Bhaskar Jadhav : "मी आज रश्मी वहिनींबद्दल बोलणार", भास्कर जाधव बोलत राहिले, सत्ताधाऱ्यांवर बरस बरस बरसले!
Nashik News : उद्धव ठाकरेंवर मोठी शस्त्रक्रिया झाली. आदित्य ठाकरेंवर अनेक आरोप झाले. तेव्हा रश्मी वहिनी भक्कमपणे उभ्या होत्या, असे म्हणत भास्कर जाधव यांनी
Bhaskar Jadhav नाशिक : रश्मी वाहिनी आज जशा बसल्या आहेत. अशाच माँ साहेब बसायच्या. आज वहिनींना पाहून माँ साहेबांची आठवण झाली. उद्धव ठाकरेंवर मोठी शस्त्रक्रिया झाली. आदित्य ठाकरेंवर अनेक आरोप झाले. तेव्हा देखील वहिनी भक्कमपणे उभ्या होत्या. वाहिनी तुम्ही आता बाहेर पडले पाहिजे, असे अनेक महिलांचे म्हणणे आहे. वाहिनी विश्वासघात झालाय, गद्दारी केलीये. त्यांना आता गाडल्याशिवाय राहायचे नाही, अशी जहरी टीका भास्कर जाधव यांनी केली आहे.
नाशिक येथे उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते . १९९४ नाशिकला शिबीर झाले. मोठी सभाही झाली. १९९५ साली युतीचे सरकार आले. आता आपल्या आजच्या सभेनंतर 2024 मध्ये राज्यात महाविकास आघडीचे सरकार येणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
माझी पहिली उमेदवारी येथूनच जाहीर
माझी पहिली उमेदवारी बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केली होती. ज्यांच्या नावाने हे मैदान आहे ते अनंत कान्हेरे माझ्याच जिल्ह्यातील आहे. आम्हाला शाळेत पुस्तकामध्ये जे रामचंद्र शिकवले ते नम्र होते. आपल्या पत्नीसोबत सात फेरे घेतले नाही तर साथ दिली. आताचे अक्राळ बिक्राळ प्रभू दाखविले जातात ते आम्ही बघितले नाहीत. रावणाच्या वधानंतर बिभीषणाला राज्य दिले. आताच्या राज्यकर्त्यांप्रमाणे बळकावले नाही, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
जे लघु सूक्ष्म आणि मध्यम आहेत, ते प्रश्न विचारतात...
राष्ट्रपतींना बोलावले नाही. कारसेवक यांचा सन्मान नाही. उद्धव ठाकरे यांना निमंत्रण नाही. रामाचा वापर राजकारणासाठी केला आहे. शंकराचार्यांना डावलण्याचे दिल्लीतील सत्ताधाऱ्यांनी केले आहे. त्यांचे योगदान काय? असे विचारतात. जे लघु आहेत, सूक्ष्म आणि मध्यम आहेत, ते असे प्रश्न विचारतात? या देशात काय चाललय, याचा विचार करण्याची वेळ आली आहे, अशी टीका त्यांनी नारायण राणे यांचे नाव न घेता केली आहे.
देवेंद्र फडणवीसांना टोला
उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात होते तेच नवाब मलिक सत्ताधाऱ्यांमध्ये गेले तर मी नाही त्यातली कडी लाव आतली या असे पत्र उपमुख्यमंत्री दिले, असा टोला देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी लगावला. तेजस ठाकरेंना जेव्हा कधी वाटेल तेव्हा ते नक्कीच झेप घेणार,असे देखील ते म्हणाले.
आणखी वाचा