Ahmednagar : "काहीही झालं तरी खचणार नाही, घेतलेला वसा टाकणार नाही"; पंकजा मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा यात्रा पोहचली कोपरगावमध्ये!
Pankaja Munde : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची आजपासून शिवशक्ती परिक्रमा यात्रा (Shivshakti Parikrama) सुरू झाली आहे.
![Ahmednagar : Ahmednagar News Banner waving by all party workers in Kopargaon to welcome Pankaja Munde Maharashtra news Ahmednagar :](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/04/f87c09f47eb8093be9cc50492b8af7581693813447630738_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नाशिक : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची आजपासून शिवशक्ती परिक्रमा यात्रा (Shivshakti Parikrama) सुरू झाली आहे. यात्रेतील मार्गात पंकजा मुंडे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे दैत्य गुरुशुक्राचार्य यांच्या मंदीरात जावून दर्शन घेतले आहे. यानंतर कोपरगाव वासियांनी पंकजा मुंडे यांचे जोरदार स्वागत केले. पंकजा मुंडे यांच्या स्वागतासाठी कोपरगाव तालुक्यात अनेक ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी श्रावण महिन्याचे (Shravan) औचित्य साधून राज्यभरातील धार्मिक स्थळांना भेटी देण्याचा दौरा सुरू केला आहे. आज सकाळी या दौऱ्याला सुरुवात झाली असून छत्रपती संभाजीनगर येथून निघालेला दौरा अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातून नाशिकला (Nashik) येणार आहे. तत्पूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव (Kopargaon) तालुक्यात पंकजा मुंडे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे. स्थानिक सर्वपक्षीय नेत्यांकडून पंकजा मुंडे यांचे स्वागत करण्यात आले असून स्वागतासाठी तालुक्यात चौफेर बॅनरबाजी करण्यात आली आहे. तत्पूर्वी पंकजा मुंडे यांनी प्रसिद्ध दैत्य गुरु शुक्लेश्वर मंदिर दर्शन घेतले. त्यानंतर माजी आमदार स्नेहलता कोल्हे (Snehlata Kolhe) यांच्या निवासस्थानी भेट दिली आहे.
दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या स्वागतासाठी भाजप, राष्ट्रवादीसह ठाकरेंची शिवसेना या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी स्वागताचे बॅनर लावले आहेत. राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांनी मुंडे यांच्या स्वागतासाठी लावलेल्या फलकावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजीत पवार यांच्यासह शरद पवार यांचा देखील फोटो लावण्यात आला आहे. कोपरगावातील बेट भागात शुक्राचार्य मंदिरात पंकजा दर्शन घेतले असून त्या परिसरातील ठाकरे गटाचे नगरसेवक काल्लु अप्पा आव्हाड यांनी स्वागत फलक लावला आहे. यात स्व. बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह कोपरगावच्या भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि स्थानिक भाजपा नेत्यांचे फोटो वापरण्यात आले आहेत. त्यामुळे कोपरगावात सर्वच पक्षांकडून पंकजा मुंडे यांचे स्वागत करण्यात येत आहे.
आजपासून ‘शिव-शक्ती परिक्रमा’ दौरा
दरम्यान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी श्रावण महिन्याचे औचित्य साधून राज्यभरातील धार्मिक स्थळांना भेटी देण्याचा दौरा सुरू केला आहे. या दौऱ्याला ‘शिव-शक्ती परिक्रमा’ (ShivaShakti Parikrama) असे नाव देण्यात आले आहे. या दौऱ्याच्या ‘शिवशक्ती’ नावावरून मुंडे यांच्या राजकीय ऊर्जेसाठी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहे. या दौऱ्यात पंकजा मुंडे 10 जिल्ह्यांचा दौरा करतील. यावेळी त्या विविध मंदिरांना भेटी देतील आणि पक्षाच्या सदस्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतील. ‘शिव-शक्ती परिक्रमा’ मुख्य दौरा आज पासून सुरु झाला आहे. नाशिकपासून सुरवात झाली असून आज दिवसभर नाशिक जिल्ह्यात असणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)