धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे शांतीगिरी महाराजांच्या भेटीला, नाशिक लोकसभेबाबत मोठ्या निर्णयाची शक्यता
Nashik Lok Sabha Election : धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी नाशिकला शांतीगिरी महाराजांची भेट घेतली आहे. यावेळी शांतीगिरी महाराजांनी नाशिक लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे वक्तव्य केले आहे.
Dr Subhash Bhamre meets Shantigiri Maharaj : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) शांतिगिरी महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी डॉ. सुभाष भामरे (Dr Subhash bhamre) नाशिकमध्ये दाखल झाले. डॉ. सुभाष भामरे हे धुळ्याचे विद्यमान खासदार असून आणि 2024 लोकसभेचे भाजपचे अधिकृत उमेदवारही आहेत. तसेच शांतिगिरी महाराज (Shantigiri Maharaj) हे नाशिक लोकसभा मतदारसंघातून (Nashik Lok Sabha Constituency) निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. या दोघांमध्ये काय चर्चा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
डॉ. सुभाष भामरे यांनी यांनी शांतिगिरी महाराजांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, शांतिगिरी महाराज यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी आज आलो होतो. राजकीय भेट नाही. फक्त दर्शनासाठी आलो आहे. त्यांचे भक्त गण मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांच्या संपर्कात मी आहे.
मला बाबांचे आशीर्वाद मिळाले - डॉ. सुभाष भामरे
ग्रामीण भागात मी सिंचनाचे काम केले आहे. मला बाबांचे आशीर्वाद मिळाले आहेत. मी लहान कार्यकर्ता आहे. बाबांसंदर्भात वरिष्ठ नेते निर्णय घेतील. बाबा नाशिकमधून अपक्ष निवडणूक लढत आहेत. मात्र त्यांना पाठिंबा देण्याचा विषय हा वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.
शांतीगिरी महाराज निवडणूक लढवण्यावर ठाम
यावेळी शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) म्हणाले की, इथे बाबांचा धर्मपीठ आहे. हे धर्मपीठ सर्वांसाठी खुले आहे. जे श्रध्देने इथे येतात त्या सगळ्यांना आशीर्वाद मिळतो. मी निवडणूक लढवण्यावर ठाम आहे आणि मी जिंकून येणार आहे. आमची कमिटी विविध पक्षांसोबत चर्चा करत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
कोण आहेत शांतीगिरी महाराज?
शांतीगिरी महाराज हे जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी आहेत. शांतीगिरी महाराजांचा मोठा भक्त परिवार आहे. देशभरात त्यांचे 115 आश्रम असून ते 7 गुरुकुल देखील चालवितात. अनुष्ठानच्या माध्यमातून शांतीगिरी महाराजांनी व्यसनमुक्तीसाठी मोठं कार्य केले आहे. शांतिगिरी महाराजांना मौनीगिरी महाराज असेही म्हटले जाते. या आधी शांतिगिरी महाराजांनी तब्बल 12 वर्ष मौन पाळले होते. आतादेखील अनुष्ठानाच्या काळात ते मौन धारण करतात. भजन, प्रवचन, अनुष्ठान, सत्संगच्या माध्यमातून धार्मिक कार्यात ते सातत्याने पुढाकार घेतात.
इतर महत्वाच्या बातम्या
Nashik Lok Sabha : ठरलं! नाशिक-दिंडोरीतून मराठा समाज लोकसभेसाठी उमेदवार देणार, 'या' नावांची चर्चा
नाशिकवरून महायुतीत धुसफूस वाढली! गोडसेंच्या शक्तिप्रदर्शनानंतर नाशिक भाजपचा मोठा निर्णय!