एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

माझा जरांगेंना सपोर्ट! सरकारनं फक्त त्यांचंच ऐकायचं, देवसुद्धा त्यांना घाबरतो; भुजबळांचा उपरोधिक टोला

Nashik News : जरांगे सरकारला वेठीस धरत नाहीतर, सरकारचं जरांगेंना वेठीस धरतंय, सरकारनं जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात आणि काही मंत्र्यांना जरांगेंच्या आंदोलनस्थळी कायमस्वरुपी बंगले द्यावेत, सचिवांचं कार्यालयही तिथे उभं करावं, जेणेकरुन जरांगेंनी मागणी उच्चारली की ती तातडीनं सरकारला पूर्ण करता येईल, छगन भुजबळांचा मनोज जरांगेंना टोला.

Chhagan Bhujbal on Manoj Jarange : नाशिक : आपण आपली मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या संदर्भातील सर्व भाषणं आणि वक्तव्य मागे घेतोय आणि जरांगेंच्या मतांशी आपणही सहमत असल्याचं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी म्हटलं आहे. जरांगे सरकारला वेठीस धरत नाहीतर, सरकारचं जरांगेंना वेठीस धरतंय, सरकारनं जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात आणि काही मंत्र्यांना जरांगेंच्या आंदोलनस्थळी कायमस्वरुपी बंगले द्यावेत, सचिवांचं कार्यालयही तिथे उभं करावं, जेणेकरुन जरांगेंनी मागणी उच्चारली की ती तातडीनं सरकारला पूर्ण करता येईल, असं म्हणत छगन भुजबळांनी उपरोधिक टोला जरांगेंना लगावला आहे.  

अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ बोलताना म्हणाले की, "जरांगेंचं ऐकायला पाहिजे. मंत्र्यांचे दोन-चार बंगले तिथे बांधले पाहिजेत. त्यांना रोज अभिनव कल्पना येतात, त्यांचा आदर राखला पाहिजे. देवसुद्धा त्यांना घाबरतो, सासू-सासऱ्यांचे मित्र सर्वांना दाखले द्या." पुढे बोलताना ते म्हणाले की, "माझी भुमिका अशी आहे की, जरांगे यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे. सर्वांना आरक्षण द्यायला पाहिजे. आपण जरांगे यांचं ऐकलं पहिजे. नाहीतर मोर्चा घेऊन ते येतील. व्याह्याचे व्याही व्याह्याचे व्याही असं सर्वांना आरक्षण दिलं पाहिजे. ते पुढे जाऊन शिक्षणाबाबत शेतकऱ्यांच्याबाबतसुद्धा केलं पाहिजे. माझं तर म्हणणं आहे की, सरकारनं वाटाघाटीचा घोळ घालू नये. ते सांगतात सरकार मान्य करत आहे. मी तर जरांगे यांना सपोर्ट करतोय. सरकारनं फक्त त्यांचंच ऐकायचं, देवसुद्धा त्यांना घाबरतो." 

जरांगेंनी सरकारला वेठीस धरलं नाही, सरकारनं जरांगेंना वेठीस धरलंय : मंत्री छगन भुजबळ 

"जरांगे बोलतील आणि त्यांच्या हातात सगळं आहे. 7 ते 8 कोटी मराठा त्यांच्या हातात आहे. ताबडतोब त्या ठिकाणी एका निवृत्त न्यायाधीशांचं कार्यालय सुरू करा आणि त्या ठिकाणी लगेच माझा जामीन रद्द करून टाका. जरांगे यांनी सरकारला वेठीस धरलं नाही, सरकारनं जरांगे यांना वेठीस धरलं आहे, पुढच्या मेळाव्यात त्यांच्या बाजूनं मी भाषणं करणार आहे. 

अपात्रतेच्या मुद्द्यावर जरांगेंशी बोलून पटकन निर्णय घ्यावा : मंत्री छगन भुजबळ 

"मी एकदम युटर्न घेतला आहे. सध्या जी अपात्रतेची सुनावणी सूरू आहे, त्याबाबत जरांगे यांच्याशी बोलावं आणि पटकन निर्णय घेतला जावा. उपरोधिक म्हणा, हतबलता म्हणाव काय म्हणायचं आहे ते म्हणा.", असं मंत्री छगन भुजबळ म्हणाले आहेत. 

पाहा व्हिडीओ : Chhagan Bhujbal Full Speech : मनोज जरांगेंच्या अभिनव मागण्या सरकारने पूर्ण करायला हव्यात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Specail Report BMC Election : आगामी महापालिका उद्धव ठाकरे स्वबळावर लढणार?Devendra Fadnavis Sangar Bunglow : देवेंद्र फडणवीसांचा सागर बंगला  कसा बनला सत्ताकेंद्र?भाजपानं केलेल्या त्यागाची एकनाथ शिंदेंकडून परतफेड, मुख्यमंत्री भाजपचाचSpecial Report EVM : ईव्हीएमवरुन महायुती-मविआत संघर्ष सुरुच, सत्ताधारी विरोधक नडले

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
Heeramandi 2: संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
Embed widget