एक्स्प्लोर

Nashik Malegaon News : ज्या बापाने अंगाखांद्यावर खेळवलं, आज सोबतच दोघांचीही चिता, काय घडलं नेमकं?

Nashik Malegaon News : मालेगाव येथील हृदयद्रावक घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Nashik Malegaon News : मालेगाव तालुक्यातील (Malegaon) खडकी येथे विजेच्या धक्क्याने शेतकरी बाप लेकाचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे. दोघेही बापलेकांचा यामध्ये मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. कांद्याच्या शेतात काम सुरु असताना महावितरणच्या तारेला धक्का लागल्याने मुलगा समाधान कळमकर विजेच्या तारेला लटकला. वडिलांना लक्षात येताच ते मुलाकडे गेले असता त्यांनाही शॉक लागला. 

नाशिकच्या (Nashik) मालेगाव तालुक्यातील खडकी शिवारात (Khadki Shiwar) पांडुरंग कळमकर यांची शेतजमीन आहे. ते कांदा काढणीसाठी सहकुटुंब शेतात गेले होते. या दरम्यान समाधान कळमकर (samadhan Kalamkar) हा तरुण हा विहिरीवर पाणी घेण्यासाठी गेला होता. विहिरीजवळील विद्युत पेटीतील वायर तुटल्याचे दिसून आले. ती बाजूला करण्यासाठी गेला असता त्याला विजेचा तीव्र धक्का (Electric Shock) बसला. हा प्रकार पाहून वडिलांनी समाधानकडे धाव घेतली. मुलाला सावरताना त्यांनाही विजेचा धक्का बसला. यात दोघाही बापलेकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यावेळी ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच जोरजोरात आरडाओरड केली. आवाज ऐकून आजूबाजूच्या स्थानिक नागरिकांनी तात्काळ विहिरीकडे धाव घेतली. 

स्थानिक नागरिकांनी तात्काळ दोघांनाही बाजूला घेत वैद्यकीय उपचारासाठी मालेगाव येथील सामान्य दवाखान्यात नेले. परंतु डॉक्टरांनी तपासून त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. रात्री उशिरा खडकी परिसरात अत्यंत शोकाकूल वातावरणात दोघा पिता पुत्रावर अंत्यसंस्कार करण्यात आले. चार वर्षांपूर्वी समाधानच्या भावाचा पोळ्याच्या दिवशी पाण्यात बुडून मृत्यू झाला होता आणि आता समाधानसह वडिलांचा देखील मृत्यू झाल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सदर घटनेने शेतशिवारातील गंभीर परिस्थिती समोर आली आहे. हेलावून टाकणारी घटना खडकी गावात घडली आहे. 

हृदय पिटाळून टाकणारी घटना 

दरम्यान जेमतेम परिस्थिती असताना जीवनाशी दोन हात करण्याची हिम्मत ठेवणाऱ्या कष्टकरी कुटुंबाला दुःखद प्रसंगाला सामोरे जावे लागले. शेतशिवारामध्ये आधीच अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असताना कोणत्याही शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. यातच एक एक दिवस नवा संघर्ष सुरु असताना अशी घटना हृदय पिटाळून टाकणारी आहे. पिता पुत्राची एकाच वेळी चिता पेटवण्याची वेळ आल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. खडकी गावासह तालुका शोकसागरात बुडाला आहे. गावात फक्त रडण्याचा आवाज येत असून गाव सुन्न झाले आहे. दरम्यान महावितरणच्या गलथान कारभाराचा फटका बसल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी कारवाईची मागणी केली आहे.

