एक्स्प्लोर

एकनाथ शिंदेंचे धक्कातंत्र, नाशिकमध्ये शिंदे सेनेचा पालकमंत्री, महाजनांनावर भुसे भारी 

Nashik Guardian Ministers : धक्कातंत्राचा वापर करीत मंत्री दादा भुसे यांच्याकडे नाशिकच्या पालकमंत्रीपदाची सूत्रे सोपविण्यात आली आहेत.

Nashik Guardian Ministers : नाशिकच्या पालकमंत्री पदावरून दादा भुसे आणि गिरीश महाजन यांच्यात सुरू असलेली चुरस थांबली असून धक्कातंत्राचा वापर करीत मंत्री दादा भुसे यांच्याकडे नाशिकच्या पालकमंत्रीपदाची सूत्रे सोपविण्यात आली आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या पालकमंत्र्यांची यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहेत. त्यानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे  नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल. तर नाशिकमध्ये मात्र गिरीश महाजन यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असतांना मात्र शिंदे गटाने धक्कातंत्राचा वापर भाजपला जोरदार धक्का दिला आहे. पालकमंत्री पदापासून दूर गेलेले मंत्री दादा भुसे नाशिकचे पालकमंत्री म्हणून काम पाहणार आहेत. 

एकीकडे मंत्री गिरीश महाजन यांचे नाव सुरवातीपासून चर्चेत होते. त्यानंतर दादा भुसे यांचे नाव जोडले गेले. तर स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणाचा मान महाजन यांना गेल्यामुळे अप्रत्यक्षपणे पालकमंत्री पदाचा झेंडा ही त्यांच्याच हाती गेल्याचे संकेत प्राप्त झाले होते. त्यानंतर महाजनच नाशिकचे पालकमंत्री म्हणून नाशिककरांमध्ये समज झाली होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आजच्या घोषनेने सर्व चित्रच बदलून गेले आहे. तर दुसरीकडे मंत्री दादा भुसे यांना देखील आश्चर्याचा धक्का बसला असावा, असे या यादीच्या माध्यमातून दिसते.

मंत्री गिरीश महाजनांना धक्का?
मुंबई पुणे ठाणे अंतर नाशिकला राजकीय दृष्ट्या महत्त्व आहे. त्यामुळेच 2014 ते 2019 या सत्ता काळात भाजपने महाजन यांच्याकडे पालकमंत्री पद दिले होते. महाजनांच्या नेतृत्वात नाशिक महापालिकेत भाजपची 2017 ला एकहाती सत्ता आली. 2019 मध्ये शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार दुसऱ्यांदा विजयी झाले. त्यामुळे महाजन हेच पालकमंत्री असतील अशी अटकळ होती, मात्र दादा भुसे व राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ही नावाची चर्चा होती. शिवाय ध्वजारोहणाचा मान महाजनांना मिळाल्यामुळे त्यामुळे त्यांचे पालकमंत्री पद निश्चित मानले जात होते. 

शिंदें सेनेचा भाजपला धक्का?
दरम्यान आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने मंत्री गिरीश महाजन यांच्यावर पालकमंत्री पदाची धुरा सोपवणार हे निश्चित होते. त्यामुळेच स्वातंत्र्य दिनाला ध्वजारोहण देखील महाजन यांच्या हस्ते पार पडले. शिवाय सिन्नरच्या नुकसान ग्रस्त भागात देखील महाजन यांनी पाहणी केल्याने नाशिकचे पालकमंत्री महाजनच अशी धारणा झालं8 होती. या सगळ्यात दादा भुसे बाहेर पडले होते. मात्र आज जाहीर केलेल्या पालकमंत्री पदाच्या यादीत नाशिकच्या पालकमंत्री पदी मंत्री दादा यांची वर्णी लागल्याने शिंदे सेनेकडून भाजपला एक प्रकारे धक्का दिल्याचे बोलले जात आहे. या सर्वात नाशिकच्या पालकमंत्री पदाची धुरा दादा भुसेकडे देऊन धक्कातंत्राचा वापर झाल्याचे सांगण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis on Nashik potholes: 'असं रिलॅक्स राहून चालणार नाही, महाकुंभ तोंडावर'; नाशिकमधील खड्ड्यांवरुन देवेंद्र फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं
'असं रिलॅक्स राहून चालणार नाही, महाकुंभ तोंडावर'; नाशिकमधील खड्ड्यांवरुन देवेंद्र फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Raj Thackeray in Nashik press conference: नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
नाशिक TCS प्रकरण! MIM च्या नगरसेवकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, आरोपी निदा खानला मदत केल्याचा ठपका 
नाशिक TCS प्रकरण! MIM च्या नगरसेवकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, आरोपी निदा खानला मदत केल्याचा ठपका 

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDA ला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDA ला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Ramandeep Singh Married to Charlie Chauhan : भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
Rishabh Pant News : 3 वर्षांपासून इकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
3 वर्षांपासून इकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
Rekha Fitness Transformation:'रेखा आधी जाड होती, पण नंतर..' रेखाच्या भावोजींनी सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले..
'रेखा आधी जाड होती, पण नंतर..' रेखाच्या भावोजींनी सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले..
Embed widget