एक्स्प्लोर

Abu Salem : कुख्यात गँगस्टर अबू सालेमला आज पुन्हा नाशिकला आणणार; 'या' कारणासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्तात हलवलं होतं दिल्लीला

Abu Salem : कुख्यात गँगस्टर अबू सालेमला काही दिवसांपूवी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून दिल्लीला हलवण्यात आले होते. आता पुन्हा अबू सालेमला नाशिकला आणण्यात येणार आहे.

नाशिक : कुख्यात गँगस्टर अबू सालेमला (Abu Salem) नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून (Taloja Jail) कडेकोट बंदोबस्त आणि कमालीची गोपनीयता पाळत नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात (Nashikroad Central Jail) आणण्यात आले होते. कारागृहातील अंडासेलमध्ये (Anda Cell) त्याला ठेवण्यात आले होते. मात्र दोन दिवसांपूर्वी मोठ्या पोलीस बंदोबस्तात नाशिकरोड रेल्वे स्थानकावरून (Nashikroad Railway Station) एका रेल्वेने अबू सालेम दिल्लीत हलवण्यात आले होते. आता कुख्यात गँगस्टर अबू सालेमला आज पुन्हा नाशिकला आणले जाणार आहे. 

अबू सालेम हा मुंबई साखळी बॉम्ब स्फोटातील (Mumbai Bomb Blast Case) प्रमुख आरोपी आहे. गेल्या महिन्याभरापासून अबू सालेमचा मुक्काम नाशिकरोड कारागृहातील अंडासेलमध्ये होता. तळोजा कारागृहातून सुरक्षेच्या कारणास्तव अबू सालेमचा नाशिकच्या कारागृहात हलवण्यात आले होते. मात्र दोन दिवसांपूर्वी अबू सालेमला महत्त्वपूर्ण सुनावणीसाठी कोर्टात (Court) हजर करण्यासाठी कडेकोट बंदोबस्तात दिल्ली येथे हलवण्यात आले. 

अबू सालेमला 10 सप्टेंबरला पुन्हा कोर्टात करणार हजर

त्यानंतर गँगस्टर अबू सालेमला आज पुन्हा नाशिकमध्ये आणले जाणार आहे. 2002 मध्ये खंडणी प्रकरणी दिल्लीच्या पटीयाला कोर्टात अबू सालेमला हजर करण्यात आले. अदानी यांच्याकडून खंडणी मगितल्या प्रकरणी अबू सालेमला कोर्टात हजर केले होते. मात्र, ज्या कोर्टात अबू सालेमला हजर करण्यात येणार होते, ते कोर्ट हजर नसल्याने 10 सप्टेंबरला अबू सालेमला पुन्हा कोर्टात हजर केले जाणार असल्याची माहिती वकील यतीश देसले यांनी दिली आहे.  

मोठ्या पोलीस बंदोबस्तात रेल्वेने नेले होते दिल्लीला

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी अबू सालेमला दिल्ली येथे हलवताना नाशिकरोड कारागृहाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसंच, ब्लॅक कॅट कमांडोदेखील (Black Cat Commando) सुरक्षेच्या कारणास्तव तैनात करण्यात आले होते. यामुळे नाशिकच्या रेल्वेस्टेशनसह जेलरोड (Jailroad) परिसराला छावणीचे स्वरुप आले होते. सुरक्षेच्या कारणास्तव हे शहर कोणते आहे? याचा मात्र खुलासा अद्याप करण्यात आला नव्हता. अबू सालेमला त्याची हत्या केली जाईल अशी भीती होती, त्यामुळं त्याला दुसऱ्या शहरात हलवण्यात आल्याची चर्चा रंगली होती. मात्र आता त्याला कोर्टात नेले असल्याचे समोर आले आहे. ज्या रेल्वेतून अबू सालेमला नेण्यात आले होते. त्या रेल्वेच्या विशेष बोगीची श्वान पथकाकडून तपासणीदेखील करण्यात आली होती. आता अबू सालेमला पुन्हा एकदा नाशिकमध्ये आणण्यात येणार आहे. 

