एक्स्प्लोर

बिहार निवडणूक निकाल 2025

(Source:  ECI | ABP NEWS)

Supriya Sule & Sharad Pawar: 'माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेलं चालतं', सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर भाजपची टीका, म्हणाले, 'मौलाना शरद पवारांच्या...'

Supriya Sule on Non Veg Food: सुप्रिया सुळे यांनी मांसाहाराबाबत केलेल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. भाजपकडून हा मुद्दा उचलून धरला जाण्याची शक्यता आहे.

Supriya Sule on Mutton: माझ्या पांडुरंगाला मी मटण (Mutton) खाल्लेलं चालतं. मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, असे वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर भाजपकडून (BJP) टीकास्त्र सोडण्यात आले आहे.  कोणी काय खावं, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पिढ्यानुपिढ्या शुद्ध शाकाहाराची परंपरा जपणाऱ्या आम्हा वारकऱ्यांचं आराध्य दैवत असलेल्या पांडुरंगाला (Pandurang) तुम्ही मांसाहार (Non Veg Food) केलेला चालतो, हे बोलणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे. तुम्ही वारकरी परंपरेचा सन्मान करु शकत नाही तर किमान अपमान तरी करु नका. पण मौलाना शरद पवारांच्या (Sharad Pawar) मुलीकडून दुसरी काय अपेक्षा करणार, अशी बोचरी टीका भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले (Tushar Bhosale) यांनी केली. या टीकेला आता सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि शरद पवार गटाचे नेते काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याबाबत विचारणा करण्यात आली. यावर ते म्हणाले की, याचं उत्तर मी देणार नाही. याचं उत्तर महाराष्ट्रातील तमाम वारकरी देतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

Supriya Sule: सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

सुप्रिया सुळे या शनिवारी दिंडोरीच्या खेडगावमध्ये महात्मा फुलेंच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. यावेळी सुप्रिया सुळे यांनी मांसाहार सेवनाबाबत भाष्य केले. त्यांनी म्हटले की,  माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेलं चालतं, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, असा सवाल त्यांनी विचारला. आम्ही आमच्या पैशांनी मटण खातो, आम्ही कोणाचे मिंधे नाही. खाल्लं तर काय पाप केलं का?, असा सवाल त्यांनी विचारला. 50 वर्षांपूर्वी शरद पवार एका मुलीवर थांबले. स्वतःचं ऑपरेशन केलं, मात्र पत्नीचे नाही, हे खरं पुरोगामित्व असल्याचे सुळे म्हणाल्या. 10 वेळेस वेळ मागून देखील मुख्यमंत्री वेळ देत नाहीत. म्हणून आम्ही थेट दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतो असेही सुळे म्हणाल्या. यावेळी सुप्रिया सुळे यांनी अमित शाह यांचे जाहीर आभार देखील मानले.

राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले होते सरसकट कर्जमाफी देतो. ओला दुष्काळ जाहीर करावा म्हणून फक्त राष्ट्रवादी शदर पवार गटाचे खासदार अमित शाह यांच्याकडे गेले होते. मुख्यमंत्री तर मला वेळच देत नाही, त्यामुळे मी मागणंच बंद केलं आहे. दहा वेळा आपण वेळ मागतो पण वेळ देत नाहीत याचा अर्थ काय, त्यांना वेळ द्यायचा नाही असे सुळे म्हणाल्या. मी ठरवलं आहे, इथे काम करत नाही ना, माझी कामं दिल्लीत होतात, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

आणखी वाचा

माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेलं चलतं, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम? सुप्रिया सुळेंचा सवाल

