण हा प्रश्न मात्र अजून गुलदस्त्यात आहे. पंचवटी पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला आहे. पोलिसांनी हा अघोरी प्रकार कोणी केला याची माहिती घेण्यासाठी मंदिरातील पुजारी आणि इतर नागरिकांना तपासण्यासाठी बोलावून घेत चौकशी केली. मंदिर परिसरामध्ये हाडे आणून नेमका कोणता प्रकार केला हे आता पोलीस तपासानंतर समोर येणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding : सोनाक्षी-जहीर अडकले लग्नबंधनात, नवदाम्पत्य पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर

VIDEO : ऑस्ट्रेलियाच्या अडचणी वाढल्या, IND vs AUS सामन्यावर मुसळधार पावसाचे सावट! 

टीम इंडिया कांगारुचा पत्ता कट करणार का? ऑस्ट्रेलियासाठी 'करो या मरो' सामना, पाहा काय म्हणतात सुनंदन लेले?

कोंडेश्वर धबधब्याचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक दाखल, स्टंटबाजीमुळे जीवितहानीचा धोका
कोंडेश्वर धबधब्याचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक दाखल, स्टंटबाजीमुळे जीवितहानीचा धोका
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Special Report Parliament Session : लोकसभेचं पहिलं अधिवेशन सोमवारपासून,  लोकसभेचा अध्यक्ष कोण ?Special Report Pune Drugs :  पुणे नशेच्या विळख्याने बरबटलं? ड्रग्ज प्रकरणी राजकीय आरोपांच्या फैरीSonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding : सोनाक्षी-जहीर अडकले लग्नबंधनात, नवदाम्पत्य पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोरNEET Result Row : 'नीट' घोटाळ्याचे कनेक्शन लातूरपर्यंत, दोन शिक्षकांची कसून चौकशी Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding : सोनाक्षी-जहीर अडकले लग्नबंधनात, नवदाम्पत्य पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर
Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding : सोनाक्षी-जहीर अडकले लग्नबंधनात, नवदाम्पत्य पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर
VIDEO : ऑस्ट्रेलियाच्या अडचणी वाढल्या, IND vs AUS सामन्यावर मुसळधार पावसाचे सावट! 
VIDEO : ऑस्ट्रेलियाच्या अडचणी वाढल्या, IND vs AUS सामन्यावर मुसळधार पावसाचे सावट! 
टीम इंडिया कांगारुचा पत्ता कट करणार का? ऑस्ट्रेलियासाठी 'करो या मरो' सामना, पाहा काय म्हणतात सुनंदन लेले?
टीम इंडिया कांगारुचा पत्ता कट करणार का? ऑस्ट्रेलियासाठी 'करो या मरो' सामना, पाहा काय म्हणतात सुनंदन लेले?
कोंडेश्वर धबधब्याचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक दाखल, स्टंटबाजीमुळे जीवितहानीचा धोका
कोंडेश्वर धबधब्याचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक दाखल, स्टंटबाजीमुळे जीवितहानीचा धोका
आधी जॉर्डनने हॅट्ट्रिक घेतली, नंतर बटलरने एकाच षटकात 5 षटकार ठोकले, इंग्लंडचा 10 विकेटनं विजय 

भारताच्या पोरी जगात भारी, दक्षिण आफ्रिकेचा उडवला धुरळा, मालिका 3-0 ने खिशात!  

नोव्हेंबरनंतर महाराष्ट्रात आपलाच मुख्यमंत्री, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य; शिवसेना मेळाव्यातून फटकेबाजी

बीडमधील पोलीस भरतीची मैदानी चाचणी रद्द, पावसामुळे चिखल; पोलीस अधीक्षकांनी दिली नवी तारीख

Embed widget