आणखी वाचा 

Abu Salem Case: अबू सालेमला दिलेली शिक्षा योग्यच; जन्मठेपेविरोधात सालेमनं दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तुमचे कलेक्टर कोण? आयडेंटीटी दाखवा, अपॉईंटमेंट लेटर दाखवा; बॅग तपासणाऱ्यांना ठाकरेंचे सवाल
तुमचे कलेक्टर कोण? आयडेंटीटी दाखवा, अपॉईंटमेंट लेटर दाखवा; बॅग तपासणाऱ्यांना ठाकरेंचे सवाल
आधी बॅगांची तपासणी, आता हेलिकॉप्टरचे उड्डाणही रोखले; मोदींचं कारण ठाकरेंना हेलिपॅडवरच थांबवले
आधी बॅगांची तपासणी, आता हेलिकॉप्टरचे उड्डाणही रोखले; मोदींचं कारण ठाकरेंना हेलिपॅडवरच थांबवले
Maharashtra Assembly Elections 2024 : नाशिकमध्ये मुस्लीम बांधवांचा मोठा निर्णय! पक्षाला नव्हे तर मनसेच्या उमेदवाराला जाहीर केला पाठिंबा
नाशिकमध्ये मुस्लीम बांधवांचा मोठा निर्णय! पक्षाला नव्हे तर मनसेच्या उमेदवाराला जाहीर केला पाठिंबा
CM Eknath Shinde : संतोष कटकेने अपशब्द वापरले, मुख्यमंत्र्‍यांनी गाडीतून उतरुन जाब विचारला
CM Eknath Shinde : संतोष कटकेने अपशब्द वापरले, मुख्यमंत्र्‍यांनी गाडीतून उतरुन जाब विचारला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar On Uddhav Thackeray Bag Check : लोकसभेवेळी मुख्यमंत्र्यांच्या बॅगाही तपासल्या, आयोगाला अधिकारHarshvardhan Jadhav Vs Sanjana Jadhav : नवरा-बायकोच्या लढाईत कोण जिंकणार? कन्नडकरांचा कौल कुणाला?Virendra Jagtap Maharashtra Farmers: शेतकरी दारु पितात म्हणून किडनी-कर्करोगाचे आजारSantosh Katke Join Uddhav Thackeray Shivsena : मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणा देणाऱ्या संतोष कटकेंचा ठाकरे गटात प्रवेश

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तुमचे कलेक्टर कोण? आयडेंटीटी दाखवा, अपॉईंटमेंट लेटर दाखवा; बॅग तपासणाऱ्यांना ठाकरेंचे सवाल
तुमचे कलेक्टर कोण? आयडेंटीटी दाखवा, अपॉईंटमेंट लेटर दाखवा; बॅग तपासणाऱ्यांना ठाकरेंचे सवाल
आधी बॅगांची तपासणी, आता हेलिकॉप्टरचे उड्डाणही रोखले; मोदींचं कारण ठाकरेंना हेलिपॅडवरच थांबवले
आधी बॅगांची तपासणी, आता हेलिकॉप्टरचे उड्डाणही रोखले; मोदींचं कारण ठाकरेंना हेलिपॅडवरच थांबवले
Maharashtra Assembly Elections 2024 : नाशिकमध्ये मुस्लीम बांधवांचा मोठा निर्णय! पक्षाला नव्हे तर मनसेच्या उमेदवाराला जाहीर केला पाठिंबा
नाशिकमध्ये मुस्लीम बांधवांचा मोठा निर्णय! पक्षाला नव्हे तर मनसेच्या उमेदवाराला जाहीर केला पाठिंबा
CM Eknath Shinde : संतोष कटकेने अपशब्द वापरले, मुख्यमंत्र्‍यांनी गाडीतून उतरुन जाब विचारला
CM Eknath Shinde : संतोष कटकेने अपशब्द वापरले, मुख्यमंत्र्‍यांनी गाडीतून उतरुन जाब विचारला
Crime News: रस्त्यात अडवून मारहाण, मैत्रिणीचा जबडा केला फ्रॅक्चर, पुण्यातील धक्कादायक प्रकार, नेमकं काय घडलं?
रस्त्यात अडवून मारहाण, मैत्रिणीचा जबडा केला फ्रॅक्चर, पुण्यातील धक्कादायक प्रकार, नेमकं काय घडलं?
Eknath Shinde: गद्दार म्हणताच एकनाथ शिंदेंच्या डोक्यात तिडीक गेली, गाडीतून उतरुन रागात नसीम खान यांच्या कार्यालयात शिरले अन्...
गद्दार म्हणताच एकनाथ शिंदेंच्या डोक्यात तिडीक गेली, गाडीतून उतरुन रागात नसीम खान यांच्या कार्यालयात शिरले अन्...
शिंदेंकडील 8 आमदार 1 मंत्री परत येणार, आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर श्रीकांत शिंदेंचा पलटवार; दिलं चॅलेंज
शिंदेंकडील 8 आमदार 1 मंत्री परत येणार, आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर श्रीकांत शिंदेंचा पलटवार; दिलं चॅलेंज
Video: मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची दुसऱ्यांदा बॅग तपासली; दरवेळेला मीच पहिला गिऱ्हाईक म्हणत ठाकरेंकडून पुन्हा व्हिडीओ शूट
Video: मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची दुसऱ्यांदा बॅग तपासली; दरवेळेला मीच पहिला गिऱ्हाईक म्हणत ठाकरेंकडून पुन्हा व्हिडीओ शूट
Embed widget