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Local Body Election: निवडणुकीत ओबीसींना कमी आरक्षण मिळालं, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा दावा; म्हणाले, निवडणूक आयोगाने फेरविचार करावा, अन्यथा...
निवडणुकीत ओबीसींना कमी आरक्षण मिळालं, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा दावा; म्हणाले, निवडणूक आयोगाने फेरविचार करावा, अन्यथा...
Nashik Leopard Attack: एका बिबट्याने सात जणांना जखमी केलं, तोपर्यंत दुसरा बिबट्या आला पळा पळा अफवा पसरली; नेमकं काय घडलं?
एका बिबट्याने सात जणांना जखमी केलं, तोपर्यंत दुसरा बिबट्या आला पळा पळा अफवा पसरली; नेमकं काय घडलं?
Kalyan Crime: तोपर्यंत साईट चालू करायची नाही, अन्यथा ठार मारीन; बांधकाम व्यावसायिकाकडे मागितली खंडणी, शिंदे गटाच्या नेत्यावर गुन्हा दाखल
तोपर्यंत साईट चालू करायची नाही, अन्यथा ठार मारीन; बांधकाम व्यावसायिकाकडे मागितली खंडणी, शिंदे गटाच्या नेत्यावर गुन्हा दाखल
Bihar Election Result 2025 RJD Winner List: बिहारमध्ये तेजस्वी यादवांच्या राष्ट्रीय जनता दलाला किती जागा? विजयी उमेदवारांची यादी पाहा इथे...
बिहारमध्ये तेजस्वी यादवांच्या राष्ट्रीय जनता दलाला किती जागा? विजयी उमेदवारांची यादी पाहा इथे...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sharad Pawar on Election : स्थानिक स्वराज संस्थेसाठी स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा- शरद पवार
Congress on BMC Election : मुंबईत मविआत बिघाडी, काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा ABP Majha
Eknath Shinde on Bihar Result : बिहारच्या जनतेने जंगलराज नाकारुन विकास राज स्वीकारलं
Delhi BJP Celebration : NDA ला बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, दिल्लीत जोरदार सेलिब्रेशन
PM Modi Full Speech Bihar Result : युवकांनी बिहारमधील जंगलराज संपवलं, विजयानंतरचं मोदींचं पहिलं भाषण
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Local Body Election: निवडणुकीत ओबीसींना कमी आरक्षण मिळालं, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा दावा; म्हणाले, निवडणूक आयोगाने फेरविचार करावा, अन्यथा...
निवडणुकीत ओबीसींना कमी आरक्षण मिळालं, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा दावा; म्हणाले, निवडणूक आयोगाने फेरविचार करावा, अन्यथा...
Nashik Leopard Attack: एका बिबट्याने सात जणांना जखमी केलं, तोपर्यंत दुसरा बिबट्या आला पळा पळा अफवा पसरली; नेमकं काय घडलं?
एका बिबट्याने सात जणांना जखमी केलं, तोपर्यंत दुसरा बिबट्या आला पळा पळा अफवा पसरली; नेमकं काय घडलं?
Kalyan Crime: तोपर्यंत साईट चालू करायची नाही, अन्यथा ठार मारीन; बांधकाम व्यावसायिकाकडे मागितली खंडणी, शिंदे गटाच्या नेत्यावर गुन्हा दाखल
तोपर्यंत साईट चालू करायची नाही, अन्यथा ठार मारीन; बांधकाम व्यावसायिकाकडे मागितली खंडणी, शिंदे गटाच्या नेत्यावर गुन्हा दाखल
Bihar Election Result 2025 RJD Winner List: बिहारमध्ये तेजस्वी यादवांच्या राष्ट्रीय जनता दलाला किती जागा? विजयी उमेदवारांची यादी पाहा इथे...
बिहारमध्ये तेजस्वी यादवांच्या राष्ट्रीय जनता दलाला किती जागा? विजयी उमेदवारांची यादी पाहा इथे...
Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना, भाजपचा युवा नेत्याचा मृतदेह आढळला; राजकीय वर्तुळात खळबळ
छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना, भाजपचा युवा नेत्याचा मृतदेह आढळला; राजकीय वर्तुळात खळबळ
Tejashwi Yadav : हरता हरता जिंकले! तेजस्वी यादवांनी राघोपूरचा गढ राखला, भाजपचा 14 हजार मतांनी पराभव
हरता हरता जिंकले! तेजस्वी यादवांनी राघोपूरचा गढ राखला, भाजपचा 14 हजार मतांनी पराभव
Bihar Results 2025 : यादवांची नाराजी, मुस्लिमांनी साथ सोडली; तेजस्वी यादवांच्या पक्षाच्या पराभवाची 5 मोठी कारणे
यादवांची नाराजी, मुस्लिमांनी साथ सोडली; तेजस्वी यादवांच्या पक्षाच्या पराभवाची 5 मोठी कारणे
Alinagar Election Result Updates: अलीनगरमधून मैथिली ठाकूर 11 हजार मतांनी विजयी, RJD च्या विनोद मिश्रांचा पराभव
अलीनगरमधून मैथिली ठाकूर 11 हजार मतांनी विजयी, RJD च्या विनोद मिश्रांचा पराभव
Embed widget