नांदगावमध्ये वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू 

सोमवारी मध्यरात्री विजेच्या कडकडाटासह झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील तांदूळवाडी येथील नाना गमन चव्हाण या शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला. शेतात काढून ठेवलेले कांदे झाकण्यासाठी चव्हाण हे शेतात गेले असता अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. मध्यरात्री अचानक झालेल्या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात उभे असलेले गहू, हरभरा, कांदा या पिकांवर अवकाळीचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mark Zuckerberg on Pakistan : मला पाकिस्तानात फाशीची शिक्षा होणार होती! फेसबुक सह-संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांच्या वक्तव्याने अवघ्या जगाच्या भूवया उंचावल्या; प्रकरण नेमकं आहे तरी काय?
मला पाकिस्तानात फाशीची शिक्षा होणार होती! फेसबुक सह-संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांच्या वक्तव्याने अवघ्या जगाच्या भूवया उंचावल्या; प्रकरण नेमकं आहे तरी काय?
CT Prize Money : जय शहांनी ICC चा पेटारा उघडला, चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या संघाला आजपर्यंतची सर्वात मोठी रक्कम मिळणार!
जय शहांनी ICC चा पेटारा उघडला, चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या संघाला आजपर्यंतची सर्वात मोठी रक्कम मिळणार!
BJP President : इकडं प्रदेशाध्यक्ष निवडीत काँग्रेसचा चकवा अन् तिकडं भाजप सुद्धा अध्यक्ष निवडीत धक्कातंत्र वापरणार! 20 वर्षांत पहिल्यांदाच दिशा बदलणार
इकडं प्रदेशाध्यक्ष निवडीत काँग्रेसचा चकवा अन् तिकडं भाजप सुद्धा अध्यक्ष निवडीत धक्कातंत्र वापरणार! 20 वर्षांत पहिल्यांदाच दिशा बदलणार
आरबीआयने मुंबईतील बँकेवर कारवाईचा वरवंटा फिरवला, शाखेबाहेर ठेवीदारांची प्रचंड गर्दी
आयुष्यभराची पुंजी धोक्यात, मुंबईतील 'या' बँकेबाहेर पैसे काढण्यासाठी लोकांची तोबा गर्दी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai PC : माझ्यात बोलायची हिंमत! तेव्हा दुतोंडी गांडूळ कुठे होते?Pm Modi Meet Donald Trump  :गाळाभेट, हस्तांदोलन; डोनाल्ड ट्रम्प-पंतप्रधान मोदींच्या भेटीची EXCLUSIVE दृश्यHarshwardhan Sapkal : काँग्रेसच्या नवीन प्रदेशाध्यक्षांचा अजेंडा काय? हर्षवर्धन सपकाळ EXCLUSIVEABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9AM 14 February 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mark Zuckerberg on Pakistan : मला पाकिस्तानात फाशीची शिक्षा होणार होती! फेसबुक सह-संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांच्या वक्तव्याने अवघ्या जगाच्या भूवया उंचावल्या; प्रकरण नेमकं आहे तरी काय?
मला पाकिस्तानात फाशीची शिक्षा होणार होती! फेसबुक सह-संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांच्या वक्तव्याने अवघ्या जगाच्या भूवया उंचावल्या; प्रकरण नेमकं आहे तरी काय?
CT Prize Money : जय शहांनी ICC चा पेटारा उघडला, चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या संघाला आजपर्यंतची सर्वात मोठी रक्कम मिळणार!
जय शहांनी ICC चा पेटारा उघडला, चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या संघाला आजपर्यंतची सर्वात मोठी रक्कम मिळणार!
BJP President : इकडं प्रदेशाध्यक्ष निवडीत काँग्रेसचा चकवा अन् तिकडं भाजप सुद्धा अध्यक्ष निवडीत धक्कातंत्र वापरणार! 20 वर्षांत पहिल्यांदाच दिशा बदलणार
इकडं प्रदेशाध्यक्ष निवडीत काँग्रेसचा चकवा अन् तिकडं भाजप सुद्धा अध्यक्ष निवडीत धक्कातंत्र वापरणार! 20 वर्षांत पहिल्यांदाच दिशा बदलणार
आरबीआयने मुंबईतील बँकेवर कारवाईचा वरवंटा फिरवला, शाखेबाहेर ठेवीदारांची प्रचंड गर्दी
आयुष्यभराची पुंजी धोक्यात, मुंबईतील 'या' बँकेबाहेर पैसे काढण्यासाठी लोकांची तोबा गर्दी
CRPF Soldier Opens Fire At Camp : CRPF जवानाची कॅम्पमध्ये फायरिंग करत स्वत:वर गोळी झाडली; कॉन्स्टेबल आणि एक उपनिरीक्षक जागीच ठार, 8 जवान जखमी
CRPF जवानाची कॅम्पमध्ये फायरिंग करत स्वत:वर गोळी झाडली; कॉन्स्टेबल आणि एक उपनिरीक्षक जागीच ठार, 8 जवान जखमी
रणवीर अलाहबादियाचा पाय खोलात, विराट कोहली आणि युवराज सिंगचे मोठे पाऊल
रणवीर अलाहबादियाचा पाय खोलात, विराट कोहली आणि युवराज सिंगचे मोठे पाऊल
Share Market : भारतीय शेअर बाजार का कोसळतोय? 'त्या' 970000 कोटी रुपयांचं कनेक्शन समोर...
शेअर बाजार का कोसळतोय? मोठं कारण समोर, FPI नं 970000 कोटी रुपये काढून घेतले अन्...
Crop Insurance Manikrao Kokate: हल्ली भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही पण आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयांत पीक विमा दिला: माणिकराव कोकाटे
हल्ली भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही पण आम्ही शेतकऱ्यांना पीक विमा दिला: कृषीमंत्री माणिकराव कोकाटे
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.