'दहशतवाद्यांना पोसणाऱ्यांवर कारवाई करा', नाशिकमध्ये नितेश राणेंच्या उपस्थितीत हिंदू जन आक्रोश मोर्चा
Nashik News : भाजप आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चाला काढण्यात आला. यावेळी जिल्हा प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
Nashik News नाशिक : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चाला (Hindu Jan Akrosh Morcha) काढण्यात आला. वक्फ बोर्ड रद्द झालेच पाहिजे, मोठ्या प्रमाणावर झालेले अल्पसंख्याकांचे अतिक्रम हटवावे, दहशवाद्यांना पोसणाऱ्यांवर कडक कारवाई झालीच पाहिजे, उत्तर प्रदेशाप्रमाणे महाराष्ट्रात सुध्दा हलाल सर्टिफिकेट देणे बंद करावे, या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.
बी. डी. भालेकर मैदानावरुन मार्गस्थ झालेला मोर्चा शालिमार, शिवाजी रोडमार्गे डॉ. आंबेडकर पुतळा, बागुल कॉर्नर, गाडगे महाराज पुतळा, धुमाळ पॉइंट, रेडक्रॉस सिग्नल, मेहेर सिग्नलमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचला. जिल्हा प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यानंतर सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. यावेळी काजल हिंदुस्थानी, सुरेश चव्हाणके उपस्थित होते.
10 लाख एकर जमीन इसाई बोर्डकडे - सुरेश चव्हाणके
यावेळी सुरेश चव्हाणके म्हणाले की, वक्फ बोर्डाच्या जमिनी परत घ्यायच्या आहेत. नाशिकमध्ये महिश्वरी समाजाने जमीन घेतली, त्यावर वक्फ बोर्डाचे नाव लागले. 10 लाख एकर जमीन इसाई बोर्डकडे आहे. 15 लाख 619 एकरहून अधिक जमीन वक्फ बोर्डाकडे आहे. हिंदू पैसे कमवीत आहेत आणि ते लोकसंख्या वाढवीत आहेत. आपल्या पूर्वजांमुळे आपण हिंदू आहोत, असे ते म्हणाले.
प्रत्येकाला 500 वर्ष लागले तर चालेल का? - सुरेश चव्हाणके
ते पुढे म्हणाले की, आपल्यासारखे हिंदू पाकिस्तानमध्येही होते. काश्मीरमध्येही हिंदूंवर अत्याचार झाले. नाशिकचे भद्रकाली मंदिर कुठे गेले. 500 वर्षानंतर राम मंदिराची जमीन मिळाली. पण प्रत्येकाला 500 वर्ष लागले तर चालेल का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
उत्तर प्रदेश मार्केटिंग करू शकते मग महाराष्ट्र का नाही? - सुरेश चव्हाणके
त्र्यंबकेश्वर मंदिराचा नवनिर्माण नानासाहेब पेशवे यांनी केला. हलाल सर्टिफिकेट कोण देतं, हे आपण बघतो का?मंदिराच्या बाहेर देवाला न मानणाऱ्या लोकांचे दुकाने आहेत. उत्तर प्रदेश आपलं मार्केटिंग करू शकते मग महाराष्ट्र, नाशिक का नाही? असेही त्यांनी म्हटले.
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
दरम्यान, सकल हिंदू समाज जन आक्रोश मोर्चाला शहर पोलीस आयुक्तालयाने कडेकोट बंदोबस्त तैनात केला. चोख बंदोबस्त असल्याने मोर्चास कुठेही गालबोट लागले नाही. मोर्चासाठी दंगल नियंत्रण पथक, राज्य राखीव पोलिस दलासह दहशतवादी विरोधी कक्षाच्या पथकांसह शहरातील तीन सहायक आयुक्तांसह पाचशेपेक्षा जास्त अंमलदारांच्या बंदोबस्त होता.
आणखी वाचा
Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांचा छगन भुजबळांना मोलाचा सल्ला; म्हणाले, "आपण ओबीसी संघटनेचे..."