एक्स्प्लोर

Samruddhi Highway : विशेष सरकारी वकिलांचा समृद्धी महामार्गावर अपघात, चेहरा, पायाला दुखापत, रुग्णालयात उपचार

Samruddhi Highway Accident : अजय मिसर यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. 

नाशिक: समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका (Samruddhi Highway Accident) सुरुच आहे. विशेष सरकारी वकील अजय मिसर (Ajay Misar) यांच्या वाहनाला समृद्धी महामार्गावर अपघात झाला.या अपघातात अजय मिसर जखमी झाले आहेत.  त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अजय मिसर हे श्रीरामपूर ते मुंबई असा नाशिकमार्गे प्रवास करत होते.  दुपारी त्यांचा ताफा समृद्धी महामार्गावरून मार्गस्थ होत होता. घोटी ओलांडल्यानंतर इगतपुरीजवळच्या भरवीर बुद्रूक शिवारात त्यांचे वाहन समोरच्या ट्रकवर जाऊन आदळले. यामुळे त्यांच्या पायांना आणि चेहऱ्याला दुखापत झाली. त्याशिवाय त्यांच्या खांद्याला मुका मार लागला आहे.

या अपघाताची माहिती मिळताच तातडीने पोलिस आणि रूग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. जखमींवर तिथेच प्रथमोपचार देण्यात आले. दरम्यान वकील अजय मिसर यांच्यासह सहाय्यक वकील वाहनचालक यांची प्रकृती स्थिर आहे.

मुंबई -नागपूर समृद्धी महामार्ग 

नागपूर ते मुंबई राज्यातील या दोन महत्वाच्या शहरांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाला विकासाचा महामार्ग संबोधित केलं जातं. महामार्गावरील अपघातांची संख्या जरी जास्त असली तरी महामार्गावरून सुसाट प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांच्या संख्येतही दिवसागणिक वाढ होत आहे. 

मुंबईपर्यंत समृद्धी महामार्ग कधीपर्यंत पूर्ण होणार?

सध्या नागपूर ते शिर्डी असा 501 किमीचा टप्पा सुरू आहे. शिर्डी ते भिवंडी या टप्प्याचं काम अजूनही सुरू आहे. सिन्नर ते कसारा टप्प्यात 12 बोगदे आणि 16 छोटे पूल उभारावे लागणार आहेत. इगतपुरी ते भिवंडीजवळील आमने गाव हा शेवटचा टप्पा डिसेंबर अखेरीस खुला होण्याची शक्यता आहे. इगतपुरी ते भिवंडीजवळील आमने गाव हा शेवटचा टप्पा डिसेंबर अखेरीस खुला केला जाणार असल्याची माहिती आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यावरच मुंबईकरांना समृद्धी महामार्गाचा पूर्ण लाभ घेता येईल.

समृद्धी महामार्गावरील उच्चदाब वाहिनीचे काम स्थगित; वाहतूक पूर्ववत

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर करावयाचे नियोजित पॉवर ग्रिड ट्रान्समीशन अती उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम स्थगित करण्यात आले आहे. त्याकरीता करण्यात येणाऱ्या वाहतूक मार्गातील बदलही स्थगित करण्यात आला असून वाहतूक पूर्ववत सुरु राहील असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सांगण्यात आलं आहे.

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रिड ट्रान्समीशन अती उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्याचे नियोजन होते. तथापि अपरिहार्य कारणांमुळे हे काम तूर्त स्थगित झाले आहे. यानिमित्त पहिला टप्पा 10 ते 12  व दुसरा टप्पा 25 व 26 या कालावधीत हे काम नियोजित होतं. त्यासाठी जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान वाहतूक वळवण्याचे नियोजन करण्यात आले होते. तथापि, काम स्थगित झाल्याने वाहतूक पूर्ववत सुरू राहिल, असे कळविण्यात आले आहे. 

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
VIDEO : कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
Latur : लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
VIDEO : कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
Latur : लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
Embed widget