एक्स्प्लोर

नाशिकच्या जागेवरून मुंबईत जोरदार खलबतं, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख तातडीने मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिकच्या जागेवरून मुंबईत जोरदार खलबतं सुरु आहे. शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याने चर्चांना उधाण आले आहे.

Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून (Shiv Sena UBT) माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राजाभाऊ वाजे यांच्याकडून लोकसभेचा जोरदार प्रचारही सुरु करण्यात आला आहे. तर महायुतीत (Mahayuti Seat Sharing) मात्र अद्याप नाशिकच्या जागेचा तिढा कायम असल्याचे चित्र आहे.  

महायुतीत नाशिकच्या जागेवरून जोरदार रस्सीखेच सुरु आहे. एकीकडे शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) हे नाशिकच्या जागेवरून पुन्हा एकदा उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्यांनी तीन ते चार वेळेस मुंबई गाठत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे भेटही घेतली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील नाशिकची जागा शिवसेनेलाच राहील असे आश्वासन दिले होते. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे देखील नाशिकच्या जागेवरून लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) लढवण्यासाठी आग्रही आहेत. 

महायुतीकडून पर्यायी उमेदवारांची चाचपणी

भुजबळ आणि गोडसे यांच्या नावाला नाशिकमध्ये विरोध होताना पहायला मिळत आहे. त्यामुळे महायुतीकडून नाशिकच्या जागेसाठी पर्यायी उमेदवाराचा शोध सुरु करण्यात आला. भाजपचे आमदार राहुल ढिकले (Rahul Dhikale) आणि शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते (Ajay Boraste) यांच्या नावाची चाचपणी करण्यात आली. 

नाशिक लोकसभेची उमेदवारी नक्की कुणाला?

आज अजय बोरस्ते तातडीने ठाण्याचे रवाना झाले. सायंकाळी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेणार आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघातील (Nashik Lok Sabha Constituency) महायुतीचा तिढा कायम असताना बोरस्ते मुख्यमंत्रीच्या भेटीला गेल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. मागील आठवड्यात अजय बोरस्ते यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. आता महायुतीकडून अजय बोरस्ते यांना उमेदवारी मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. मात्र मंत्री छगन भुजबळ यांनी काल नाशिकच्या जागेसाठी अजित पवारांनी (Ajit Pawar) आग्रह धरला आहे. या जागेवर मलाच उमेदवारी द्या, अशा सूचना वरून आल्याचे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता नाशिकच्या जागेवरून नक्की कोणाला उमेदवारी मिळणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

नाशिकचा तिढा दोन दिवसात संपेल, आमच्या मनातलाच उमेदवार जाहीर होणार, अजितदादांच्या राष्ट्रवादीतील नेत्याचं मोठं वक्तव्य

छगन भुजबळ नाशिकमधून निवडणूक लढवण्यावर ठामच! अजित पवारांचं नाव घेत केला मोठा दावा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघाची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Ravindra Waykar on EVM : ईव्हीएमसोबत छेडछाड केल्याचा प्रश्नच येत नाही, रवींद्र वायकरांची प्रतिक्रियाABP Majha Headlines : 04 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सRavindra Waykar : मंगेश पडिलकरजवळचा फोन निवडणूक अधिकाऱ्याचा? ड्रायव्हर बोलवण्यासाठी फोन वापरल्याचा दावाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 04 PM

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघाची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Embed widget