Petrol-Diesel Price : ...तरीही गुजरातपेक्षा महाराष्ट्रात पेट्रोल 9, तर डिझेल दीड रुपयांनी महाग
Petrol-Diesel Price : भाजपशासित राज्यांपेक्षा गुजरातमध्ये पेट्रोल 9, तर डिझेल दीड रुपयांनी स्वस्त आहे. त्यामुळे सीमाभागांतील नागरिक गुजरातमध्येच पेट्रोल आणि डिझेल टाकण्यास प्राधान्य देत आहेत.
Petrol-Diesel Price : नवनिर्वाचित शिंदे-फडणवीस सरकारनं पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करत महागाईमुळे होरपळलेल्या जनतेला दिलासा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी पेट्रोल (Petrol) 5 रुपयांनी, तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त केलं. पण असं असलं तरीदेखील शेजारी असणाऱ्या गुजरातमधील पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel Price) किमतींमध्ये आणि राज्यातील इंधन दरांत मोठी तफावत असल्याचं पाहायला मिळत आहे. गुजरात (Gujrat) सरकारनं पेट्रोल 9 रुपयांनी तर डिझेल दीड रुपयांनी स्वस्त करण्याचा निर्णय घेतला होता. मुख्यमंत्र्यांनी इंधन दरांत कपात केल्यानंतरही महाराष्ट्रात गुजरातपेक्षा पेट्रोल-डिझेल महाग आहे. त्यामुळे सीमाभागांतील नागरिक गुजरातमध्येच पेट्रोल आणि डिझेल टाकण्यास प्राधान्य देत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर नागरिकांना समाधान मिळेल, असं चित्र होतं. मात्र भाजपशासित राज्यांपेक्षा महाराष्ट्रात पेट्रोल महाग असल्याचं चित्र आहे. सरकारनं पेट्रोलचे दर पाच रुपये आणि डिझेलचे दर तीन रुपयांनी कमी केल्यानंतर नंदुरबार जिल्ह्यात पेट्रोलचे दर 106.99 रुपये तर डिझेलचे दर 94.45 इतके आहेत तर गुजरातमध्ये पेट्रोल 97 रुपये लिटर तर डिझेल 93 रुपये लिटर या दरानं मिळत आहे. त्यामुळे अनेक वाहनधारक पेट्रोल आणि डिझेल टाकण्यासाठी गुजरातच्या पेट्रोल पंपावर गर्दी करत असल्याचं चित्र दिसून येत आहे.
राज्यात पेट्रोल-डिझेलच्या दरांत मोठी कपात
इंधन दर स्वस्त होण्याची वाट पाहणाऱ्या राज्यातल्या जनतेला अखेर मध्यरात्रीपासून दिलासा मिळाला. मध्यरात्रीपासून राज्यात पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त झालं. कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे-फडणवीस सरकारनं जनतेला हे गिफ्ट दिलं. या बैठकीत शेतकऱ्यांसाठीही अनेक निर्णय घेण्यात आले. विशेषतः पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना अनुदानातून वगळणार नसल्याचं सांगत सरकारनं मोठा दिलासा दिला.
राज्य सरकारनं केलेल्या दरकपातीनंतर राज्यातील पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये मोठी घट पाहायला मिळत आहे. राज्याची राजधानी आणि देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर असणाऱ्या मुंबईत आज पेट्रोल 106.25 तर, डिझेल 94.22 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. दरम्यान, काल मुंबईत पेट्रोल 111.30 रुपये आणि डिझेल 97.22 रुपये प्रति लिटरनं विकलं जात होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :