एक्स्प्लोर

Nashik Corona Update : नाशिककरांनो काळजी घ्या! जिल्ह्यात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी आढळले 14 कोरोनाबाधित; एक रुग्ण दगावला

Nashik Corona Update : गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे.. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी 14 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.

Nashik Corona Update नाशिक : शहरासह जिल्ह्यात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने (JN.1 Coronavirus) पाय रोवायला सुरु केली आहे. रविवारच्या अहवालात जिल्ह्यात तीन कोरोना (Coronavirus) रुग्ण आढळले होते. या पाठोपाठ सोमवारी नववर्षाच्या (New Year 2024) पहिल्याच दिवशी 14 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. तर एक रुग्ण दगावल्याची माहिती समोर येत आहे.
 
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता नाशिक मनपाचा आरोग्य विभाग (NMC Health Department) सतर्क झाला आहे. 24 डिसेंरबरपासून शहरातील मनपाच्या रुग्णालयांमध्ये रॅपिड अँटिजन टेस्टची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच, नाशिकरोडच्या जेडीसी बिटको रूग्णालय, स्वामी समर्थ रूग्णालय, सिडकोच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात चाचण्या केल्या जात आहे. 

Covid cases in Maharashtra : जिल्ह्यात एक रुग्ण दगावला

गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या 17 डिसेंबर रोजी येवला तालुक्यातील पुरुष रुग्ण एका खासगी रुग्णालयात उपचार घेताना त्याचा मृत्यू झाला होता. सोमवारी त्या रूग्णाचा अहवाल प्राप्त झाला. या अहवालात तो कोरोनाबाधित होता असे आढळून आले आहे. 

Covid cases in Maharashtra : शहरात पाच तर ग्रामीणमध्ये 8 कोरोनाबाधित

गेल्या 24 तासांमध्ये करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये 14 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहरात 5 तर, ग्रामीण भागातील 8 रुग्ण रुग्णांचा समावेश आहे. तसेच एकाचा मृत्यू झाला आहे. 

Covid cases in Maharashtra : रुग्णांची होतेय आरटीपीसीआर चाचणी

नाशिकसह जिल्ह्यात रॅपिड टेस्टसह उपचारासाठी दाखल रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. सोमवारी एकूण 84 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीत 14 रुग्णांचे कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. नाशिक मनपा क्षेत्रात सोमवारी एकूण 20 जणांच्या चाचण्या झाल्या यात 5 कोरोनाबाधित आढळले आहेत.

मालेगाव मनपात 35 चाचण्या झाल्या यात एक रुग्ण कोरोनाबाधित आढळला. जिल्हा रुग्णालयात १२ चाचण्या झाल्या असून यात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही. तसेच इतर ठिकाणी 17 चाचण्या झाल्या असून आठ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर येवल्यात रुग्णाचा मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात एकूण 84 चाचण्या झाल्या आहेत. 

Covid cases in Maharashtra : नागरिकांनी सतर्कता बाळगावी

कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटचा धोका लक्षात घेता. नागरिकांनी खबरदारी घ्यावी. ज्येष्ठ नागरिक किंवा ज्यांना आजार आहेत त्यांना या न्यू व्हेरिएंटचा धोका अधिक असल्याने त्यांनी याबाबत विशेष काळजी घ्यावी. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, सतर्कता बाळगावी, असे आवाहन नाशिक महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

Truck Driver Strike Petrol Shortage : इंधन तुटवड्याचे संकट गडद? टँकरचालकांसोबतच्या बैठकीत तोडगा नाहीच, प्रशासनाकडून कारवाईचे संकेत

