एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ प्रमुख पाहुणे असलेल्या कार्यक्रमात 80 टक्के खूर्च्या रिकाम्या; वारकऱ्यांसह नागरिकांनी फिरवली पाठ

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि श्रीमंत श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज जनसेवा प्रतिष्ठान नाशिक यांच्या वतीने वारी आपल्या दारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

नाशिक : ओबीसी रॅलीतून बेधडक वक्तव्य करून मराठा आणि ओबीसी समाजामध्ये दुही निर्माण होईल, अशी वक्तव्य करत चाललेल्या मंत्री छगन भुजबळ यांनी अवघ्या 24 तासांपूर्वी मंत्रिपदाच्या राजीनामा दिल्याचे सांगितल्यानंतर आज (4 फेब्रुवारी) ते नाशिकमध्ये पक्षाच्या कार्यक्रमासाठी पोहोचले. मात्र या ठिकाणी त्यांच्या कार्यक्रमाकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. छगन भुजबळ प्रमुख पाहुणे असलेल्या वारी आपल्या दारी कार्यक्रमामध्ये तब्बल 80 टक्के खुर्च्या रिकाम्या पडल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि श्रीमंत श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज जनसेवा प्रतिष्ठान नाशिक यांच्या वतीने वारी आपल्या दारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पंचवटी परिसरात एका लॉनवर हा कार्यक्रम झाला. मात्र, या कार्यक्रमाच्या ठिकाणी तब्बल 80 टक्के खुर्च्या रिकाम्या पडल्या होत्या. त्यामुळे या अनुपस्थितीची  चर्चा रंगली आहे. 

छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये उभा संघर्ष भेटला

अहमदनगरमध्ये काल (3 फेब्रुवारी) ओबीसी रॅलीमध्ये छगन भुजबळ यांनी गौप्यस्फोट करताना आपण मंत्रिपदाचा राजीनामा 16 नोव्हेंबर रोजी दिल्याचे सांगितले. मात्र, त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी विनंती केल्याने आपण आजवर शांत होतो असेही त्यांनी यावेळी सांगितले. दुसरीकडे त्यांच्या राजीनाम्यावरुन पक्षाकडून अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोलापूर दौऱ्यात विचारण्यात आले असता त्यांनी याबाबतीत कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. दुसरीकडे, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुद्धा भुजबळ यांनी केलेले भाषण आणि त्यांनी दिलेल्या राजीनामा या संदर्भातील बोलणं झालं नसल्याचे सांगत त्यांनी सुद्धा अधिकची प्रतिक्रिया देणे टाळले. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा छगन भुजबळ यांच्या राजीनाम्यावर अधिक भाष्य करण्याचे टाळून दिले. गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ आणि मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये उभा संघर्ष भेटला आहे. गेल्या साडेपाच महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी एल्गार पुकारला असतानाच छगन भुजबळ यांनी त्यांच्या प्रत्येक भूमिकेला कडाडून विरोध करत जर तरची भाषा केली आहे. दोघांकडूनही समाजाच्या आडून आव्हानाची भाषा होत आहे. 

मराठा आणि ओबीसी समाजामध्ये कारण नसताना भेद

त्यामुळे सामान्य मराठा आणि ओबीसी समाजामध्ये कारण नसताना भेद निर्माण होत चालला आहे. एकंदरीत छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे सरकार बॅकफूटवर गेल्याचे चित्र एका बाजूने असतानाच त्यांना पाठिमागून कोणाची फूस तर नाही ना? अशी सुद्धा चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वीच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर असल्याचे भाष्य केलं होतं. मात्र त्याबाबत अजून कुठलाही दुजोरा देण्यात आलेला नाही. 

दुसरीकडे, छगन भुजबळ घेत असलेल्या भूमिकेला राष्ट्रवादी काँग्रेसमधूनही विरोध झालाच आहे. त्याचबरोबर मंत्रिमंडळातील इतर सहकारी मंत्र्यांकडूनही विरोध होत आहे. मात्र विरोधाला न जुमानता आपण अगोदरच राजीनामा दिल्याचे सांगत त्यांनी एक प्रकारे अडचण करून टाकली आहे. दुसरीकडे, त्यांनी राजीनामा दिल्याचे सांगितल्यानंतर विरोधी पक्षनेते जितेंद आव्हाड यांनी त्यांच्यावर कडाडून हल्लाबोल केला आहे. राजीनामा द्यायचा असेल, तर तो त्यांनी राज्यपालांकडे द्यावा. त्यांनी सरकारी बंगला सोडला आहे का? अशी विचारणा आव्हाड यांनी केली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: 300 कोटींच्या टेंडरचे आमिष, विभागीय आयुक्तांची डिजिटल स्वाक्षरी अन् राजमुद्रेचा वापर; कुंभमेळ्याच्या बनावट वर्क ऑर्डरद्वारे व्यावसायिकाला 35 लाखांचा गंडा
300 कोटींच्या टेंडरचे आमिष, विभागीय आयुक्तांची डिजिटल स्वाक्षरी अन् राजमुद्रेचा वापर; कुंभमेळ्याच्या बनावट वर्क ऑर्डरद्वारे व्यावसायिकाला 35 लाखांचा गंडा
Nashik Crime News: 'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
पान टपरीसमोर उभं असलेल्या युवकावर झाडल्या थेट गोळ्या, धक्क्कादायक घटनेनं नाशिक हादरलं
पान टपरीसमोर उभं असलेल्या युवकावर झाडल्या थेट गोळ्या, धक्क्कादायक घटनेनं नाशिक हादरलं
Girish Mahajan: नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम असतानाच मोठा ट्विस्ट, सिंहस्थ कुंभपर्व पुस्तिकेवर गिरीश महाजनांचा ‘पालकमंत्री’ म्हणून उल्लेख; चर्चांना उधाण
नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम असतानाच मोठा ट्विस्ट, सिंहस्थ कुंभपर्व पुस्तिकेवर गिरीश महाजनांचा ‘पालकमंत्री’ म्हणून उल्लेख; चर्चांना उधाण

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Embed widget