(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dhananjay Munde : निसर्गाचा लहरीपणा, कांदा दरातील चढउतार, कृषिमंत्र्यांना घेतला मोठा निर्णय
Nashik News : कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी स्मार्ट प्रकल्पांतर्गत कांद्याची भुकटी करण्याचा प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
Dhananjay Munde मुंबई : निसर्गाचा लहरीपणा आणि दरातील चढउतार यापासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे (Onion Farmers) नुकसान टाळण्यासाठी स्मार्ट प्रकल्पांतर्गत कांद्याची (Onion) भुकटी करण्याचा प्रकल्प शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत राबविण्यात येणार असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे (Agriculture Minister Dhananjay Munde) यांनी दिली.
याबाबत नाशिक जिल्ह्यातील माजी विधान परिषद सदस्य जयंत जाधव (Jayant Jadhav) यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे बैठकीची मागणी केली होती. त्या अनुषंगाने झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळू शकतो
निसर्गाच्या लहरीपणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होते. तसेच कांदा निर्यातीबाबतच्या धोरणात फेरबदल केल्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. काही वेळा शेतकरी कांदा (Onion) फेकून देतात. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात (Nashik District) शेतकरी उत्पादक कंपनीकडून डीहायड्रेशन प्रोजेक्ट केल्यास कांद्याची भुकटी करून शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळू शकतो. त्यामुळे अशा प्रकारचा पथदर्शी प्रकल्प राबवून कांदा उत्पादकांना दिलासा देण्याची मागणी जाधव यांनी शासनाकडे केली होती.
जागतिक बँकेकडे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश
हा प्रकल्प नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा (Farmers) व्यापक जनहिताचा असल्यामुळे या प्रकल्पाला स्मार्ट योजनेतून 60 टक्के ऐवजी 90 टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यासाठी जागतिक बँकेकडे स्वतंत्र प्रस्ताव सादर करण्याचे आदेश यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.
फूड टेस्टिंग लॅबोरेटरीसाठी प्रयत्न (Food Testing Laboratory)
तसेच नाशिक जिल्ह्यात पिकणाऱ्या द्राक्षाचे मोठ्या प्रमाणात निर्यात होते मात्र फूड टेस्टिंग लॅबोरेटरी (Food Testing Laboratory) पुरेशा प्रमाणात उपलब्ध उपलब्ध नसल्यामुळे अनेक वेळा शेतकऱ्यांना निर्यातीच्या अटींची पूर्तता करता येत नाही. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात फूड टेस्टिंग लॅबोरेटरी उभे करण्यासाठी सुद्धा स्मार्ट योजनेतून अनुदान उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव जागतिक बँकेकडे सादर करण्याचे आदेश सुद्धा यावेळी कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिला.
यावेळी स्मार्ट प्रकल्प संचालक कौस्तुभ दिवेगावकर, कृषी संचालक सुभाष नागरे, सहसंचालक ज्ञानेश्वर बोटे, कृषी विभागाचे उपसचिव संतोष कराड, कृषी संचालक दशरथ तांबाडे आदी उपस्थित होते.
इतर महत्वाच्या बातम्या