
'तो' पूर्वनियोजित कट होता का? भाजपकडून नाशिक पोलिसांना 48 तासांचा अल्टीमेटम, नेमकं प्रकरण काय?
Devyani Pharande : कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारी घटना नाशिकमध्ये घडली. एका धर्माचे लोक रस्त्यावर आले होते. यावर पोलिसांनी काय कारवाई केली? असा सवाल भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी केला.

Nashik News नाशिक : कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारी घटना नाशिकमध्ये (Nashik) घडली. एका धर्माचे लोक रस्त्यावर आले होते. यावर पोलिसांनी काय कारवाई केली. नाशिक पोलिसांनी (Nashik Police) तातडीने कारवाई करावी. आम्ही नाशिक पोलिसांना 48 तासांची मुदत देत आहोत, असा इशारा भाजपच्या आमदार देवयानी फरांदे (Devyani Pharande) यांनी दिला आहे.
नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाल्यानंतर संतप्त मुस्लिम समाज हजारोंच्या संखेने रस्त्यावर आला होता. तसेच काही वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. याबाबत आज भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी पत्रकार परिषद घेत नाशिक पोलिसांना इशारा दिला आहे.
'तो' पूर्वनियोजित कट होता का?
देवयानी फरांदे म्हणाल्या की, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारी घटना नाशिकमध्ये घडली. एका धर्माचे लोक रस्त्यावर आले होते. हा पूर्वनियोजित कट होता का? अचानक असे लोक रस्त्यावर कसे आलेत. हिंदू धर्मात भीती निर्माण करणारे काम का करण्यात आले? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
नाशिक पोलिसांनी काय कारवाई केली?
या घटनेला 8 दिवस उलटून गेलेत, मात्र पोलिसांनी कुठलीही कारवाई केलेली नाही. पोस्ट व्हायरल केल्यानंतर तक्रार करणे अपेक्षित होते. रस्त्यावर हजारो लोक आले होते. सर तनसे जुदा करेंगे, आशा घोषणा देण्यात आल्या होत्या. या घटनेचे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) बघितले का? नाशिक पोलिसांनी यावर काय कारवाई केली? असा सवाल देवयानी फरांदे यांनी पोलिसांना केला आहे.
मीरा भाईंदरप्रमाणे या घटनेतही कारवाई करावी
मीरा भाईंदरप्रमाणे (Mira Bhayandar) या घटनेतही कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. आंबेडकर जयंती सर्वत्र उत्स्फूर्तपणे साजरी झाली. त्यात टिपू सुलतानचे फोटो लावण्यात आले होते. काही लोक जाणूनबुजून शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. सीता मातासंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करण्यात आल्या आहेत. त्या दिवशी पाकिस्तान पॅलेस्टाईनच्या घोषणा देण्यात आल्या होत्या. हे सहन करणार नाही, असेही देवयानी फरांदे यांनी स्पष्ट केले आहे.
नाशिक पोलिसांना 48 तासांची मुदत
टिपू सुलतानला दक्षिणेतील औरंगजेब म्हणतात. त्याचे होर्डिंग्ज महाराष्ट्र का? लागत आहेत. यामागे कोण आहे, याचा शोध घेतला पाहिजे. आम्ही नाशिक पोलिसांना 48 तासांची मुदत देत आहोत. त्याआधी पोलिसांनी गुन्हेगारावर कारवाई करावी, असा अल्टीमेटम देखील देवयानी फरांदे यांनी दिला आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
