Chhagan Bhujbal : "आपली भूमिका सोडणार नाही, जे व्हायचं ते होईल"; जीवे मारण्याच्या धमकीनंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे. त्यांच्या नाशिक येथील कार्यालयात पत्राद्वारे धमकी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Chhagan Bhujbal नाशिक : छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे. त्यांच्या नाशिक (Nashik) येथील कार्यालयात पत्राद्वारे धमकी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपली भूमिका सोडणार नाही, जे व्हायचं ते होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले की, काही महिन्यात चार ते पाच वेळा धमकीचे पत्र मेसेज आणि फोन आलेत. पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे. आयुष्यात अनेकवेळा असे प्रसंग आलेत. हे प्रसंग पोलिसांकडे सोपवून द्यायचे. आपली भूमिका सोडणार नाही जे व्हायचे ते होईल. गाड्याचे नंबर, मोबाईल नंबर आहेत, ज्या हॉटेलसमोर मिटिंग झाली ती माहिती पोलिसांना दिली आहे. कशासाठी आहे हे धमकी देणाऱ्यांना पकडल्यानंतर कळेलच. काहीही झाले तरी मी माझी भूमिका सोडणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
काय म्हटलंय पत्रात ?
नाशिक येथील कार्यालयात मंत्री छगन भुजबळ यांना एक पत्र आले आहे. या पत्रात म्हटले आहे की, "साहेब तुम्हाला उडवण्याची सुपारी पाच लोकांनी घेतली आहे. ते गंगापूर-दिंडोरी-चांदशी येथे हॉटेलमध्ये थांबले आहेत. या लोकांनी तुम्हाला उडवण्याची ५० लाखांची सुपारी घेतली आहे. या गुंडांपासून सावध राहा, हे ५ जण तुमचा रात्रभर शोध घेत फिरत आहेत. सागर हॉटेलसमोर यांची मिटिंग झाली आहे. साहेब सावध राहा" असा मजकूर या पत्रात हाताने लिहिण्यात आला आहे.
भुजबळांना याआधीही जीवे मारण्याची धमकी
मराठ्यांना ओबीसीतून आरक्षणाला (Maratha Reservation) त्यांनी कडाडून विरोध केल्याने छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) राज्यात चांगलेच चर्चेत आले आहेत. मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश झाल्यास ओबीसींमधील इतर जातींचा आरक्षणाचे फायदे मिळणार नाहीत, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि छगन भुजबळ यांनी एकमेकांविरोधात आक्रमक झाले आहेत आहेत. छगन भुजबळ यांना यापूर्वीही पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या