नंदूरबारमधील शहादा इथं 9 दुकानांना भीषण आग, 50 ते 60 लाखांचं नुकसान, अनेक वाहनं जळून खाक
नंदूरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील प्रकाशा रस्त्यावरील दुकानांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या रस्त्यावरील आठ ते नऊ दुकानांना भीषण आग लागली आहे.
Nandurbar Fire News : नंदूरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील प्रकाशा रस्त्यावरील दुकानांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या रस्त्यावरील आठ ते नऊ दुकानांना भीषण आग लागली आहे. यामध्ये चारचाकी वाहनांचे गॅरेज, मंडप साहित्यांची दुकाने, इलेक्ट्रिक दुकान, साऊंड सिस्टम आणि इतर अनेक दुकानांना भीषण आग लागल्याची माहितची मिळाली आहे.
घटनास्थळी शहादा नगरपालिका अग्निशामन दल दाखल झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. भीषण आगीत 50 ते 60 लाख रुपयांचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जातेय. भीषण आगीत मोठा ट्रक जळून खाक झाला आहे. तसेच इतर लहान मोठे चारचाकी वाहनं देखील जळाल्याची माहिती मिळाली आहे. ही आग नेमकी कशामुळं लागली हे अद्यापही अस्पष्ट आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
