Dada Bhuse on Sanjay Raut : रोज सकाळी उठल्यावर टिव्हीसमोर वाकडी मान करणार; अरे तुम्हाला गल्लीत तरी कोणी विचारते का? दादा भुसेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल
कोणाचे रेशन कार्ड तरी काढून दिले का तुम्ही? अशा शब्दात कृषीमंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री दादा भूसे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर (Dada Bhuse on Sanjay Raut) तोफ डागली आहे.
नाशिक : काही लोक रोज सकाळी 8-9 ला उठले की, टिव्हीसमोर येणार वाकडी मान करणार, आंतरराष्ट्रीय स्तरावर बोलणार, अरे तुम्हाला गल्लीत तरी कोणी विचारते का? कोणाचे रेशन कार्ड तरी काढून दिले का तुम्ही? अशा शब्दात कृषीमंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री दादा भूसे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर (Dada Bhuse on Sanjay Raut) तोफ डागली आहे. नाशिकमध्ये आज (14 जानेवारी) आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा मेळावा होत आहे. या मेळाव्यात बोलताना दादा भूसे यांनी संजय राऊत यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. ते म्हणाले की, टिव्हीवर फक्त चमकोगिरी करणार, आता याकडे आपण दुर्लक्ष करायला पाहिजे.
मोदी साहेबांसमोर कोणी आहे का? दुसरं कोणी दिसत पण नाही
दादा भूसे म्हणाले की, मोदी साहेबांसमोर कोणी आहे का? दुसरं कोणी दिसत पण नाही. मोदींना आपल्याला पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. मी स्वतः उमेदवार असे समजून काम करा. युवा महोत्सवात मोदीजी येऊन, सर्वांनी जबाबदाऱ्या चोख पार पाडल्या त्याबद्दल आभार मानतो. यावेळी बोलताना भूसे यांनी आरपीआयच्या प्रकाश लोंढेच्या टीकेला उत्तर दिले. लोंढे साहेब काही घरातल्या गोष्टी आपण घरातच बोलू शकतो, असे ते म्हणाले. आठवले साहेब मोदींचे आवडते नेते आहेत, त्यांना बोलावून मंत्रिपद दिले जाते, आपल्यात काही असेल तर बोलून मिटवून घेऊ. बॅनरवर फोटो कोणाचा हा प्रोटोकॉलवरून आला आहे.
माझ्याकडे अजितदादांचे घड्याळ
दरम्यान, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनीही आपल्या भाषणातून टोलेबाजी केली. ते म्हणाले, मला शेवटी बोलायला आवडत नाही. कारण सगळे कंटाळलेले असतात. आपल्याला लोकशाही जिवंत ठेवायची आहे. मोदी साहेबांचा आध्यात्मावर विश्वास आहे. उद्या मकर संक्रांत आहे, आपल्याला आता गोड बोलायचं आहे. आपण तिळगुळ देऊन जे गोड तोंड करू, ते कायमस्वरूपी एकत्र राहण्याची शपथ घेऊ.
आता फक्त लोकसभा आणि लोकसभाच
त्यांनी सांगितले की, माझ्याकडे अजितदादांचे घड्याळ आहे. आम्ही दहाचा कार्यक्रम असताना, दहा वाजून दहा मिनिटांनी आलो. 45 खासदार का? 48 पैकी 48 का नको? उरलेले तीन धाकधूक होतील. आपण सर्व खासदार निवडून आणले पाहिजे. आता फक्त लोकसभा आणि लोकसभाच असेही झिरवळ यांनी नमूद केले.
इतर महत्वाच्या बातम्या