'कोण कशाला जरांगेंचा घात करेल? त्यांची सगळी नाटकं मराठा समाजाला समजली'; छगन भुजबळांचे टीकास्त्र
Chhagan Bhujbal : देवेंद्र फडणवीस यांनी आपला घात केल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. या आरोपाचा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
Chhagan Bhujbal on Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपला घात केल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange patil) यांनी केला आहे. या आरोपाचा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी नाशिकच्या येवला दौऱ्यात चांगला समाचार घेतला आहे. तसेच शनिवारी भाजपकडून लोकसभेचा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यावरही भुजबळांनी वक्तव्य केले आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, कोण कशाला जरांगेचा घात करतील. एका क्षणाला हॉस्पिटलमध्ये तर दुसऱ्या क्षणाला अंतरवाली सराटीला धावतो त्याचे सर्व नाटक मराठा समाजाला पण समजले सरकारला पण समजले असून शेपूट वाढतच चालल्याची टीका भुजबळ यांनी केली आहे.
अजित पवार गटाने 10 जागा मगितल्याचा पुनरुच्चार
तर भाजपने काही उमेदवारांची यादी जाहीर केली मात्र त्यात महाराष्ट्रातील उमेदवार नाही असे विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की, महाराष्ट्राची यादी तयार नसेल. परंतु, महाराष्ट्रात काम करणारा उमेदवार कृपाशंकर सिंह यांना यूपीमधून उमेदवारी जाहीर झाली. महाराष्ट्रात 48 खासदार आहेत. त्यांची चाचपणी करून उमेदवार ठरतील. अजित पवार गटाने 10 जागा मगितल्याचा पुनरुच्चार यावेळी भुजबळांनी केला आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे ?
फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून माझ्यावर हल्ला करण्याचा डाव आहे, हा प्रयोग संभाजीनगरवरून होणार होता. महिला कार्यकर्त्यांच्या आडून, एवढ्या खालच्या दर्जाला जाणे गृहमंत्र्याचं काम नाही, तुम्हाला हे शोभत नाही, असं म्हणत जरांगेनी पुन्हा एकदा फडणवीसांना लक्ष केलं आहे. फडणवीस यांनी पोरांवरती खोटे गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्यात मराठा द्वेष ठासून भरलेला आहे. त्यांच्या सांगण्याबरून बॅनर बोर्ड काढले जात आहेत. पोलीस बोर्ड काढत आहेत, बोर्ड का काढलेत, त्यात गोळ्या घाला लिहिले आहे का, असा सवाल मनोज जरांगे पाटलांनी विचारला आहे.
गुन्हे दाखल करण्याचा नवीन डाव - मनोज जरांगे
मराठ्यांनी गावागावात तालुक्यात ग्रुप बनवून आपापल्या घराला पोम्प्लेट चिटकावयाचे, 'माझ्या दारात यायचं नाही', असं त्यावर लिहायचं. घर-गाड्यांवर पॅम्प्लेट चिटकवण्याची मोहीम सुरू करा. सरकारने गुन्हे दाखल करण्याचा नवीन डाव सुरू केलाय, सरकारचा हा शेवटचा डाव आहे, असे जरांगेंनी म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Uddhav Thackeray Maval : मावळ मतदार संघासाठी उद्धव ठाकरेंनी कंबर कसली; उद्या ध़डाधड सभा घेणार!