Kisan Sabha Protest : कडाक्याच्या थंडीतही नाशिकमधील शेतकरी आंदोलन सुरूच; आज तोडगा निघणार का?
Kisan Sabha Protest : आज पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीत तोडगा निघतो का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Kisan Sabha Protest : नाशिकमध्ये वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाला असून, अचानक थंडीमध्ये मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळत आहे. उबदार कपडे घातल्याशिवाय घराबाहेर पडणेही अवघड झालेले असतांनाच, दुसरीकडे मात्र या थंडीत आदिवासी शेतकरी (Farmers) बांधवांनी कुडकुडत रात्र रस्त्यावर काढलीय. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या त्यांच्या आंदोलनाचा (Protest) आठवा दिवस आहे. प्रशासनासोबतच्या पाच बैठका त्यांच्या निष्फळ ठरल्या असून, आज पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीत तोडगा निघतो का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (Farmers Protest In Nashik)
आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी मागील गेल्या आठ दिवसांपासून शेतकऱ्यांचे नाशिक जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत शेतकरी आणि प्रशासनाच्या पाच बैठका झाल्या आहेत. मात्र, सर्व बैठका निष्फळ ठरल्याने अजूनही कोणताही तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे आठव्या दिवशी देखील आंदोलन सुरूच आहे. दरम्यान, आजच्या बैठकीत काही तोडगा निघतो का? हे पाहणं महत्वाचे असणार आहे.
आंदोलकांनी थंडीत काढली रात्र...
राज्यातील अनेक भागात रात्रीपासून गारवा वाढला आहे. नाशिक शहरात देखील अचानक थंडी वाढली आहे. याच थंडीचा फटका आंदोलक शेतकरी यांना देखील बसला आहे. उबदार कपडे घातल्याशिवाय घराबाहेर पडणेही अवघड असल्याचे चित्र सर्वत्र शहरात पाहायला मिळत आहे. मात्र, याच थंडीत आदिवासी शेतकरी बांधवांनी कुडकुडत रात्र रस्त्यावर काढली. अनेक शेतकऱ्यांकडे उबदार कपडे नसल्याने त्यांना थंडीचा त्रास सहन करावा लागला. मात्र,तरीही शेतकरी आपल्या आंदोलनावर आणि मागण्यांवर ठाम आहेत.
प्रमुख मागण्या...
- शेतकऱ्यांच्या शेतीला 24 तास वीज द्यावी, शेतकऱ्यांची थकीत वीज बिले माफ करावीत.
- जेष्ठ नागरीकांना व इतरांना लागू असलेली वृध्दापकाळ पेन्शन योजनेची रक्कम 1500/- रूपयावरून 4000रूपयापर्यंत वाढवावी.
- रेशन कार्ड वरील दरमहा मिळणारे मोफत धान्यसह विकतचे धान्य पुन्हा सुरु करावे .
- 2005 नंतर भरती झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी,
- साठ वर्षे वयावरील सर्व नागरिकांना दरमहा दहा हजार रुपये पेन्शन द्यावी.
- कंत्राटी नोकरभरती बंद करा व सर्व रिक्त पदावर सरळ सेवाभरती पूर्वी प्रमाणे करा. आदिवासी दलित त्यांची सर्व रिक्त पदावर त्वरित भरती करा, गरीब शेतकरी, शेतमजूर, बांधकाम व कंत्राटी कामगार, झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीबांना मिळणाऱ्या प्रधान मंत्री आवास योजना व शबरी घरकुल योजनांचे अनुदान 5 लाख करावे.
- वंचित गरीब लाभार्थ्यांचा नवीन सर्वेकरून त्यांची नावे 'ड' च्या प्रतिक्षा यादीत समाविष्ट करावीत.
- अंगणवाडी कार्यकर्ती/मोनी अंगणवाडी / मदतनीस, आशा वर्कर, आशा सुपरवाझर, शालेय पोषण आहार कर्मचारी, ग्रामपंचायतीचे डाटा ऑपरेटर, ग्रामरोजगार सेवक, अशा जनतेशी निगडीत असणाऱ्या कर्मऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून घोषीत करून त्यांना शासकीय कायद्याने प्रमाणित करून शासकीय वेतन श्रेणी व पेन्शन लागू करावी. तोपर्यंत दरमहा 26 हजार रुपये किमान वेतन द्या.
- नाशिक जिल्ह्यातील औद्योगिक कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हास्तरीय समस्या निवारण समिती गठित करा,
- विविध उद्योगातील कामगारांच्या किमान वेतनात सुधारणा करून ते कायद्याने 26 हजार रुपये दरमहा निश्चित करा
- प्रत्येक तालुक्यात ईएसआयचे दवाखाने सुरू करून सातपूरच्या ई एस आय हॉस्पिटलमध्ये रिक्त पदे भरा व सर्व अद्यावत सुविधा उपलब्ध करा,
अनिल प्रिंटर ,शाम इलेक्ट्रॉमेक, ऑटोफिट, क्राऊन क्लोजर, सिमेघ, एमजी इंडस्ट्री, सागर इंजिनिअरिंग, नाशिक फोर्ज,प्रीमियम टूल्स, हिंदुस्तान नॅशनल ग्लास, डायनामिक प्रेस्टीज,नाश ग्रुप,आशा मल्टी लेवल, हाय मीडिया लॅबोरेटरी इंडस्ट्री, वंदना डिस्टिलरी, हेक्झागान न्यूट्रिशन, इनफीलूम इंडिया,वीर इलेक्ट्रो इंजीनियरिंग, केटाफार्मा इत्यादी कामगारांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न सोडवा, - शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी उद्योगात वर्षानुवर्षे कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगार कर्मचाऱ्यांना कायम करण्यात यावे
- कंत्राटी कामगारांना दरमहा 26 हजार रुपये किमान वेतन द्यावे, कंत्राटदार बदलला तरी कामगारांना बदलू नये, युनियन केल्यानंतर कामावरून कमी केलेल्या कंत्राटी कामगारांना कामावर घ्यावे
इतर महत्वाच्या मागण्या :
Kisan Sabha Protest : लाल वादळाचा नाशिकमधील मुक्काम वाढला, आतापर्यंत पाच बैठका निष्फळ