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime : दागिने दुप्पट करण्याचं आमिष, माजी महापौरांची 200 तोळे सोन्याची फसवणूक; सराफाविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल
दागिने दुप्पट करण्याचं आमिष, माजी महापौरांची 200 तोळे सोन्याची फसवणूक; सराफाविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल
Nashik Crime News: एकतर्फी प्रेमाचा थरारक शेवट, आधी तरुणीला संपवलं, नंतर तरुणाने स्वत:च्या आयुष्याचा शेवट केला; नाशिकमधील 'त्या' घटनेमागचं धक्कादायक कारणही आलं समोर
एकतर्फी प्रेमाचा थरारक शेवट, आधी तरुणीला संपवलं, नंतर तरुणाने स्वत:च्या आयुष्याचा शेवट केला; नाशिकमधील 'त्या' घटनेमागचं धक्कादायक कारणही आलं समोर
Ashok Kharat: अशोक खरातविरोधात ईडीचे तब्बल 3000 पानांचे आरोपपत्र; रिमोटचा साप, 2 लाखांची चिंचेची बी ते 142 बेनामी खात्यांचा पर्दाफाश
अशोक खरातविरोधात ईडीचे तब्बल 3000 पानांचे आरोपपत्र; रिमोटचा साप, 2 लाखांची चिंचेची बी ते 142 बेनामी खात्यांचा पर्दाफाश
Nashik Crime News: नाशकात PG मध्ये राहणाऱ्या तरुणीला भररस्त्यात संपवलं; कायद्याच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक घटना!
नाशकात PG मध्ये राहणाऱ्या तरुणीला भररस्त्यात संपवलं; कायद्याच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक घटना!

व्हिडीओ

Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jantar Mantar Protest: दिल्ली पोलिसांनीच आणला दगडांनी भरलेला डम्पर अन् काचा फुटलेली कार, वेगळाच प्लॅन? कॉकरोच जनता पार्टीचा गंभीर आरोप, अभिजित दिपकेंनी शेअर केला व्हिडिओ
Video: दिल्ली पोलिसांनीच आणला दगडांनी भरलेला डम्पर अन् काचा फुटलेली कार, वेगळाच प्लॅन? कॉकरोच जनता पार्टीचा गंभीर आरोप, अभिजित दिपकेंनी शेअर केला व्हिडिओ
Kalyan Crime News: कल्याणमध्ये महिलेने प्रियकराला 'दृश्यम' स्टाईल संपवलं; मृतदेह गोणीत भरला, वास येऊ नये म्हणून..., 'त्या' एका व्हाईस मेलने पोलिसही चक्रावले
कल्याणमध्ये महिलेने प्रियकराला 'दृश्यम' स्टाईल संपवलं; मृतदेह गोणीत भरला, वास येऊ नये म्हणून..., 'त्या' एका व्हाईस मेलने पोलिसही चक्रावले
Jantar Mantar Protest Delhi: दिल्लीतील पाच मेट्रो स्थानकं बंद केली, जंतरमंतरवर वॉटर कॅनन अन् वज्र वाहन, रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सच्या जवानांचा फौजफाटाही आणला
दिल्लीतील पाच मेट्रो स्थानकं बंद केली, जंतरमंतरवर वॉटर कॅनन अन् वज्र वाहन, रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सच्या जवानांचा फौजफाटाही आणला
Salman Khan Breaks Silence: थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानचा अवतार पाहून चाहते चिंतेत, स्वत:च पोस्ट शेअर करत म्हणाला...
थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानचा अवतार पाहून चाहते चिंतेत, स्वत:च पोस्ट शेअर करत म्हणाला...
Shirdi Crime: शिर्डीत साई मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर काकडी विक्रेत्या महिलेवर महिलांकडूनच जीवघेणा हल्ला, भयंकर घटनेमुळे खळबळ
शिर्डीत साई मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर काकडी विक्रेत्या महिलेवर महिलांकडूनच जीवघेणा हल्ला, भयंकर घटनेमुळे खळबळ
Abhijeet Dipke Jantar Mantar Protest: आज भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा मोर्चा निघेल, अभिजीत दिपकेंचा जंतरमंतरवर एल्गार
आज भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा मोर्चा निघेल, अभिजीत दिपकेंचा जंतरमंतरवर एल्गार
Beed Crime: बीडमधील बनावट ट्रस्टचं 'पाकिस्तानी कनेक्शन' समोर आलं, पाच बँक अकाऊंट, कोट्यवधींचे व्यवहार अन्...; ATS च्या तपासात धक्कादायक माहिती
बीडमधील बनावट ट्रस्टचं 'पाकिस्तानी कनेक्शन' समोर आलं, पाच बँक अकाऊंट, कोट्यवधींचे व्यवहार अन्...; ATS च्या तपासात धक्कादायक माहिती
Wardha Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेने कार पेटली, पाच जणांचा मृत्यू
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेने कार पेटली, पाच जणांचा मृत्यू
Embed widget