एक्स्प्लोर

Bhavali Dam : भावली धरणात डुबकी मारणं बेतलं जीवावर, नाशिकच्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी अंत

Nashik News : इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरात पर्यटनासाठी गेलेल्या पाच जणांचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. हे सर्वजण नाशिकरोड येथील गोसावीवाडीतील रहिवासी होते.

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) भावली धरण (Bhavali Dam) परिसरात पर्यटनासाठी गेलेल्या पाच जणांचा धरणात बुडून (Drown) मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजता घडली. मृतांमध्ये तीन मुलींसह दोन तरुणाचा समावेश आहे. हे सर्वजण नाशिकरोड (Nashikroad) येथील गोसावीवाडीतील रहिवासी आहेत. या घटनेमुळे गोसावीवाडी परिसरावर शोककळा पसरली आहे.

हनीफ अहमद शेख (24), अनस खान दिलदार खान (15), नाझिया इमरान खान (15), मीजबाह दिलदार खान (16) आणि ईकरा दिलदार खान (14 सर्व रा. गोसावीवाडी, नाशिकरोड) अशी मृतांची नावे आहेत. भावली धरणात सायंकाळी 5 वाजता खेळत असताना तोल गेल्याची माहिती इगतपुरी पोलिसांनी (Igatpuri Police) दिली आहे.  

भावली धरण परिसरात गेले होते फिरण्यासाठी 

याबाबत अधिक माहिती अशी की, गोसावीवाडी (Gosaviwadi) येथून मंगळवारी (दि. २१) साडेतीन वाजता हनीफ शेख हे त्यांच्या बहिणीच्या मुली व मुलांसह फिरण्यासाठी भावली धरण परिसरात गेले. शेख हे रिक्षा चालक असून, रिक्षेतूनच पाचही जणांनी प्रवास केला. यापूर्वीही ते भावली धरणात फिरण्यासाठी गेल्याने त्यांनी पुन्हा तेच ठिकाण निवडले. 

पाण्यात डुबकी मारण्याचा निर्णय जीवावर बेतला

भावली धरण परिसरात पर्यटनाचा आनंद लुटल्यांतर धारण्याच्या पाण्यात डुबकी मारण्याचा धाडसी निर्णय या तरुणांनी घेतला आणि तोच त्यांच्या जीवावर बेतला. पाण्यात सुरुवातीला दोन जण बुडत होते. त्यांना वाचविण्यासाठी इतरांनी उडी मारली आणि एका पाठोपाठ 5 जणांचा मृत्यू झाला. या प्रकाराची माहिती मिळताच परिसरातील आदिवासींनी धाव घेतली व या घटनेची माहिती इगतपुरी पोलिसांना कळवली. 

धरण परिसरात सुरक्षा रक्षक नाही

पथकाने धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने पाचही जणांना बाहेर काढले. त्यांना इगतपुरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच शेख व खान कुटुंबीय इगतपुरीकडे रवाना झाले. गोसावी वाडीत घटना वाऱ्यासारखी पसरताच स्थानिक नागरिकांनी गर्दी केली. तर नातेवाईक हे रुग्णालयात दाखल झाले. धरण परिसरात ही सुरक्षा रक्षक नसल्यानं धरण सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आलाय.

इतर महत्वाच्या बातम्या 

Ujani Dam Boat Overtured : पाहुण्याच्या जागरण गोंधळ कार्यक्रमाला निघाले, मध्येच वादळ आलं अन् बोट बुडाली; सहा जण बेपत्ता, पहाटेच शोधमोहिमेला पुन्हा सुरुवात

आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा रश्मी ठाकरेंचा आग्रह परंतु शरद पवारांनी दिला नकार, राष्ट्रवादीच्या नेत्याचा गौप्यस्फोट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
Suresh Dhas : हाके साहेब पाया पडतो, कुणाची पण उचल घेऊन कुणीकडेही बोलत जाऊ नका, प्रकाश शेडगेंना सुद्धा वडिलांची आठवण करून देत सुरेश धसांचा हल्लाबोल!
हाके साहेब पाया पडतो, कुणाची पण उचल घेऊन कुणीकडेही बोलत जाऊ नका, सुरेश धसांचा सडकून प्रहार
Suresh Dhas : अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
...तर हा मोक्का आम्हाला मान्य नाही, राज्य बंद पाडू; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
...तर हा मोक्का आम्हाला मान्य नाही, राज्य बंद पाडू; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas Speech Dharashiv| वाल्या काका दीड नाही 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचं आक्रमक भाषण!Vaibhavi Deshmukh Dharashiv : हुंदका दाटला, डोळे भरले! बापासाठी लेकीचं भाषणच वैभवी देशमुख UNCUTABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 11 January 2025Sandeep Kshirsagar Dharashiv Speech : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्याशिवाय शांत बसणार नाही

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
Suresh Dhas : हाके साहेब पाया पडतो, कुणाची पण उचल घेऊन कुणीकडेही बोलत जाऊ नका, प्रकाश शेडगेंना सुद्धा वडिलांची आठवण करून देत सुरेश धसांचा हल्लाबोल!
हाके साहेब पाया पडतो, कुणाची पण उचल घेऊन कुणीकडेही बोलत जाऊ नका, सुरेश धसांचा सडकून प्रहार
Suresh Dhas : अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
...तर हा मोक्का आम्हाला मान्य नाही, राज्य बंद पाडू; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
...तर हा मोक्का आम्हाला मान्य नाही, राज्य बंद पाडू; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
Hemant Nimbalkar : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
हेमंत निंबाळकर : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
Santosh Deshmukh Case : माझ्या वडिलांचा खून झाला, 18 वर्षे खटला सुरूय; पण देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी केस फास्टट्रॅकवर चालवा; ओमराजे निंबाळकर कडाडले
माझ्या वडिलांचा खून झाला, 18 वर्षे खटला सुरूय; पण देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी केस फास्टट्रॅकवर चालवा; ओमराजे निंबाळकर कडाडले
संतोष देशमुखांची दीड कोटीसाठी हत्या, वाल्याकाका दीड नाहीतर 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचा हल्लाबोल
संतोष देशमुखांची दीड कोटीसाठी हत्या, वाल्याकाका दीड नाहीतर 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
Embed widget