गोडसेंचं देवदर्शन ते प्रचार अन् दुसरीकडे भुजबळांची मुंबईत फिल्डिंग, नाशिक लोकसभेला महायुतीमधून 'मॅन ऑफ द मॅच' कोण?
Hemant Godse vs Chhagan Bhujbal : हेमंत गोडसे हे देवदर्शन, प्रचार दौरे करत आहेत. तर छगन भुजबळ मुंबईत तिकीटासाठी फिल्डिंग लावत आहेत. आता नाशिक लोकसभेला 'मॅन ऑफ द मॅच' कोण? याकडे लक्ष लागले आहे.
Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिकच्या जागेचा तिढा महायुतीत (Mahayuti) अद्याप सुटलेला नाही. शिवसेना शिंदे गट (Shiv Sena Shinde Group) आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून (NCP Ajit Pawar Group) या जागेवर दावा करण्यात आला आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाकडून सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
महायुतीत एकीकडे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) हे पुन्हा एकदा उमेदवारीसाठी वारंवार ठाणेवारी करत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी माझे नाव दिल्लीतून चर्चेत आले असे म्हणत नाशिकच्या जागेवर दावा ठोकला आहे.
हेमंत गोडसेंचे देवदर्शन आणि प्रचार दौरे
महायुतीच्या (Mahayuti Seat Sharing) नाशिक टीममधून मॅन ऑफ दी मॅच कोण ठरणार? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागल असून नाशिकच्या जागेचा (Nashik Lok Sabha Constituency) तिढा अद्याप सुटलेला नाही. विद्यमान खासदार हेमंत गोडसेंचे दोन दिवसांपासून देवदर्शन सुरू असून रामनवमीच्या दिवशी काळाराम मंदिर (Kalaram Mandir), गुरुवारी अयोध्येत रामल्लाचे (Ayodhya Ram Mandir) दर्शन घेतल्यानंतर आज सकाळी त्र्यंबकेश्वरला (Trimbakeshwar) महादेवासमोर ते नतमस्तक झाले होते. विशेष म्हणजे त्र्यंबकराजाचे दर्शन घेतल्यानंतर आदिवासी पाड्यांवर त्यांनी आपला प्रचार दौराही सुरू केलाय.
छगन भुजबळांची मुंबईत जोरदार फिल्डिंग
तर दुसरीकडे छगन भुजबळ रामनवमीपासून मुंबईत तळ ठोकून असून आजचा नाशिक दौराही त्यांनी अचानक रद्द केलाय. आज रात्री मुख्यमंत्री किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत भुजबळांची भेट होण्याची शक्यता आहे. एकीकडे पहिल्या टप्प्यातील मतदानाचा दिवस येऊन देखिल दुसरीकडे नाशिकसाठी महायुतीचा उमेदवार निश्चित होत नसल्याने हा चर्चेचा विषय ठरतोय. नाशिकमधील तिनही पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सध्या संभ्रमावस्थेत आहेत.
छगन भुजबळांची आज पत्रकार परिषद
तर आज दुपारी तीन वाजता मंत्री छगन भुजबळ हे मुंबई येथील राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार पत्रकार परिषदेत ते काही मोठी घोषणा करणार का? नाशिकच्या जागेबाबत ते काय बोलणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
नाशिकच्या उमेदवारीवरुन छगन भुजबळांचा संताप; महायुतीच्या नेत्यांनाच दिली डेडलाईन
हेमंत गोडसे छगन भुजबळांच्या पाया पडले, काळाराम मंदिरात भेट; नेमकं काय घडलं?