एक्स्प्लोर

Nandurbar : पारंपरिक शेतीला व्यवसायाची जोड, नंदुरबार जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना रोजगार, स्वातंत्र्यदिनी सन्मान

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला व्यवसायाची जोड देत विकास साधला आहे. या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यदिनी शेतकरी उत्पादक कंपनीचा सन्मान होत आहे.

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील (Nandurbar) दुर्गम भागात असलेल्या धडगाव (Dhadgaon) तालुक्यातील काकडदा येथील शेतकऱ्यांनी केंद्राच्या योजनेचा लाभ घेत 'आमु आखा एक से' शेतकरी उत्पादक (Farmers Company) कंपनी स्थापन करून हजारो शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. जवळपास 17 हून अधिक गावातील शेतकरी कंपनीत सहभागी असून पारंपरिक शेतीसह व्यवसायाचे स्वरूप प्राप्त झाल्याने शेतकरी प्रगतीच्या शिखरावर आहेत. या वाटचालीच्या पार्श्वभूमीवर कंपनीचे संचालक लालसिंग वन्या वळवी यांचा भारताच्या स्वातंत्र्यदिनी (Independence Day) दिल्ली येथे सन्मान होत आहे. 

अल्पभूधारक गरीब शेतकर्‍यांच्या उन्नतीसाठी केंद्र शासनाच्या (Central Government) कृषी मंत्रालयाने महत्वाकांक्षी सेन्ट्रल सेक्टर स्कीम अंतर्गत संपूर्ण भारतामध्ये एकूण दहा हजार शेतकरी उत्पादक कंपनी स्थापनेचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे. यानुसार नंदुरबार जिल्ह्यात पाच शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्यात आली आहे. या सर्व शेतकरी कंपन्या केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेऊन प्रगती साधत आहेत. दुर्गम भागातील काकडदा येथे लालसिंग वन्या वळवी आणि आशा लालसिंग वळवी (Lalsingh Valvi) यांच्या नेतृत्वात या कंपनीची दोन वर्षांपूर्वी स्थापना झाली असून परिसरातील 17 गावातील सुमारे 579 शेतकरी यात सहभागी झाले आहेत. ज्यात 72 महिला शेतकरी आहेत. 

या कंपनीत सर्व शेतकरी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील अल्पभूधारक आदिवासी शेतकरी आहेत. यातील सर्व शेतकरी डोंगर उतारावरील शेती पारंपरिक पद्धतीने करीत आलेले आहेत. मात्र आता केंद्र सरकारच्या गटाने शेती करण्याच्या योजनेतून आर्थिक लाभ व मार्गदर्शन घेऊन यातील शेतकरी गटाने शेती करु लागले आहेत. सोबतच दुर्गम भागात होणार्‍या तूर, भगर, तांदूळ (Rice) या पिकांचे उत्पादन घेऊन या गटातील पुरुष व महिला शेतकरी एकत्रितपणे स्वतःच या धन्यांवर विविध प्रक्रिया आणि त्यांची व्यवस्थित पॅकींग करून सरळ ग्राहकांना त्याची विक्री करू लागले आहेत. व्यापाऱ्यांची मध्यस्थी नाहीशी झाल्याने त्यांना जास्त नफा मिळू लागला आहे. या भागात आंब्यांची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. आता शेतकरी सरळ आंबे न विकता शेतकरी स्वतः व महिला बचत गटाच्या महिलांसोबत त्याचे आमचूर बनवू लागले आहेत तर आमचूरचे पावडरही बनवू लागले आहेत. या प्रक्रियेने त्यांना जास्त नफा मिळू लागला आहे. 

बचत गटाच्या महिलांनाही रोजगार

तसेच कंपनीच्या माध्यमातून बचत गटाच्या महिलांनाही रोजगार मिळू लागला आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात होणार्‍या सीताफळची आता उघड्यावर विक्री न करता या त्याची बॉक्समध्ये व्यवस्थित पॅकिंग करून त्याची विक्री करू लागल्याने सीताफळाचीही मागणी वाढून त्यांना चांगला पैसा पदरी पडू लागला आहे. सातपुड्याच्या जंगलात बांबूची झाडे मुबलक आहेत. या कंपनीतील महिला व पुरुष बांबू पासून विविध संसारोपयोगी वस्तू बनवू लागले आहेत. त्यात रंगीत टोपल्या, खराटे आदींचा समावेश आहे. शेतकरी या गटाच्या माध्यमातून खत विक्री व धान्य खरेदीचाही व्यावासात करू लागले आहेत. यातूनही त्यांना चांगला पैसा मिळू लागला आहे.

इतर संबंधित बातमी : 

आरोग्य विभागाची उदासीनता, नंदुरबारच्या दुर्गम भागात नव्या बाईक अँब्युलन्स पडल्या धूळ खात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Senate Election : सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंकडून ABVP चा सुफडासाफDharmaveer 2 Review : धर्मवीर - 2! फर्स्ट डे... फर्स्ट शो, फर्स्ट रिव्ह्यूZero Hour Full : फडणवीसांच्या ऑफिसची तोडफोड तेधर्मवीर 2 चा रिव्ह्यू;सविस्तर चर्चाZero Hour Maharashtra Politics : अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्यांचे कान कोण टोचणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Embed widget