एक्स्प्लोर

Chalisgaon Firing : चाळीसगावात भाजप माजी नगरसेवकाचा उपचारादरम्यान मृत्यू, कार्यालयात घुसून 5 जणांचा अंदाधुंद गोळीबार, राजकीय क्षेत्रात खळबळ

Chalisgaon Firing :जळगावच्या चाळीसगावात भाजपच्या माजी नगरसेवक बाळु मोरे यांच्यावर तीन दिवसांपूर्वी अज्ञात इसमांनी त्यांच्या कार्यालयात घुसून गोळीबार केला होता.

Chalisgaon Firing : भाजपाचे माजी नगरसेवक बाळू मोरे (Balu More Firing Case) यांच्यावर चाळीसगाव येथील कार्यालयात घुसून पाच जणांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला होता. त्यात ते गंभीर झाले होते. नाशिक येथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज पहाटे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे 

कार्यालयात घुसून 5 जणांकडून अंदाधुंद गोळीबार

जळगावच्या चाळीसगावात भाजपच्या माजी नगरसेवक बाळु मोरे यांच्यावर तीन दिवसांपूर्वी अज्ञात इसमांनी त्यांच्या कार्यालयात घुसून गोळीबार केला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर होती. याच अवस्थेत माजी नगरसेवक मोरेंना नाशिक येथील अशोक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आज सकाळी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. चाळीसगाव शहरातील हनुमान वाडी या ठिकाणी असलेल्या त्यांच्या कार्यालयात हा गोळीबार करण्यात आला होता  माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे हे आपल्या कार्यालयात बसलेले असताना पाच अज्ञात तरुणांनी चेहरा मास्क लाऊन त्यांच्यावर गोळीबार केला होता, या संपूर्ण प्रकाराचे दृश्य CCTV कॅमेरात कैद झाले आहे.

नागरिकांकडून संताप व्यक्त

या प्रकरणी चाळीसगाव भागात सध्या घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे, दरम्यान, पोलीस आरोपींचा शोध घेत असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे. महेश गायकवाड, अभिषेक घोसाळकर, बाळू मोरे यासारख्या एकामागून एक घडणाऱ्या घटनांमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून येत आहे, तसेच पोलिंसावर विश्वास ठेवायचा कसा? असा सवाल उपस्थित करत नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

जनतेच्या मनातील दहशत कमी करण्याचा पोलिसांचा प्रयत्न

चाळीसगाव येथे माजी नगरसेवकावर गोळीबार झाल्याच्या घटनेनंतर तसेच नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया आल्यानंतर पोलिस आता चांगलेच अॅक्शन मोड वर आल्याचं पाहायला मिळत असून गावातील काही खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी सह तडीपार असताना शहरात फिरून दहशत निर्माण करणाऱ्या गुंडांना पोलिसांनी गाव भर फिरवत त्यांच्याबाबत जनतेच्या मनातील दहशत कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. यासोबत ज्या ठिकाणी अवैधरित्या सट्टा, जुगार, मटका, आणि अवैध दारू विक्री केली जात असलेली अतिक्रमण ठिकाणे देखील चाळीसगाव नगरपालिकेच्या वतीने जेसीबीने उद्भस्त करण्यात येत असल्याने गुन्हेगाराच्या मनात भीती निर्माण करण्याचा तर सर्व सामान्य जनतेला भय मुक्त करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला असल्याने पोलिसांचे कौतुक होताना दिसत आहे

हेही वाचा>>>

Crime : धगधगणारी बदल्याची भावना, सरेआम गोळ्यांचा वर्षाव, थंड डोक्यानं काटा काढला जातोय; बेजबाबदार राजकारण्यांमुळे एका महिन्यातच महाराष्ट्राचा 'गँग्ज ऑफ वासेपूर'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Embed widget