Nashik Sahitya Sammelan : नाशिकमध्ये तब्बल बावीस वर्षांनी साहित्य जत्रा, जानेवारीत मुस्लिम मराठी साहित्य संमेलन
Nashik Sahitya Sammelan : नाशिकमध्ये (Nashik) मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे (Muslim Sahitya Sammelan) आयोजन करण्यात आले आहे.
Nashik Sahitya Sammelan : अखिल भारतीय मराठी मुस्लिम साहित्य परिषदेच्या (Muslim Sahitya Parishad) वतीने नाशिकमध्ये (Nashik) येत्या 28 व 29 जानेवारी रोजी नवव्या मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे (Muslim Sahitya sammelan) आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाध्यक्षपदी जेष्ठ विचारवंत अब्दुल कादर मुकादम यांची निवड करण्यात आली आहे.
नाशिकमध्ये मागील वर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेन (Marathi Sahitya Sammelan) पार पडले. मोठ्या उत्साहात राज्यभरातून साहित्यिकांनी हजेरी लावत चार दिवस शब्दांची यथेच्छ उधळण केली. त्यानंतर आता नाशिकमध्ये मुस्लिम मराठी साहित्य संलें भरवण्याचे आयोजन करण्यात आपले आहे. जानेवारीच्या शेवटी हे संमेलन आयोजिले असून शहरातील भाभानगर येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात हे दोन दिवशीय संमेलन होणार आहे. या संमेलनाची जोरदार तयारी करण्यात येत असून देशभरातून दीड हजाराहून अधिक साहित्यिक येण्याची शक्यता आहे.
दरम्यान संमलेनाच्या तयारीला सुरवात झाली असून या संमेलनात परिषदेच्या केंद्रीय समितीचे अध्यक्ष डॉ. अजीज नदाफ, सचिव अयुब नल्लामंदू यांसह निवड समितीने अब्दुल कादर यांची संमेलनाध्यक्षपदी निवड केली आहे. या दोन दिवशीय कार्यक्रमात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात मुस्लिम प्रश्न, वास्तव आणि अपेक्षा, मुस्लिम मराठी साहित्य चळवळीची दशके : साहित्यिक, सांस्कृतिक व सामाजिक विश्लेषण, आम्ही भारताचे लोक, सांस्कृतिक दहशतवाद आदी विषयांवर मंथन होणार आहे. त्याचबरोबर कवी संमेलने, चित्रकला स्पर्धा, नाट्य स्पर्धा, ग्रंथदिंडी, पथनाट्य, समाजप्रबोधनपर गीते, निसर्ग पोस्टर प्रदर्शन, संमेलनाध्यक्ष अब्दुल कादर मुकादम यांची मुलाखत, विविध पुरस्कारांचे वितरण आदी कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
दरम्यान नाशिकमध्ये यापूर्वी 2001 मध्ये चौथे मुस्लिम मराठी साहित्य संमेलन झाले होते. महाकवी कालिदास मंदिरात झालेल्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ कवी खलील मोमीन होते. तसेच, सोलापूर, नागपूर, रत्नागिरी, जळगाव, कोल्हापूर, औरंगाबाद, पनवेल, नवी मुंबई, मुंबई, पुणे येथे झाली आहेत. आदी ठिकाणी हे आता तब्बल 22 वर्षांनी पुन्हा नाशिकमध्ये साहित्य जत्रा रंगणार आहे. त्यामुळे यंदा राज्यासह देशभरातून साहित्यिक मुस्लिम मराठी संमेलनासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे साहित्यांची देवाण घेवाण नाशिकमध्ये होणार आहे. मुस्लिम साहित्यातील अनेकाविध साहित्य नाशिककरांना उपलब्ध होणार असल्याचे आयोजकांकडून सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संमेलन जानेवारीतच ठरलं होत...
अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य, सांस्कृतिक संस्था आणि मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने मुस्लिम मराठी साहित्य चळवळीचे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन जानेवारी 2022 मध्ये घेण्याचे नियोजन होते. या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक तन्वीर खान (तंबोली) यांची निवड करण्यात आली होती. मात्र काही कारणास्तव संमेलन बारगळले. मात्र आता नव्याने संमेलनाचे नियोजन करण्यात आले आहे.